विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

 * वाचे उच्चारी।तैसी  क्रिया करी तीच नरनारी । पूजनीय॥सेवा परमार्थ ।पाळी व्रत सार्थ  होई कृतार्थ ।ते वंद्य॥सुख दुःख काही!।स्वार्थपणा नाही परहित पाही।तोच थोर ॥ मानवाचे नाते । ओळखती जे ते सावित्री वदते ।तेच संत ॥सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि  विद्याग्रहण करणाऱ्या पहिल्या महिला देखील आहेत.



आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.


सावित्रीबाईंचा विवाह –  

सावित्रीबाईंचा विवाह ज्या काळात झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.


ज्योतिबांनी केले शिक्षीत - 

त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहा-वाचायाला शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने

 समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. 


सवित्रीबाईंची त्याकाळी समाजाकडुन होणारी अवहेलना -

पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्याही वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.

सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.


अनेक शाळांची निर्मीती -

ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.


इतर क्षेत्रातील कार्य -

केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. विधवांची परिस्थीती सुधारावी म्हणुन, बालकांच्या हत्या थांबाव्यात (विशेषतः स्त्रि भृण हत्या) म्हणुन त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केलं.


कवियत्री सावित्रीबाई - 

सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर”  यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.


सावित्रीबाईंचे निधन - 

ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 🙏🙏

६ टिप्पण्या: