लाला लजपतराय यांना 'पंजाबचा सिंह' म्हणून ओळखले जाते. यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील धुंढिके येथे 28 जानेवारी 1865 रोजी झाला. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. एक वेळा वाचन केलेले त्यांचे पाठांतर सहज होत होते. १८८१ साली त्यांनी मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण केली.
राधाकिशन आणि गुलाबदेवी हे त्यांचे आईवडील. त्यांचे सुसंस्कार बालपणापासूनच लाभले. १८८५ मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १८७७ मध्ये आर्य समाजाचे दयानंद सरस्वती पंजाबात आले होते. त्यांचे प्रभावशाली भाषण ऐकून लालाजींच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यांना दयानंद सरस्वतीचे सर्व विचार पटले आणि ते त्यांचे अनुयायी झाले.लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज उभारण्याचे ठरले, त्या वेळी लालाजींनी अथक प्रयत्न करून पाच लाख रुपये जमविले आणि कॉलेजची उभारणी केली. त्याच कॉलेजमध्ये ते इतिहास हा विषय शिकवत होते. समाजातील दुःख ते पहात होते. त्यामुळे आपण सेवेसाठी पुढे आले पाहिजे, हे त्यांनी जाणले. अनाथ मुलांचे ते पालन करत होते. विधवा स्त्रियांना खंबीरपणे जीवन जगण्याचा मार्ग दाखवीत होते. कोठे भूकंप जरी झाला, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तरी त्या ठिकाणी जाऊन ते सेवा करीत असत. हळूहळू ते भारतातील दुःखी-कष्टी लोकांशी एकरूप होऊ लागले
१८९७ साली मध्यप्रदेशात दुष्काळ पडला. सतत तीन वर्षे दुष्काळ होता. त्या वेळी आर्य समाजाचा कार्यकर्ता या नात्याने लालाजींनी सेवाकार्य सुरू केले. स्वतः अपार कष्ट करून समाजाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाच्या वेळी ख्रिस्ती मिशनरी भारतातील गरीब लोकांना मदतीचे आश्वासन देऊन हिंदूंचे धर्मांतर करीत असत. लालाजी वकील होते. त्यांनी हे कारस्थान जाणले आणि कायदयाच्या आधारे धर्मांतरावर बंदी आणली.
लालाजींनी जहालमतवादी असलेल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे भाषण ऐकले, सुरेंद्रनाथांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल जी मते भाषणातून मांडली, त्याचा प्रभाव लालाजींवर पडला. १८ व्या शतकात इटलीत जोसेफ मॅझिनी यांनी जे कार्य केले त्याचाही प्रभाव लालाजींवर पडलेला होता. आपला राजकीय गुरू म्हणून 'जोसेफ मॅझिनींना मानून लालाजींनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाला चालना देण्याच्या कार्याला लालाजींनी प्राथमिकता दिली. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांची भाषणे होऊ लागली. संपूर्ण हिंदुस्थानात ब्रिटिश्यांच्या विरोधात जनमत संघटित करण्यावर लालाजींनी भर दिला.
१९०५ साली काँग्रेसने त्यांना भारतीयांच्या मागण्यांसाठी ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराच्या वर्णनासाठी इंग्लंडला पाठविले. त्या वेळी त्यांना खर्चासाठी ३००० रुपये दिले; परंतु त्यांनी ते आर्य समाजाला दिले आणि स्वत:च्या खर्चाने इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी आपली बाजू ठामपणे मांडली. याच वर्षी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली; परंतु बिपीनचंद्र पाल, लोकमान्य टिळक व लालाजींनी एकत्र येऊन बंगालची फाळणी रद्द करून टाकली.
लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज उभारण्याचे ठरले, त्या वेळी लालाजींनी अथक प्रयत्न करून पाच लाख रुपये जमविले आणि कॉलेजची उभारणी केली. त्याच कॉलेजमध्ये ते इतिहास हा विषय शिकवत होते. समाजातील दुःख ते पहात होते. त्यामुळे आपण सेवेसाठी पुढे आले पाहिजे, हे त्यांनी जाणले. अनाथ मुलांचे ते पालन करत होते. विधवा स्त्रियांना खंबीरपणे जीवन जगण्याचा मार्ग दाखवीत होते. कोठे भूकंप जरी झाला, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तरी त्या ठिकाणी जाऊन ते सेवा करीत असत. हळूहळू ते भारतातील दुःखी-कष्टी लोकांशी एकरूप होऊ लागले
पंजाबमधील शेतकऱ्यांना सरकारविरुद्ध चेतावणी देतात, या आरोपाखाली लालाजींना सहा महिने ब्रिटिशांनी मंडाले कारागृहात पाठविले. मंडालेच्या तुरुंगात राहून ते देशाच्या स्वातंत्र्याचे चिंतन करत होते. तुरुंगातून सुटल्यावर ते लाहोरला परत आले. सरकारी हेर आपल्यामागे आहेत याची माहिती होताच ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील भारतीयांना स्वातंत्र्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले. त्यातून ते भारतीय स्वातंत्र्याचे विचार सातत्याने मांडत होते.
अमेरिकेतून आठ वर्षांनी ते परत आले. १९२० मध्ये भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. असहकार करण्याचा ठराव या सभेत मंजूर झाला. पुन्हा कारावास झाला. पुन्हा ते मोतीलाल नेहरू व चित्तरंजनदास यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षात सामील झाले. पुढे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून आले व त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.
आर्य समाजामुळे हिंदूंबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर होता. त्यांनी श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. 'अनहॅपी इंडिया, दि व्हाईस ऑफ टूथ, दि एसेम ऑफ दि ईस्ट' इत्यादि ग्रंथ लिहिले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी 'सायमन कमिशन' लाहोरला भेटीसाठी आले होते. त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे घेऊन लालाजींनी पुढाकार घेतला. त्या वेळी ब्रिटिश पोलिसांनी लालाजींवर लाटी हल्ला केला. त्यात जखमी झाल्यामुळे पुढे दोन आठवड्यांनी, हा पंजाबचा सिंह 17 नोव्हेंबर 1928 रोजी अनंतात विलीन पावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा