समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

चंदा कोचर




चंदा कोचर



किंग आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या यशोशिखरावरचं एक  नाव म्हणजे चंदा कोचर


 ... करियर करताना कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांसाठी आयकॉन ठरलेल्या चंदा कोचर यांचं वास्तविक स्वप्न होतं आयएएस ऑफिसर होण्याचं. मात्र, 'मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमधून अर्थशास्त्रातली पदविका, जमनालाल बजाज संस्थेत फायनान्समधून एमबीए केल्यानंतर आयसीआयसीआयच्या कॅम्पस् मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. आयसीआयसीआयमध्ये कोचर यांच्या काम आणि गुणवत्तेमुळे त्यांचे अनेक वरिष्ठ सहकारीदेखील प्रभावित झाले होते. २००० मध्ये बँकेच्या रिटेल ऑपरेशन्स विभागाच्या प्रमुखपदी असताना कोचर यांनी बँकेचा रिटेल बिझनेस • ६७ टक्क्यांनी वाढवला. कोचर यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने देशभरात २,९०० शाखांसह देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होण्याचा मान पटकावला. गुणवत्तापूर्ण कामामुळे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी सर्वोच्च बैंकिंग संस्थेत सीईओ होण्याचा मान पटकावणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. 'फोर्ब्स' आणि 'फॉर्च्यून' मासिकांच्या मोस्ट पॉवरफूल वुमन्सच्या यादीत सातत्याने आपले स्थान राखणाऱ्या व्यक्तींपैकी चंदा कोचर या एक आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०१० मध्ये त्यांना 'पद्मश्री'ने गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा