समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

शंकर दयाळ शर्मा*माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा*


शंकर दयाळ शर्मा यांचा स्मृतीदिन २६ डिसेंबर १९९९ (दिल्ली) आहे

माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ रोजी झाला.

भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.     

                                               शंकर दयाळ शर्मा यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण झाले. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल्.एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या. भारतात परतल्यावर त्यांनी लखनौ विद्यापीठात कायदा विषयाचे प्रपाठक म्हणून काम केले. केंब्रिज आणि हार्व्हर्ड या विद्यापीठांतही त्यांनी अल्पकाळ अध्यापन केले. 


*भारत छोडो आंदोलनाच्या वेळी शर्मा राजकरणात पडले. त्यांना आठ महिने तुरुंगवास भोगावा लागला. पुढे भोपाळ संस्थानातील काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.* याच सुमारास त्यांचा विमला यांच्याशी विवाह झाला. १९५२ ते १९५६ या काळात ते भोपाळचे मुख्यमंत्री होते. पुढे भोपाळ मध्य प्रदेश राज्याचा भाग बनल्यावर ते मध्य प्रदेश राज्यात मंत्री झाले. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व नंतर अखिल भारतीय काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. १९७२ ते ७४ दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लोकसभेवरही निवडून आले. त्यानंतर आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचे त्यांनी राज्यपालपद भूषविले. पुढे ते काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती या पदावर निवडून आले. नंतर १९९२ ते १९९७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. निवृत्ती नंतर ते दिल्लीत स्थायिक झाले होते. 


शंकर दयाळ शर्मा याना अनेक मानसन्मान मिळाले. विक्रम व भोपाळ विद्यापीठ तसेच लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. विशेष सार्वजनिक सेवेबद्दलचा पहिला श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला. काँग्रेस अँप्रोच डू इंटरनॅशनल अफेअर्स, क्रांती द्रष्टा, रूल ऑफ लॉ अँड रोल ऑफ पुलीस, सेक्युलरिझम इन इंडियन ईथॉस, टोअर्डझ अ न्यू इंडिया, अँस्पेक्ट्स ऑफ इंडियन थॉट आणि अवर हेरिटिज ऑफ ह्यूमनिझम ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.


शंकर दयाळ शर्मा यांचे २६ डिसेंबर १९९९ रोजी निधन झाले.                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा