*डॉ.झाकीरहुसेन*
(8 फेब्रुवारी 1897 – 3 मे 1969)
नेमस्त वृत्ती, संपन्न चारित्र्य व थोर शिक्षणतज्ज्ञ असणारे भारताचे तिसरे राष्ट्रपती व महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी असणाऱ्या #डॉ_झाकीर_हुसेन यांनी आयुष्यभर मूलोद्योग शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.विद्यार्थी दशेतच महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या झाकीर हुसेनची गांधींशी भेट प्रथम झाली १९२६ मध्ये. झाकीर हुसेनांच्या धर्मनिरपेक्षता आणि गांधींच्या आदर्शाचे पालन करण्यामुळे जामिया मिलीया संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी असहकार आणि तत्सम स्वातंत्र्य चळवळी मध्ये अनेक वेळा सहभागी झाले. १९३७ साली झाकीर हुसेन भारताच्या राष्ट्रीय शिक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले गेले. या काळात ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कामकाजातही लक्ष देत होतेच.
ते बिहारचे राज्यपाल, भारताचे उपराष्ट्रपती आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे सह-संस्थापक देखील होते.मुस्लीम समाजाचा शैक्षणिक उत्कर्ष व्हावा या इच्छेने प्रेरित होऊन झाकीर हुसेन यांच्यासह काही विद्यार्थी मित्र आणि शिक्षकांनी मिळून अलिगढ मध्ये १९२० साली नॅशनल मुस्लीम युनिव्हर्सिटीची स्थापना केली. पुढे १९३५ मध्ये दिल्लीच्या जामिया नगैर येथे स्थानांतरित झालेल्या या शैक्षणिक संस्थेचे नाव ‘जामिया मिलीया इस्लामिया’ असे करण्यात आले. या संस्थेच्या स्थापनेत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अबुल कलम आजाद, मोहमद अली जोहर, मुख्तार अहमद अन्सारी, मोहम्मद मुजीब सारखे राष्ट्रीय नेते झाकीर हुसेन यांच्या बरोबर होते. आता जामिया मिलीया इस्लामियाचे रूपांतर दिल्लीच्या एका प्रतिष्ठित देशव्यापी सेंट्रल युनिव्हर्सिटीत झालेय. या काळात झाकीर हुसेन हे एक विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत होते.
1928 पासून ते कुलगुरू ही होते. त्यांच्या कारकिर्दीत जामिया विद्यापीठ हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र झाले होते.
जामिया मिलीयाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यावर १९४७ मध्ये ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर नियुक्त झाले. या काळात या संस्थेचे काही प्राध्यापक, कर्मचारी मुस्लिमांसाठी वेगळा देश, पाकिस्तान व्हावा म्हणून आंदोलन करीत असताना झाकीर हुसेनांनी स्वतंत्र भारत अखंड राहावा म्हणून त्यांचे मन वळवले. यामुळे बॅरिस्टर जिनांचेही शत्रुत्व त्यांनी स्वीकारले.
ते पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित झालेले होते.
स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. झाकीर हुसेन १९५२ आणि १९५६ असे दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले. पुढे त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती आणि १९६७ साली प्रजासत्ताक भारताच्या सर्वोच्चपदी म्हणजे राष्ट्रपतिपदी नियुक्त झाले.
डॉ. झाकीर हुसेन यांचे ३ मे १९६९ रोजी निधन झाले.
👌👌
उत्तर द्याहटवा