मेजर ध्यानचंद
मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद येथे झाला. लहानपणी ध्यानचंद यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल होता. १९२२ साली ते सैन्य दलात ब्राम्हण रेजिमेंटमध्ये दाखल झाले. लष्करामध्ये असताना ते सुभेदार मेजर भोला तिवारी यांच्या संपर्कामध्ये आले. त्यांनीच ध्यानचंद यांना हॉकी खेळण्यासाठी प्रेरित केले.
१९२६ साली न्यूझीलंडच्या दौऱ्यात ध्यानचंद यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचा परिणाम म्हणून ते १९२८ मध्ये अमस्टरडॅम येथे होणाऱ्या ऑलिंम्पिक हॉकी स्पर्धेत त्यांची निवड झाली. ध्यानचंद सेंटर फॉरवर्ड जागेवर खेळत असता अॅमस्टरडॅम येथे ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताच्या विजयात ध्यानचंद यांच्या कामगिरीचा हातभार मोठ्या प्रमाणात लागला व भारताने वि ऑलिंम्पिक सुवर्णपदक प्राप्त केले. १९३२ साली लॉस एन्जिलिस येथे होणाऱ्या ऑलिंम्पिक स्पर्धेत ध्यातचंद भारतीय संघाकडू खेळले. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे २४ गोल नोंदविले गेले. त्यापैकी ८ गोल एकट्या ध्यानचंद यांनी नोंदविले होते. ऑलिंम्पिक जगतातील हा उच्चांकच आहे. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले.
१९३६ मध्ये बार्लिन ऑलिंम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांनी मागील कामगिरी लक्षात घेऊन भारतीय संघाच्या कप्तानपदी त्यांची निवड करण्यात आली. बर्लिन ऑलिंम्पिकमध्ये ध्यानचंद हे किर्तीच्या शिखरावर आरूढ झाले. त्यांच्या नेत्रदिपक खेळामुळे सारे जग भारले होते. 'हॉकी म्हणजे ध्यानचंद' असे समीकरण झाले.
प्रत्यक्ष क्रीडांगणावर प्रतिपक्षाच्या कशा प्रकारे हालचारी होतील, त्यासाठी कोणता चक्रव्यूह रचावयाचा याचा संपूर्ण आराखडा ध्यानचंद मनात तयार करीत व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करीत. ध्यानचंदांची नजर ससाण्यासारखी तीक्ष्ण तर त्यांच्या धावण्याच्या गतीची तुलना फक्त शिकारी कुत्र्याशीच होऊ शकेल. प्रतिस्पर्ध्याच्या हद्दीत शिरून चेंडूवर तुटून पडण्याऐवजी स्टीकने तो लीलया कसा आणि शत्रूवर गोल कसे चढवायचे हे फक्त ध्यानचंदच जाणत. छे, खेळाडू कसले, ध्यानचंद हॉकीचे जादूगार आहेत, असे त्यांच्याबद्दल म्हटले जाई. तमाम प्रेक्षक त्यांच्यावर इतके लट्टू झाले की "हॉकीचे जादूगार" या बरोबर त्यांनी ध्यानचंद यांना 'जर्मन ध्यानचंद' असा प्रेमाचा किताब बहाल केला.
१९३८ मध्ये ध्यानचंद यांना सेनादलचे व्हाईसरॉय कमिशन देण्यात आले. १९३४ साली ध्यानचंद यांना किंग कमिशन देण्यात आले. सैन्यातून सेवानिवृत्त होताना मेजर हे बहुमानाचे पद त्यांना प्राप्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी खेळाडूंना हॉकीचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. अशा या थोर खेळाडूंचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम !
Mast
उत्तर द्याहटवा