विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

गोविंद वल्लभ पंत



गोविंद वल्लभ पंत हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे नेते होते.  अशा या नेत्याचाभारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी झाला.


गोविंद वल्लभ मनोरथ पंत हे त्यांचे पुर्ण नाव. मुत्सद्दीपणा, कणखरपणा आणि कृतिशीलता या गुणांच्या बळावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चमकून गेलेले हे अजोड व्यक्तिमत्त्व. अलमोडा येथे जन्माला आलेल्या गोविंद वल्लभ मनोरथ पंतांवर विद्यार्थिदशेतच गोपाळ कृष्ण गोखले व पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. 


१९१६ मध्ये त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. निमित्त होते कुमाऊ परिषदेचे. कुमाऊ या आदिवासींच्या प्रश्नावर ही परिषद भरली होती. स्वराज्य पक्षाचे ते सचिवही होते. 

उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). त्याच वर्षी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापन केली. स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाचे ते सात वर्षे सचिव होते. १९२७ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सायमन आयोगाविरुद्ध लखनौ येथे जी प्रक्षुब्ध निदर्शने झाली; त्यावेळी झालेल्या लाठीहल्ल्यात जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांनाही खूप मार बसला. त्याचा परिणाम पुढे त्यांना कंपवाताचे कायमचे दुखणे जडण्यात झाला. म. गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना १९३०-३२ च्या दरम्यान दोन वेळा तुरूंगावास घडला. उत्तर प्रदेशात कृषिविषयक सुधारणा करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षेतेखाली एक समिती नेमण्यात आली. तिचा अहवाल त्यांनी १९३२ साली सादर केला. या त्यांच्या कामगिरीमुळे ते पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे चिटणीस झाले (१९३४). त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती कायदेमंडळातील काँग्रेसचे उपनेते म्हणून काम केले.


१९४२च्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल गोविंद वल्लभ पंत यांना १९४२ ते १९४५ असा तीन वर्षाचा कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्य संग्रामातील कार्याची शिदोरी घेऊन पंतांनी स्वातंत्र्योत्तर काळही गाजविला. 


पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व सरदार वल्लभभाई पटेल नंतर ते देशाचे गृहमंत्री झाले आणि पटेलांइतक्याच कणखरपणे मंत्रीपद सांभाळले. राष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आणि समर्पणाची दखल घेऊन भारत सरकारने १९५७ मध्ये त्यांना भारतरत्न किताब देऊन गौरवले. 


गोविंद वल्लभ पंत यांचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा