मानवेंद्रनाथ रॉय
'समान माजाची नेहमीच प्रगती होत असते एक वेळ अशी येते, की प्रगतीची आणि विकासाची शक्ती सर्व विरोधांवर मात करून उफाळून येते, हीच क्रांती. क्रांती ही एक. ऐतिहासिक गरज असते. भारतामध्ये क्रांतीची ही शक्ती आता उफाळून येत आहे. याला जवाबदार ब्रिटिशांची साम्राज्यशाहीच आहे. साम्राज्यशाहीनंच पिळवणुकीच्या आणि दडपशाहीच्या धोरणामुळे तिला तीव्र विरोध करणाऱ्या राष्ट्रीय शक्तींना सवळ केलं आहे. एका परीनं साम्राज्यशाहीनं आपलं थडगंच उभारलं आहे. साम्राज्यशाही, तिला साथ देणारी सरंजामशाही यांचा पूर्ण नाश होईस्तोवर राष्ट्रीय शक्तींच्या कामात खंड पडणार नाही.'
अशा आशयाचे उद्गार प्रसिद्ध क्रांतिकारक मानवेंद्रनाथ रॉय यांनी ब्रिटिशांच्या कोर्टात जाय देताना काढले. १९३२ च्या 'कानपूर कट' खटल्यात रॉघ यांना १२ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.
बंगालमधल्या अरवालीया या गावी १८९३ साली रॉय यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दीनबंधू भट्टाचार्य हे गावच्या शाळेत शिक्षक होते आणि संस्कृतीचे एक गावे विद्वान होते.
रॉय यांच पाळण्यातलं नाव नरेंद्र असं होतं. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी देशकार्यात उडी घेतली. इंग्रजांना भारतातून हाकलून दिलं पाहिजे, त्यांचं राज्य उलथून टाकलं पाहिजे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी ते 'अनुशीलन समिती' व 'युगांतर' या क्रांतिकारी गटांमध्ये सामील झाले. क्रांतीसाठी शस्त्रं मिळवणं, शस्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण घेणं, सरकारी तिजोरीवर छाये पालून क्रांतिकार्यासाठी पैसा उभा करणं हे त्या काळच्या क्रांतिकारी गटांचं एक महत्त्वाचं कार्य होतं. असल्या अनेक गुप्त कारवायांत नरेंद्र सहभागी होते. प्रसिद्ध क्रांतिकारक जतीन मुखर्जी यांच्याबरोबर ते कार्य करत असत.
पहिले महायुद्ध चालू असताना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी जर्मनीकडून शस्त्र होईल, या आशेनं १९१५ साली ते गुप्तपणं देशाबाहेर गेले; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. नरेंद्र भारतात परत आले. त्याच वेळी बालासोरच्या चकमकीत त्यांचे स्नेही जतीन मुखर्जी पोलिसांच्या गोळीला बळी पडले.
अखेर पोलिसांना सुकवण्यासाठी नरेंद्र आणि फणींद्रनाथ चक्रवर्ती या दोघां क्रांतिकारकांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. वेशांतर करून व फादर मार्टिन हे नाव धारण करून नरेंद्र देशाबाहेर पडले. इंडोनेशिया, चीन, जपान असे टप्पे घेत ते जून १९९६ मध्ये अमेरिकेला पोहोचले. मानवेंद्रनाथ रॉय हे नाव त्यांनी धारण केलं, ते अमेरिकेतच. पुढं आयुष्यभर ते या नावानंच ओळखले जाऊ लागले.
अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांचा लाला लजपतराय यांच्याशी जवळचा संबंध आला. लालाजीविषयी त्यांना अतिशय आदर होता. पित्याप्रमाणं त्यांनी लालाजींची सेवा केली. याच काळात त्यांनी समाजवाद, मार्क्सवाद, रशियातील क्रांती यांचा सखोल अभ्यास केला. राजकीय स्वातंत्र्य हे उद्दिष्ट फार मर्यादित आहे, याची त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली. 'स्वातंत्र्य' याचा व्यापक अर्थ बंधमुक्तता तत्कालीन भारतीय राष्ट्रवादात माणसाला सर्व बंधनांतून मुक्त करण्याचं सामर्थ्य नाही, तो सामान्य कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, असं त्यांचं मत झालं आणि समाजाच्या सर्व थरांची सर्वांगीण मुक्तता करू पाहणाऱ्या मार्क्सच्या तत्त्वज्ञानाकडं ते ओढले गेले.
