विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

संत तुकाराम महाराज


                                संत तुकाराम महाराज 


जन्म - १ फेब्रुवारी १६०७ देहू,पुणे

- ९ मार्च १६५० (देहू,पुणे)


*आई* : कनकाई 

*वडील* : बोल्होबा

*पत्नी* : आवली (जिजाई)

*अपत्ये* : महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

*संप्रदाय* : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय 

*गुरू* : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर

*शिष्य* : संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवानबाबा

*साहित्यरचना* : तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)

*कार्य* : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

*तीर्थक्षेत्र* : देहू

*व्यवसाय* : वाणी


संत तुकाराम महाराज यांचे नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) होते. त्यांचे घराणे मोरे क्षत्रिय आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 

संत तुकाराम (तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. ते लोककवी होते.


तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. 

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य त्यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.


तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना त्यांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग लिहिण्याचे काम केले.

देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.


फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम हे मराठीतील ख्यातनाम संत आहेत.


संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.

संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा 'गीतगाथा' हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.


तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.


१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढण्यात आले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता.

हा चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर अॅन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.


१९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक होते सुंदराराव नाडकर्णी. १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या. त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता, आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती. यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'. २०१२ सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता.


'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक होते जितेंद्र वाईकर.


*संदर्भ - नेट वरून संग्रह 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा