मराठीतील लेखिका गौरी देशपांडे
जन्म. ११ फेब्रुवारी १९४२
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला.
प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते.
’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. गौरी देशपांडे यांचे निधन १ मार्च २००३ रोजी झाले.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा