विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विश्वनाथन आनंद

 बुद्धीबळ म्हटलं तरी आपल्या समोर पहिले नाव येते ते म्हणजे विश्वनाथन आनंद. पाचवेळचे विश्वविजेते असलेले भारताचे दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी केवळ इतिहासात त्यांचे नावच कोरले नाही, तर भारतात बुद्धीबळ खेळण्यासाठी अनेकांना प्रोत्साहीतही केले. 

यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये तमिळनाडूमध्ये झाला. त्यांची आई बुद्धीबळपटू होती. त्यामुळे बुद्धीबळ खेळण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. त्यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून बुद्धीबळ खेळण्यात रस घेण्यास सुरुवात केली. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरूही ठरली.


आनंद यांचे वडील दक्षिण रेल्वेमध्ये नोकरीला होते. 

आनंद यांना 'विशी' आणि 'टायगर ऑफ मद्रास' अशा टोपन नावानेही ओळखले जाते. 

त्यांनी चेन्नईतील लोयोला कॉलेज, चेन्नई येथून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.  

आनंद यांना लहान वयापासून यशाची चव चाखायला मिळाली होती. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी 1983 साली नॅशनल सब-ज्यूनियर चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. त्यांनतर पुढच्याच वर्षी ते इंटरनॅशनल मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारे सर्वात युवा भारतीय ठरले होते. त्याच्या पुढच्यावर्षी ते पहिल्यांदा नॅशनल चेस चॅम्पियन बनले. 

साल 1987 मध्ये ते वर्ल्ड ज्यूनियर चेस चॅम्पियनशीप जिंकणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू ठरले. त्यानंतर एकवर्षाने त्यांनी शक्ती फायनान्स इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून ते भारताचे पहिले ग्रँडमास्टरही बनले.


त्यानंतर 2000 साली त्यांनी एफआयडीई वर्ल्ड चेस चॅम्पिटनशिप पहिल्यांदा जिंकली. त्यावेळी त्यांनी अलेक्झी शिरोव यांना अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

साल 1987 मध्ये ते वर्ल्ड ज्यूनियर चेस चॅम्पियनशीप जिंकणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू ठरले. त्यानंतर एकवर्षाने त्यांनी शक्ती फायनान्स इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून ते भारताचे पहिले ग्रँडमास्टरही बनले.


त्यांच्या यशाचे बक्षीस म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांना 1991-92 साली भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (आताचा मेजर ध्यानचंद खेलरत्न) देण्यात आला होता. हा पुरस्कार जिंकणारे ते पहिलेच खेळाडू होते.


आनंद यांनी सहा वेळा चेस ऑस्कर देखील जिंकला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून दरवर्षी सर्वोत्तम बुद्धीबळपटूला देण्यात येतो.आनंद यांना 1997, 1998, 2003, 2004, 2007 आणि 2008 साली हा पुरस्कार मिळाला आहे.

विशेष गोष्ट अशी की विश्वनाथन आनंद तमिळ आणि इंग्लिंश या भाषांबरोबरच फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या भाषाही बोलतात.. धन्यवाद 

🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा