*राजाराम मोहन रॉय*
आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल मधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.
नवाबाच्या दरबाराने ‘राय’ तर राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर (द्वितीय) याने सन्मानदर्शक पदवी त्यांना बहाल केली . एवढे मोठे कार्य त्यांनी पुढे केले .
त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर केले. त्यांना "राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर (द्वितीय) याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.
राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका" नावाचे वृत्तपत्र सुरु केले. ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले. त्यांनी मूर्तीपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला.
भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली. त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी "संवाद कैमुदी" हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात उल अखबार" हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.
राजा राममोहन रॉय यांना नवनिर्मितीचा काळ आणि आधुनिक भारताचे वडील मानले जाते. भारतीय सामाजिक आणि धार्मिक धर्मातच त्यांचे विशिष्ट क्षेत्र आहे. सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय होय. राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्या मधील पूल असं म्हटलं जातं. त्यांचे जीवन कार्य इतके प्रचंड आणि असाधारण आहे.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा