'राईट टू पी' आंदोलनकर्त्या
मुमताज शेख
'टू पी' आंदोलनाच्या संस्थापिका मुमताज शेख यांचा समावेश बीबीसीने जाहीर केलेल्या शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत झाला आणि त्यांच्या मागणीकडे देशाचे लक्ष वेधले. हे आंदोलन आहे स्त्रियांना आवश्यक असणाऱ्या निःशुल्क आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालयांच्या मागणीचे मुंबईमध्ये ४५ टक्के महिला नोकरीसाठी बाहेर पडतात. बस आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्या स्त्रिया पाणी पिण्याचे टाळतात. नैसर्गिक विधीबरोबरच मासिक पाळीच्या काळातही महिलांची गैरसोय होते. त्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांच्या व्यवस्थेची मागणी 'राऊट टू पी' या आंदोलनाद्वारे छेडण्यात आली आहे.
दलित वस्त्यांतील महिलांना अक्षरांबरोबर जगण्याचे धडे देत सन २००० च्या दरम्यान मुमताज शेख यांनी क्वोरो संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याची सुरुवात केली. अनेक तरुणी त्यांच्या संघटनेशी जोडल्या गेल्या आहेत. क्वोरो आणि लिडर क्वेस्ट यांची दोन वर्षांची संयुक्त फेलोशिप सन २००५ मध्ये मुमताज यांना मिळाली.
बचत गटाच्या चळवळीत सामील होत मुमताज यांनी कार्यकर्त्यांची महिला मंडळे उभी केली. चेम्बूर ट्रॉम्बे परिसरात फेडरेशनच्या माध्यमातून दहा हजार महिला त्यांच्या चळवळीला जोडल्या गेल्या आहेत. तब्बल ३०० मंडळे तेथे कार्यरत आहेत. मुमताज या फेडरेशनच्या कार्याध्यक्ष आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा