विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

महात्मा फुले


*मुलींची पहिली शाळा सुरू झाली*

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅


अनेक दशके इथल्या बहुजनांना, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. पुढे हे शिक्षण सर्वांना मिळाले कसे ? 

          

 विद्ये विना मती गेली। 

     मती विना निती गेली॥

     निती विना गती गेली।

     गती विना वित्त गेले।।

     वित्त विना शुद्र खचले। 

एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥ - म.फुले   

 महात्मा फुले यांनी बहुजनांच्या, स्त्रियांच्या मागासलेपणाचे आणि गुलामीचे मुख्य कारण शिक्षणाचा अभाव आहे आणि बहुजनांना गुलामीतून बाहेर काढसाठी शिक्षण दिले पाहिजे हे जोतिबा फुले यांनी ओळखले होते.      

            1848 हे साल या क्रांतीचे साक्षीदार ठरले. 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली.  

आणि इथल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. 

        जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रथम सर्व समाजातील मुलींसाठी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलांसाठी शाळा काढली. नेटिव्ह फिमेल स्कूल्स इन पुणे आणि दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँण्ड अदर्स या दोन शिक्षण संस्था ही स्थापन केल्या होत्या.

           वडिलांनी सामाजिक विरोधामुळे जोतीराव फुले यांना घराबाहेर काढले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी जोतीराव फुले यांना घर सोडावे लागले. जोतिबा यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाई यांनी शिक्षणाचे काम सुरू ठेवले. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. लहुजी वस्ताद साळवे आणि राणबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे हे सहकारी या शैक्षणिक चळवळीत सोबत होते.

           इथल्या  गुलामगिरी विरोधात लढण्यासाठी बळ फुले दाम्पत्यांनी दिले. अनेक दशकांनंतर क्रांतीचे सुरुंग प्रेरले गेले आणि  स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. 

 1 जानेवारी 1848  रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा काढणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला क्रांतिकारी अभिवादन .. !

महात्मा जोतीबा फुलेंनी यांनी १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. 


तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत ३ जुलै १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. 


समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना  मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते.


त्यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. 


‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्या समोर येतात.

२ टिप्पण्या: