विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

पत्रकार संपादक चरित्रकार वि स वाळिंबे

 पत्रकार संपादक  चरित्रकार वि स वाळिंबे

जन्म. ११ ऑगस्ट १९२८ 

विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. १९४८ साली गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते . या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.इ.स. १९६२-६३च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पण त्यांचे या विषयांवरचे लेखन कधी इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या भरात क्लिष्ठ, कोरडे आणि कर्कश झाले नाही, की इतिहासाला जिवंत, थरारक करण्याच्या नादात भावविवश किंवा भावगौरवात्मकही झाले नाही. वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते. त्यांच्या लेखणीला ती एक सिध्दीच होती. प्रसंगातले नाट्य अचूक टिपण्याच्या त्यांच्या मार्मिकतेमुळे वाचकाला अपूर्व समाधान मिळते. त्यांचा हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते; पण त्यांच्या लेखणीचे बळ केवळ तेवढेच नाही. घटना - प्रसंगांचे अंत:प्रवाह शोधणार्या् त्यांच्या बारकाव्यात ते आहे, मोठ्या पार्श्वपटावर लहान घटना पाहण्याच्या जाणकारीत आहे, संदर्भांची विविधता आणि त्यातून घटना-प्रसंगांना मिळत जाणारी दिशा यांकडे लक्ष पुरवण्याच्या त्यांच्या दक्षतेत आहे आणि व्यक्तीच्या मर्मस्थानांविषयी अतिशय कुतूहल बाळगणार्याप त्यांच्या प्रगल्भ जीवनदृष्टीत आहे.


नेताजी - मेहता प्रकाशन ----वुइ दि पीपल अनुवाद् मेहता प्रकाशन -------स्वातंत्र्यवीर सावरकर-नवचैतन्य प्रकाशन ------वुइ दि नेशन अनुवाद मेहता प्रकाशन ------गरुडझेप - अभिजित प्रकाशन ------जय हिंद आजाद हिंद - मेहता प्रकाशन --------सावरकर-अभिजित प्रकाशन ---------वॉर्सा ते हिरोशिमा - मेहता प्रकाशन --------आज इथे : उद्या तिथे मेहता प्रकाशन -------फसलेला क्षण मेहता प्रकाशन -----कथा ही दिवावादळाची मेहता प्रकाशन -------ऑपरेशन थंडर मेहता प्रकाशन -------युवराज नवचैतन्य प्रकाशन --------एडविना आणि नेहरू मेहता प्रकाशन --------हिटलर मॅजेस्टिक प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा