स्वातंत्र्यसेनानी #जगलाल_चौधरी (5 फेब्रुवारी 1895 - 1975) हे बिहारमधील महिला हक्क, दलित मुक्ती, शिक्षण आणि जमीन सुधारणांसाठी ओळखले जातात. गांधीजींच्या हाकेला साद देत चौधरी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण सोडून 1921 मध्ये असहकार चळवळीत सामील झाले.
मीठाच्या सत्याग्रहात व 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरूंगात टाकण्यात आले.
1942 मध्ये त्यांनी भारत छोडो चळवळीच्यावेळी गरखा येथील पोलिस स्टेशन व टपाल कार्यालय ताब्यात घेतले. यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या चळवळीच्या वेळी पोलिसांनी चौधरी यांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारले होते. 23 ऑगस्ट 1942 पासून 30 मार्च 1946 पर्यंत चौधरी तुरूंगातच राहिले.
#जगलाल हे पहिल्यांदा 1937 मध्ये बिहार विधानसभेवर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि ते सार्वजनिक आरोग्य व उत्पादन शुल्क प्रभारी मंत्री झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी 1952 च्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या लढविली आणि त्यानंतर 1957, 1962, 1967 आणि 1969 च्या निवडणूकीत गरखा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यांंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांंच्याविषयी अधिक माहितीसाठी वाचा-
https://en.wikipedia.org/wiki/Jaglal_Choudhary
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा