१९ जुलै इ.स.१२९५
संत सावता माळी यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सावता माळी हे संत ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० भेंड .ता.माढा. जि.सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. त्यांचे वडील पूरसोबा आणि आई हे धार्मिक वळणाचे होते, पूरसोबा शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत व पंढरीची वारी करीत असत.
कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधिही पंढरपूरला गेले नाहीत असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. प्रत्यक्ष ते कर्ममार्गी संत होते.त्यांनी अध्यात्म आणि भक्ती,आत्मबोध आणि
लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तीर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा सावता माळी यांनी विचार मांडला
ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ती होऊ शकते, असे म्हणणार्या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.
”कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll
लसूण मिरची कोथिंबिर l अवघा
झाला माझा हरी ll ”
सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख आणि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l
सावता माळी यांनी नरहरी सोनार आणि सेना न्हावी यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्यप्रचार, शब्द अभंगात वापरले.तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची ,नव्या उपक्रमांची त्यामुळे भर पडली. कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे.अशी शिकवण वारकरी सावता माळी यांनी दिली.वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.आजही पंढरपूरच्या श्री.विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयाला येत असते. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी प्रवृत्ती मार्ग शिकवण देणारे संत आहेत .श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. अध्यात्म ,भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य, सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीही भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले.अंत्यशुद्धी ,तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता ,सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग ,होम, जप ,किर्तन, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे .सावता माळी शेत सोडून कधीही पंढरपूरला आले नाहीत, असे मानले जाते. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही तर, आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराज यांना भेटायला येते. आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन .तर अमावस्या हा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी पंढरपूर वरून निघालेली पांडुरंगाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.
दिनांक 19 जुलै इ.स.१२९५ रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. एकाच जागी स्थीर राहून अंधार्या रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करणारे, धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देणारे, एका जागी स्थीर राहून विठ्ठल भक्तीचा दीप लावूण उजळणारे , सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्व आणि प्रभावी कर्तृत्व यांची उज्वल यशोगाथा लाख-मोलाची ठेव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा