विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

राजा राममोहन रॉय

 राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३)


• राममोहन रॉय यांचा जन्म मार्च १७७२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये राधानगर येथे झाला. त्यांना 'भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत', 'आधुनिक भारताचे जनक', 'पहिले आधुनिक भारतीय 'व्यक्ती' अशा विविध संज्ञांनी ओळखले जाते.


• त्यांनी १८०३ ते १८१५ दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत 'मुन्शी' म्हणून कार्य केले. त्यादरम्यान व त्यानंतर त्यांनी देशाच्या सामाजिक, धार्मिक, बौद्धिक व राजकीय पुनरूज्जीवनासाठी आयुष्यभर कष्ट घेतले.


•१८३० मध्ये ते इंग्लंडला गेले. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले शिक्षित भारतीय व्यक्ती होते. मुघल बादशाहा अकबर दुसरा याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी देऊन पेन्शनवाढीसाठी आपला वकील म्हणून इंग्लंडला पाठविले होते. १८३३ मध्ये इंग्लंडमध्ये असतांना ब्रिस्टॉल येथे त्यांचा मृत्यू झाला.


• राममोहन रॉय यांचे भारताच्या प्रबोधनात अग्रेसर तसेच मध्यवर्ती स्थान आहे. त्यांना आधुनिक भारताचे पहिले थोर नेतृत्व म्हणून गणले जाते. जात व परंपरांच्या प्रभावाखाली भारतीय समाज त्यावेळी गतिहिन व भ्रष्ट झालेला पाहून त्यांना दुःख होत असे. जनधर्म अंधश्रद्धांनी ग्रासलेला होता, ज्याचा फायदा अज्ञानी व भ्रष्ट पुरोहित वर्ग घेत असे. वरीष्ठ वर्ग स्वार्थी बनला 

होता. ज्यांना सामाजिक हितसंबंधाऐवजी स्वतःच्या संकुचित हितांची अधिक चिंता होती.


• राममोहन रॉय यांना पौर्वात्य पारंपरिक तत्वज्ञानाप्रती अती प्रेम व सन्मान होता, मात्र भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केवळ आधुनिक संस्कृतीच करू शकेल यावर त्यांचा विश्वास होता शुद्ध वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबरच म प्रतिष्ठा व सर्व पुरुष व महिलासाठी सामाजिक समानतेच्या तत्त्वाचा स्विकार करावा, असे त्याचे ठाम मत होते. देशात आधुनिक भांडवलशाही उद्योग लागू करावे, असेही त्यांचे मत होते.


भाषा व साहित्याचा अभ्यास


• राममोहन रॉय हे पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचे एकत्रीकरण होते. मूळ धर्मग्रंथाचे वाचन करता यावे म्हणून त्यांनी डझनभर भाषाचे अध्ययन केले: संस्कृत, पर्शियन, अरेबिक, झग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू इत्यादी तरुणपणीच त्यांना वाराणसी येथे संस्कृत साहित्य व हिंदू तत्वज्ञानाचा, तर पाटणा येथे कुराण व पर्शियन व ओबिक साहित्याचा अभ्यास केला होता. त्याचा जैनधर्म व इतर धार्मिक चळवळीचा व पंथाचाही चागला अभ्यास होता. नंतर त्यांनी पाश्चिमात्य विचार व संस्कृतींचा खोलवर अभ्यास केला मूळ बायबलचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ग्रीक व हिब्रू भाषा शिकून घेतल्या.


• त्यांचा एकेश्वरवादा वा (Monotheism) विश्वास होता. तसेच त्यांनी मुर्ती पुजेला विरोध केला. १८०९ मध्ये त्यांनी एकेश्वरवादाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पर्शियन भाषेत हफत-उल-मुजाहिदीन किंवा एकेश्वरवाद्यांसाठी देणगी (A Gift to Monotheists) हा प्रबंध लिहिला. त्यामध्ये अनेक देवतांवर विश्वास ठेवण्याच्या विरुद्ध व एकाच देवाची पूजा करण्याच्या बाजुने अनेक मते मांडली.


आत्मीय सभा


• राममोहन रॉय १८१४ मध्ये कलकत्याला स्थायिक झाले. १८१५ मध्ये त्यांनी त्यांच्या तरूण सहकाऱ्याच्या मदतीने 'आत्मीय सभेची स्थापना केली. एकेश्वरवादाचा प्रसार व हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरांच्या विरूद्ध लढा देणे, ही त्यामागील कारणे होती. त्यानुसार त्यांना मुर्ती पुजा, जातीव्यवस्थेची कठोरता, अर्मिक कर्मकाविरुद्ध चळवळ उभी केली. या प्रथांना प्रोत्साहित करण्याबाबत पुरोहित वर्गावर टिका केली. हिंदू प्रमुख प्राचीन धर्मग्रंथ एकेश्वरवादाचीच शिक देतात, असे मत व्यक्त केले. त्यानी आपले मत सिद्ध करण्यासाठी वेद व पाच प्रमुख उपनिषदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. तसेच अनेक लघु पुस्तिका लिहिल्या. मानवी बुद्धिप्रामाण्यावर विश्वास


● आपल्या तत्वज्ञानविषयक मतांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी मानवी तर्कशक्तीच्या / बुद्धिप्रामाण्याच्या शक्तीवर अंतिम भर दिला कोणत्याही तत्वज्ञानाची सत्यता तर्कशक्तीच्याच आधारावर पारखून पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी मत मांडले. त्यांच्या मते, वेदांत तत्वज्ञानही बुद्धिप्रामाण्यवादाच्या तत्वावरच आधारलेले आहे. धार्मिक पुस्तके, धर्मग्रंथ व रूढीपरंपरा जर मानवी तर्काला पटत नसतील किंवा धोक्याच्या ठरत असतील, तर त्यांचा त्याग करण्यास मागेपुढे पाहू नसे, असे त्यानी मत मांडले.


• राममोहन रॉय यानी मानवी तर्कशक्ती व बुद्धिप्रामाण्याचे तत्व केवळ भारतीय धर्म-परंपरांनाच नागू केले नाही, तर ख्रिश्चन धर्मालाही लागू केले. त्यासाठी त्यांनी १८२० मध्ये The Precepts of Jesus, the Guide to Peace and Happiness हे पुस्तक प्रकाशित केले. त्यामध्ये येशू ख्रिस्ताचे चमत्कार वगळून ख्रिस्ताच्या नैतिक व अध्यात्मिक तत्वांचे विवेचन केले. त्याच बरोबर त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्याच्या अज्ञानी हल्ल्यापासून हिंदू धर्म व वेदात तत्वज्ञानाचे संरक्षण केले. मात्र त्यामुळे त्यांचे ख्रिश्चन मिशनरी मित्र नाराज झाले, कारण हिंदू धर्मावर टिका केल्याने राममोहन रॉय ख्रिश्चन धर्म स्विकारतील ही त्यांची आशा फोल ठरली.


• अशा रीतीने, राममोहन रॉय यांनी भारताच्या परंपरांवर अंधविश्वासही ठेवला नाही, आणि पश्चिमेचे अंधानुकरणही केले नाही. त्यांच्या मते, नवीन भारत हा तर्कशक्तीच्या आधारे पौर्वात्य व पश्चिमात्य संस्कृतींमध्ये जे काही सर्वोत्तम आहे त्यांच्या एकत्रीकरणातून तयार व्हावा पाश्चिमात्य संस्कृती भारतावर न लादता, त्यातील उत्तम गोष्टी घेऊन भारतीय संस्कृतीचे नुतनीकरण घडवून आणावे


• राममोहन रॉय यांना त्यांच्या या धाडसी धार्मिक दृष्टिकोनाबद्दल पूर्ण आयुष्यभर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या सनातनी व्यक्तींनी त्याच्यावर मुर्तीपुजेला विरोध केल्यामुळे, तसेच ख्रिश्चन व इस्लाम धर्मातील तत्वज्ञानाची प्रशंसा केल्यामुळे तीव्र टिका केली. त्यांनी राममोहनविरुद्ध सामाजिक बहिष्कार घडवून आणला, ज्यात त्यांची आईसुद्धा सहभागी झाली. त्यांना पाखंडी (heretic) व जातीभ्रष्ट (outcaste) ठरविण्यात आले. 

ब्राम्हो समाज


• १८२८ मध्ये राममोहन रॉय यांनी 'भ्रम्ह सभा' या नावाने एक नवीन धार्मिक समाज (religious socicty) स्थापन केला. पुढे त्यालाच 'ब्राम्हो समाज' असे नाव पडले. हिंदू धर्माची शुद्धी व एकेश्वरवादाची शिकवण हा त्याचा प्रमुख उद्देश होता. ब्राम्हो समाज बुद्धिप्रामाण्याबरोबरच वेद व उपनिषदांवर आधारित होता. त्यामध्ये इतर धर्मांच्या शिकवणुकीचाही समावेश होता. ब्राम्हो समाजाने मानवी प्रतिशेवर भर दिला, मुर्तीपुजेला विरोध केला, तर सती सारख्या सामाजिक प्रथावर प्रखर टिका केली.


सती बंदीसाठी प्रयत्न


• राममोहन रॉय हे थोर विचारवंत असण्याबरोबरच एक कृतिशिल व्यक्तीही होते. निर्मितीची कोणतीही बाजू त्यांच्याकडून अस्पर्शित राहिली नाही. धर्माच्या अंतर्गत सुधारणेबरोबरच त्यांनी समाजाच्या सुधारणेचाही पाया घातला. सामाजिक अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध त्यांनी जीवनभर दिलेल्या लढ्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सती या अमानवीय रूढीच्या विरुद्ध त्यानी उभारलेली चळवळ होय.


१८१८ पासूनच त्यानी सती प्रथेविरुद्ध जनमत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका बाजुला त्यांनी पुरातन धर्मग्रंथाचा हवाला देऊन असे दाखवून दिले की खरा हिंदू धर्म या प्रथेच्या विरुद्ध होता, तर दुसऱ्या बाजुला लोकांची तर्कशक्ती, मानवता व दयाभावनेला आवाहन केले. त्यानी स्मशानघाटाना भेटी देऊन विधवाच्या नातेवाईकांचे मन परिवर्तीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सतीच्या घटनांवर कडक लक्ष ठेवण्यासाठी व सती होण्यासाठी विधवांना सक्ती करण्याचे प्रयत्न थांबविण्यासाठी समविचारी व्यक्तीचा एक संघटित गरही तयार केला.


•या बरोबरच त्यांनी ही प्रथा कायद्याने बंद करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज पाठविले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लॉर्ड बेटिंकने डिसेंबर १८२९ मध्ये नियमन क्रमांक XVI (Regulation No XVII) संमत केले. त्याद्वारे सतीची प्रथा विधवेला जिवंत जाळणे किंवा पुरणे कायद्याने बंद आली व तिचे आचरण सदोष मनुष्यदोष (culpable homi- cide) असून फौजदारी न्यायालयांद्वारे शिक्षापात्र असल्याचे घोषित करण्यात आले. १८२९ चे नियमन प्रथम बंगाल इलाख्यात, तर नंतर १८३० मध्ये मद्रास व बॉम्बे इलाख्यात लागू करण्यात आले.


• त्याला विरोध म्हणून राधाकांत देव व त्यांच्या सनातनी बंगाली सहकान्यांनी या नियमनाविरुद्ध इंग्लंडच्या राजसत्तेकडे अर्ज केले. मात्र राममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर यांनी त्याला


प्रति-अर्ज पाठविले


• याबरोबरच त्यांनी महिलांच्या हक्कांचा कैवार घेतला त्यांनी महिलांच्या खालावलेल्या स्थितीवर टिका करून महिला मा पुरुषापेक्षा बौद्धिक व नैतिकदृष्या कनिष्ठ आहेत याच्या प्रचलित विचाराना विरोध दर्शवला. त्यांनी बहुपत्नी विधवांच्या शोचनीय स्थितीवर टिका केली. महिलांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी त्यांना वारसाहक व संपत्तीचा क देण्याची मागणी केली.


शैक्षणिक विचार व सुधारणा • राममोहन रॉय यांनी इंग्रजी भाषेतून आधुनिक शिक्षणाच्या


प्रसारासाठी प्रयत्न केले. त्यानी इंग्रजी, विज्ञान, पाश्चिमात्य शास्त्र व तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचा पुरस्कार केला. मात्र त्यांनी बंगालमध्ये बौद्धिक आदानप्रदानाची भाषा म्हणून बंगाली भाषेचा पुरस्कार केला


• राममोहन रॉय यांचे शिक्षणविषयक महत्वाचे प्रयत्न पुढीलप्रमाणे ३१८१७ मध्ये हेयर (David Hare) यांना कलकत्याला प्रसिद्ध हिंदू कॉलेज ची स्थापना करण्यासाठी उत्साहाने मदत केली (डेव्हिड हेयर हे डच घड्याळजी होते ते १८०० साली भारतात आले होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतात आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठी घालविले.)


१८९७ पासून त्यांनी कलकल्याला स्वखचनि एक इंग्लिश स्कूल चालविली. त्यामध्ये इतर विषयांबरोबरच मेकॅनिक्स


व व्होल्टेयरचे तत्वज्ञान शिकविले जात असे.


१८२५ मध्ये त्यांनी वेदांत कॉलेज ची स्थापना केली. त्यामध्ये भारतीय शिक्षण व पाश्चिमात्य सामाजिक व भौतिक शास्त्रे शिकवली जात असत. (iv) १८३० मध्ये त्यांना अलेक्झांडर डफ यास 'General


Assembly's Institute स्थापन करण्यासाठी मदत केली. (v) बंगाली भाषेला बौद्धिक आदानप्रदानाचे साधन बनविण्यासाठी त्यांनी बंगाली भाषेच्या व्याकरणाचा संग्रह तयार केला तसेच भाषातरे, लघु पुस्तिका व जरनल्समधील लिखाणांतून त्यांनी बंगाली भाषेची एक आधुनिक व गोहक शैली तयार केली.


भारतातील राष्ट्रीय जाणीवेचे अपनी • राममोहन रॉय यांच्या विचारामध्ये भारतातील राष्ट्रीयजीच्या उदयाची अल्प सुरूवात दिसून येते. भारतीय धर्म व समाजातील भ्रष्ट घटक काढून टाकण्याच्या प्रयत्नात तसेच एकेश्वराचा वेदांतीक संदेश पसरविण्याच्या प्रयत्नात त्यांनी विविधांगी गटामध्ये विभागलेल्या भारतीय समाजाच्या एकतेचा घातला. त्यांनी जाती व्यवस्थेच्या कठोरतेवर टिका केली, कारण त्यांच्या मते, ती भारतीय समाजातील एकतेच्या अभावाचा खोत ठरली होती त्यांच्या मते, जाती व्यवस्था ही दुहेरी दुदैवाची बाब आहे तिने लोकांमध्ये असमानता विभेद निर्माण केला आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्यातील देशप्रेमाची भावनाही हिरावून घेतली आहे. त्यामुळे धार्मिक सुधांचा एक महत्वाचा उद्देश राजकीय उत्थान हा सुद आहे पाया


भारतीय वृत्तपत्रांचे अग्रणी •राममोहन रॉय यांनी भारतीय पत्रकारीता क्षेत्रात अग्रेसर बा


केले त्यांनी वैज्ञानिक, साहित्यीक व राजकीय ज्ञान लोकांप पोहोचावे, तत्कालिन महत्वाच्या मुद्द्यांवर लोकांचे प्रबोध व्हावे, आणि सरकारसमोर लोकाच्या मागण्या व गान्हाणी मांडण्यासाठी, बंगाली, पर्शियन, हिंदी व इंग्रजी भाषेतून वर्तमानपत्र सुरू केली. • त्यानी १८२१ मध्ये 'सवाद कौमुदी' हे बंगाली, तर १८२२


मध्ये 'मिरात-उल-अखबार हे पर्शियन वार्तापत्र सुरू केले. राजकीय प्रश्नांवरील जनचळवळीचे अग्रणी


• राममोहन रॉय हे राजकीय प्रश्नाबाबत जनचळवळीचे अग्रणी (initiator) होते. त्यांनी बंगालच्या जमीनदारांच्या जुलमी पद्धतींवर टिका केली, ज्यामुळे शेतकऱ्याची स्थिती शोचनीय बनली होती. त्यांनी मागणी केली की, जमीनदाराप्रमाणेव शेतकऱ्यांनी द्यावयाचा महत्तम खंड सुद्धा कायमस्वरूपी निश्चित करण्यात यावा. त्यांनी करमुक्त जमीनींवर कर लादण्याचा निषेध केला. तसेच त्यांनी पुढील मागण्या केल्या कंपनीचे व्यापार तक रद्द करावे, भारतीय वस्तूंवरील उच्च निर्यात कर रद्द करावे, वरील सेवाचे भारतीयीकरण करणे, कार्यक व्यवस्थेस न्यायव्यवर्सपासून विभक्त करणे, ज्युरीच्या साहाय्याने खटले चालविणे आणि भारतीय व यूरोपीय व्यक्तींमध्ये न्यायिक समानता प्रस्थापित करणे.


आंतरराष्ट्रवादावर विश्वास


● राममोहन रॉय यांचा आंतरराष्ट्रवादावर (internationalism)| व राष्ट्रामधील मुक्त सहकार्यावर विश्वास होता. रविव टागोर यांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे की, "राममोहन है त्यांच्या काळातील संपूर्ण मानव जगतातील असे एकमे होते, ज्यांनी आधुनिक जगाचे महत्व पूर्णपणे जाण होते. त्यांनी जाणले होते की, मानवी सभ्यतेचा आदर्श परतंत्र्याच्या एकलेपणात नाही तर विचार व कृतीच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्ती तसेच राष्ट्राच्या परस्परावलंबनाच्या बंधू भावात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा