इंद्रा नुयी
काय करू शकता, याला काही मर्यादा नाही. यश म्हणजे केवळ पैसा, प्रतिष्ठा किंवा सत्ता नाही, तर यश म्हणजे स्वतः च्या कर्तृत्वावर समाधानी असणे तसेच आपल्याला जीवनात जे सर्वात प्रिय आहे, अशी गोष्ट करण्यास संधी व वेळ मिळणे. पेप्सिको कंपनीच्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या व्यवसायासह इतर क्षेत्रांतही प्रवेश करत नफ्याच्या चढत्या भाजणीची किमया साधणाऱ्या चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांचे हे प्रेरणादायी वाक्य. गेल्यावर्षी अमेरिकेतील ५०० बड्या उद्योगांमध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवर कार्यरत असणाऱ्या यशस्वी १८ महिलांमध्ये त्यांनी चौथे स्थान पटकावले होते.
मद्रास (चेन्नई) येथे १९५५ साली इंद्रा यांचा जन्म कृष्णमूर्ती कुटुंबात झाला. त्यांनी १९७४ मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये गणित, भौतिकशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. पुढे आयआयएम कोलकाता येथून एमबीए आणि इतर मास्टर्स पदव्या भारत आणि विदेशात त्यांनी घेतल्या. भारतात जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये नोकरी करून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. नंतर बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, मोटोरोला आणि एशिया ब्राऊन बोवरीसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली.
१९९४ मध्ये इंद्रा नुयी यांनी पेप्सिकोत प्रवेश केला आणि प्रत्येक वर्षी कर्तृत्वाचा नवा ठसा उमटवीत कंपनीला नव्या उंचीवर नेले. ट्रायकॉनमधील रेस्तरॉची चेन पेप्सिको समूहात घेऊन त्याचे 'यमी ब्रँडस्' असे नामकरण केले. ९८ मध्ये ज्यूस कंपनी ट्रॉपिकाना ताब्यात घेतली. क्वेकर ओटस् कंपनीही मर्ज केली. २००६ मध्ये पेप्सिको या अवाढव्य कंपनीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा