अंतराळ वीरांगना
सुनीता विल्यम्स
महिला अंतराळ यात्रीने केलेला सर्वाधिक प्रदीर्घ १९५ दिवसांच्या अंतराळ प्रवासाचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, त्या सुनीता विल्यम्स या 'भारतीय-अमेरिकन' म्हणजेच मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत.
सुनीता अमेरिकेच्या नेव्हल अकादमीमधून १९८७ साली पदार्थविज्ञान शास्त्राच्या पदवीधर झाल्या. सन १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून अभियांत्रिकी व्यवस्थापनातील एम. एस. ही उच्च पदवी त्यांनी मिळवली. सुनीता 'नासा'च्या अंतराळयात्री आहेत, हे आपल्याला माहिती आहे. तशाच त्या अमेरिकेतील नौसेनेच्या अधिकारी आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या आणि १५ व्या मोहिमेत सहभागी होऊन त्या जगातील लोकप्रिय साहसवीर ठरल्या आहेत.
ही अंतराळ मोहीम ९ डिसेंबर २००६ ते २२ जून २००७ या कालावधीत पार पडली. याच कालावधीत २९ तास आणि १७ मिनिटांचे चार 'स्पेस वॉक' त्यांच्या नावावर आहे. हा विक्रम करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला साहसवीर आहेत. २२ जूनला कॅलिफोर्नियातील एडवर्डस विमानतळावर सहकाऱ्यांसह त्यांचे पृथ्वीवर झालेले स्वागत अपूर्व होते.
सुनीता विल्यम्स यांनी आजवर अंतराळात ३२२ दिवस व्यतित केले असून त्यांची ही कामगिरी अमेरिकेतील ६ व्या क्रमांकावरील, तर महिलांतील दुसऱ्या क्रमांकावरील अंतराळवीर अशी ठरली आहे.
👍👍👌👌
उत्तर द्याहटवा