विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

समाजकारण /राजकारण

शास्त्रज्ञ /संशोधक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शास्त्रज्ञ /संशोधक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

श्रीनिवास रामानुजन

                                           


           *श्रीनिवास रामानुजन*


               (*भारतीय गणितज्ञ*)


*जन्मदिन - २२ डिसेंबर १८८७*

             (तंजावर)

*मृत्यू : २६ एप्रिल १९२०*                            श्रीनिवास रामानुजन भारतीय गणितज्ञ होते.

रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – २७ एप्रिल १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.      



भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन


  

*भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन*

.             (भारतीय शास्त्रज्ञ)

पूर्ण नाव : डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन                                                        *जन्म : ७ ऑगस्ट, १९२५ (कुंभकोणम तामीलनाडू)                                             मृत्यू : २८  सप्टेंबर, २०२३*                                               डॉ. स्वामीनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगची स्थापन केला.

👨🏻 *वैयक्तिक आयुष्य*

मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.

स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना १९५१ मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते. सौम्या स्वामीनाथन (एक बालरोगतज्ञ), मधुरा स्वामीनाथन (अर्थशास्त्रज्ञ) आणि नित्या स्वामीनाथन या त्यांच्या तीन मुली आहेत.


गांधी आणि रमण महर्षी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या २,००० एकरपैकी एक तृतीयांश त्यांनी विनोबा भावे यांच्या कारणासाठी दान केले. २०११ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंदांचे अनुसरण केले.


स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी २८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

🌀 *कारकीर्द*

कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.


🎖️ *डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार*

२०२४ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987

शांति स्वरूप भटनागर पुरस्कार 1961

जागतिक अन्न पुरस्कार 1987 हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान

अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार

🎯 *उल्लेखनीय*

ऑक्टोबर १९८७ मध्ये स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कारच्या सादरीकरणाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस, जॅव्हियर पेरेझ डी कुएललर यांनी लिहिले: "डॉ. स्वामीनाथन हे एक जीवंत आख्यायिक

आहेत. कृषी विज्ञानातील त्यांचे योगदान "भारत आणि विकसनशील जगात इतरत्र अन्न उत्पादनावर अविभाज्य छाप पाडली. कोणत्याही मानकांनुसार ते दुर्मिळ भेद असणारा जागतिक वैज्ञानिक म्हणून  इतिहासात नोंद घेतली जाईल. स्वामिनाथन यांचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात "आर्थिक पर्यावरणशास्त्र जनक" असे वर्णन केले गेले आहे.

टाईम मासिकाच्या १९९९ च्या २० व्या शतकातील २० सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीमध्ये भारतातील तिघांपैकी एक होते, इतर दोन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर." १९ ऑक्टोबर २००६ रोजी, आयोवा येथील डेस मोइन्समधील नॉर्मन ई. बोरलाग आंतरराष्ट्रीय संगोष्ठीमध्ये स्वामीनाथन वैशिष्ट्यीकृत वक्ता होते. त्यांचे मानव संसाधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे संबद्ध मानवता आयोवा यांनी प्रायोजित केले. स्वामीनाथन यांनी "तिसरे वार्षिक राज्यपाल व्याख्यान" सादर केले आणि "ग्रीन रिव्होल्यूशन रिडक्स: सर्व मानवी इतिहासामध्ये अन्न उत्पादनाचा एक सर्वात मोठा कालावधी पुन्हा बनवू शकतो?" च्या सांस्कृतिक आणि सामाजिक पायाविषयी भारतातील हरितक्रांती आणि तेथील हरित क्रांतीला प्रेरणा देणारी महात्मा गांधी यांच्यासारख्या भारतातील ऐतिहासिक नेत्यांची भूमिका, व्यापक भूक निर्मूलनाची हाक देऊन. त्यांनी गांधी आणि आयोवाचे थोर वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हर यांच्यातील संबंधांविषयी सांगितले. 


       

इस्रोचे प्रमुख व भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी के सिवन

इस्रोचे प्रमुख व भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी के सिवन 

जन्म. १४ एप्रिल १९५७ तमिळनाडुतील कन्या कुमारी जिल्ह्यातील  सरक्कजलविलई गावी.

'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी १९ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण केले, पण लॅण्डरचा संपर्क तुटल्याने ते पुढील मिशन यशस्वी होऊ शकले नाही. सिवन यांनीच विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्याची घोषणा केली होती. त्यावेळीच त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. ते विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्यानंतरही मोदींशी चर्चा करताना त्यांना माहिती देताना दिसले. चंद्रयानचे यशस्वी प्रक्षेपण झाले त्यावेळी ‘भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे’ अशा शब्दांमध्ये चंद्रयान मोहिमेचे मुख्य के. सिवान यांनी या मोहिमेचे वर्णन केले होते.  

डी.के.सिवन यांचे पूर्ण नाव कैलासावडिवू सिवन पिल्लणई आहे. डी.के.सिवन यांच्या वडीलांचे नाव कैलासवदिवू असून आईचे नाव चेल्लम आहे. नागरकॉइलसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या सिवान यांना सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांना एस.टी. हिंदू कॉलेजात गणिताची निवड करावी लागली होती. गणितात ते हुशार होते. इतर चार विषयांतही शंभर टक्के गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून त्यांना मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळू शकला. सिवान यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेत जमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. मिसाइल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेचे माजी विद्यार्थी होते त्याच संस्थेत सिवान शिकले. कलाम हे चौथ्या बॅचचे विद्यार्थी होते तर सिवान हे २९ व्या बॅचचे विद्यार्थी होते. म्हणजेच कलाम यांच्यानंतर बरोबरच २५ वर्षांनी तेच विषय घेऊन सिवान यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला होता.

१९८२ मध्ये सिवान इस्रोत काम करू लागले. त्यानंतर ३६ वर्षांनी त्यांना इस्रोच्या प्रमुखपदाचा मान मिळाला. कन्याकुमारी जिल्ह्य़ातील तरक्कनाविलाय या छोटय़ा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पालिकेच्या शाळेत तमिळ भाषेतून शिक्षण घेतलेला मुलगा इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनला. मेहनत व अभ्यासाच्या जोरावर फाडफाड इंग्लिशच्या जमान्यात तमिळ भाषेचे बोट धरून ते सर्वोच्च पदावर पोहोचले यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.

२०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सिवान यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. फेरवापराच्या अवकाश प्रक्षेपकांची अतिशय आव्हानात्मक योजनाही त्यांच्याच प्रयत्नांमुळे पार पाडता आली. १९८० मध्ये ते हवाई अभियांत्रिकी विषयात मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदवीधर झाले. नंतर त्याच विषयात आयआयएस्सी संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेऊन, २००६ मध्ये मुंबई आयआयटीतून पीएचडी झाले.

सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार असे अनेक मानसन्मान डी.के.सिवान यांना मिळाले आहेत.

श्रीनिवास रामानुजन



           *श्रीनिवास रामानुजन*


               (*भारतीय गणितज्ञ*)


*जन्मदिन - २२ डिसेंबर १८८७*

             (तंजावर)

*मृत्यू : २६ एप्रिल १९२०*                    

        श्रीनिवास रामानुजन भारतीय गणितज्ञ होते.

रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – २७ एप्रिल १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.      


🙏🙏🙏

श्रीनिवास रामानुजन

अलौकिक गणिती श्रीनिवास रामानुजन 

जन्म. २२ डिसेंबर १८८७

वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसर्याद विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी. एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला १९१४ मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी १९१९ मध्ये ते मायदेशी परतले. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे.अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.

रामानुजन सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामाककलची नामगिरी ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडत. त्यात असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यांच्या मते, गणिती सूत्र म्हणजे देवाच्या मनातील विचार, असा होता. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे दिसत, रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल 





रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. १९९७पासून ‘द रामानुजन जर्नल नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडित असे दर्जेदार शोध लेख प्रसिद्ध होतात. 



आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली.

रामानुजन यांनी प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत काम केले. त्यांनी मांडलेल्या जवळपास ४००० सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत. रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले.

भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे

 

 भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे 

जन्म. २९ एप्रिल १८६७ 

थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मा. शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. 'आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे,' असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेला हा शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपीयन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं. त्यात युरोपीय शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर ताशेरे ओढले होते. ''संशोधन करून एखादं नवं यंत्र तयार करण्याचं तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही. फार तर ते यंत्र चालवू शकतील, फारच झालं तर त्या यंत्राची नक्कल करतील. यापलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही.'' असा उल्लेख त्यात होता. भारतीय शास्त्रज्ञांबद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेलं बेलगाम विधान ऐकून धुळ्याच्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरडय़ा मुलाने युरोपीयांचं हे विधान त्यांच्याच धरतीवर जाऊन त्यांनाच पुसायला लावीन, असा निर्धार केला. लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता,

''माझ्या काटय़ावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारं यंत्र शोधून काढ.'' असं त्या वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं. त्यावेळी 'एक दिवस तुला असे यंत्र देईन,' असं ठामपणे छोटे शंकरराव त्याला म्हणाले. त्यावेळी आपल्या मुलाची यंत्रांची ही आवड पाहून वडिलांना आनंद वाटला होता. पण सरकारी नोकरीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी शंकररावांनाही ३० रुपये महिना पगारावर कारकुनाच्या नोकरीवर ठेवलं. याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७ मध्ये 'इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड

सायंटिफिक रेकॉर्ड' या मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र.

शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले. यानंतर १९०० मध्ये भिसे यांचं लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागलं. त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी 'भिसोटाइप' या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये एकस्व (पेटंट) घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून 'द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट' ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली; पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटाला साधारणबाराशे अक्षरं छापणारं 'गुणित मातृका' हे यंत्र तयार केलं आणि

१९१६ मध्ये ते विक्रीला आणलं. १९१६ साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी 'युनिव्हर्सल टाइप मशीन' या कंपनीच्या विनंतीनुसार 'आयडियल टाइप कास्टर' हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं एकस्व घेतलं. या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी 'भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन' ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणलं. याशिवाय मुद्रण व्यवसायातली आणखी अशी अनेक यंत्रे त्यांनी तयार केली. १९१०मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. १९१४ साली भिसेंनी स्वतच एक नवीन औषध तयार करून त्याला 'बेसलीन' हे नाव दिले. हे

औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या औषधावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेलं, पण पोटात घेता येईल असं एक औषध त्यानंतर भिसेंनी तयार केलं आणि त्याच्या उत्पादनासाठी १९२३ मध्ये न्यूयॉर्क इथे कंपनी स्थापन केली. १९२७ मध्ये या औषधाचं उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. या औषधास त्यांनी 'आटोमिडीन' (आण्विय आयोडीन) हे नाव दिलं. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरलं. १९१७ साली त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असं एक संयुग तयार केलं. त्याला 'शेला' हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले. भिसे यांनी विद्युत शास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं. त्यांनी तयार केलेल्या 'स्वयंचलित आगामी स्थानदर्शक' यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला. सध्या चच्रेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच! समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी दिली. २९ एप्रिल १९२७ रोजी भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत 'अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ' म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना 'इंडियन एडिसन' हे बिरुद बहाल केलं होतं. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले. मुद्रणशास्त्रातील भिसे यांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकन पाठय़पुस्तकांत झाला. १९०० साली मद्रास येथे भरलेल्या इंडियन इंडस्ट्रियल काँग्रसचे ते अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या जागतिक दर्जाच्या 'हुज हू' या संदर्भग्रंथात समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय. 'भारताचे एडिसन' असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी २३ डिसेंबर १९३० रोजी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची

त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली. मा.शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत. मा.शंकर आबाजी भिसे यांचे निधन ७ एप्रिल १९३५ रोजी झाले. 

🙏🙏🙏

Popular Posts