अमेरिकेनं पहिल्या महायुद्धात भाग घेतल्यावर रॉय यांना अमेरिकेत राहणंही कठीण झालं, तेव्हा रॉय शेजारच्या मेक्सिको या देशात गेले. तिथं त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मेक्सिकोतील क्रांतीत रॉय यांचाही वाटा होता.
१९१९ मध्ये ते रशियात गेले. तिथं काही काळ त्यांनी लेनिनचे सहकारी म्हणून काम केलं. रॉय यांच्या प्रभावामुळे रशियातील राजकीय वर्तुळात भारतातील राष्ट्रवादी चळवळीविषयी आस्था निर्माण झाली. चीनमधील क्रांतिकारकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेनंच त्यांना चीनमध्ये पाठवलं.
प्रदीर्घ परदेश वास्तव्यानंतर १९३० साली रॉय गुप्तपणे भारतात परतले. ते भूमिगत असतानाच त्यांना पोलिसांनी अटक केली. कानपूर कटात प्रमुख आरोपी म्हणून सरकारनं त्यांना आधीच गोवलं होतं. तोच खटला पुढं चालून रॉयना कारावासाची सजा झाली. १९३० त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला
आपल्या क्रांतिकारक विचारांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न मानवेंद्रनाथ रॉय यांनी केला. सामान्य माणसाचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवायलाच हवं, पण केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरीही नष्ट व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांच्या मते समाजात फार मोठे बदल घडवून आणले पाहिजेत. समाजातल्या गरीब-श्रीमंत या भेदभावांना मूठमाती दिली पाहिजे. नाहीतर स्वातंत्र्याचा उपयोग फक्त भर लोकांनाच होईल आणि एकदा स आल्यावर मूठभर लोक ती गरिबांपर्यंत कधीच पोहोचू देणार नाहीत, म्हणून स्वातंत्र्यासाठी लढत असतानाच स्वतंत्र भारताची सत्ता सामान्य कामकरी वर्गाकडे जाईल, हे पाहिलं पाहिजे; म्हणजेच कामकरी वर्गाला त्याच्या परिस्थितीची यथार्थ जाणीव करून दिली पाहिजे. ही जाणीव निर्माण करणं हे स्वातंत्र्यलढ्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे. या जाणिवेतूनच ब्रिटिशांच्या भांडवलशाहीला. आणि तिच्या पायावर उभ्या असलेल्या साम्राज्यशाहीला सुरुंग लागेल, अशी रॉय यांची खात्री होती.
१९३९ मध्ये महायुद्ध सुरू झालं. रॉय यांचा पहिल्यापासूनच समा तत्वज्ञानाला विरोध होता. काँग्रेसनं इटली आणि जर्मनीमधील हुकुमशाह्यांना विरोध करावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. फॅसिस्टांविरुद्ध ब्रिटिशांना सहकार्य करण्याची त्यांची भूमिका काँग्रेसनं मान्य केली नाही; तेव्हा ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी पुरोगामी लोकशाही पक्षाची स्थापना केली.
स्वतंत्र भारताच्या सामाजिक व आर्थिक पुनर्रचनेचा एक योजनाबद्ध कार्यक्रम रॉय यांनी तयार केला होता. सत्तेचं विकेंद्रीकरण करणं, मानवी व्यक्तिमत्वाचा विकास साधणं आणि सहकारी तत्त्वावर आधारित अर्थव्यवस्था उभी करणं ही या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट होती.
आयुष्याच्या अखेरीस रोप प्रचलित साम्यवादापासून बरेच दूर गेले होते. आता ते केवळ वर्गकलहाची भाषा बोलत नव्हते. व्यक्ती, माणूस आणि त्याचं आयुष्य यांविषयी ते अधिक सखोल विचार करू लागले होते.
माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी आहे आणि तो स्वतच्या विश्वाचा शिल्पकार आहे. माणसाला आयुष्य एकदाच आणि ते सुखानं जगण्याचा त्याला हक्क आहे. आपलं आयुष्य आपल्या कल्पनेप्रमाणं जगण्याचा अधिकार आहे; परंतु त्यानं आपली किमानसामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे, म्हणजे समाजातील सर्व घटकांचं स्वातंत्र्य आणि उ यांसाठी सदैव प्रयत्नशील राहणं ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. रॉय यांच्या मते माणसा आपल्या सुखासाठी व समृद्धीसाठी समाजाची निर्मिती केली आहे, त्यामुळं समाजाखातर व्यक्तीचं हित डावललं जाता कामा नये..
रॉय यांचे हे विचार नवमानवतावाद म्हणून ओळखले जातात.
अशा या थोर विचारवंताचा २५ जानेवारी १९५४ रोजी हृदयविकारानं अंत झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा