स्वाध्याय परिवाराचे प्रणेते,संस्थापक,तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले
(ऑक्टोबर १९ , १९२०- ऑक्टोबर २५, २००३) पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले.
द, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. इ.स.१९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण आहेत आध्यात्मिक साधनेतून शेतकरी, मच्छिमार, आदिवासी यांच्यापासून शहरी भागांतील सुखवस्तू वर्गापर्यंत सर्व स्तरांमध्यगेल्या चार दशकांहून अधिक काळ समाजपरिवर्तनाची आत्मज्योत फुलविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शनिवारी २५ ऑक्टोबर २००३ रोजी गिरगावातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. ते ८४ वर्षांचे होते. महाराष्ट्र आणि गुजरातेतच नव्हे , तर जगभर पसरलेल्या लक्षावधी स्वाध्यायींना पांडुरंगशास्त्री तथा दादांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक अनावर झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे पाथिर्व शनिवारी त्यांच्या ' एड्यूला इमारती ' तील निवासस्थानाहून त्यांची कर्मभूमी ठरलेल्या सी. पी. टँक येथील माधवबागेत नेण्यात आले, तेव्हा तेथे हजारो शोकाकुल स्वाध्यायींनी धाव घेतली. अंत्यदर्शनासाठी सायंकाळी त्यांचे पाथिर्व , ठाणे येथील (दादांनीच स्थापन केलेल्या) तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या संकुलात ठेवण्यात आले होते. मॅगसेसे , टेम्पल्टन या जागतिक किताबांसह भारतातील पद्मविभूषण व अन्य अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले यांनी जाती-धर्माच्या भिंती भेदणारे असे आध्यात्मिक चिंतन कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला. आठवले यांच्यावर पाच वर्षांपूवीर् बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या शरीरात पेसमेकरही बसविण्यात आला होता. त्यांना मधुमेहाचा व श्वसनाचाही त्रास होता. त्यामुळे सव्वा वर्षांपासून त्यांनी जाहीर प्रवचनातील सहभाग थांबविला. महिनाभरापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती ते घरी आले. मात्र शनिवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात् त्यांच्या पत्नी निर्मलाताई, कन्या धनश्री तळवलकर तथा दीदी, जावई रावसाहेब तळवलकर आणि लक्षावधी स्वाध्यायी असा परिवार आहे. कोकणात जन्मलेल्या आठवले यांनी १९५८ मध्ये आपल्या कार्याची सुरुवात गुजरातेत सौराष्ट्रामध्ये केली. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली ही चळवळ चार दशकांत अमेरिका , इंग्लंड , आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती , सामाजिक जबाबदारीचे भान , पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. ' रिलिजस इकॉलॉजिस्ट ' अशा शद्बांतही त्यांचा गौरव काहीवेळा झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजे काढली होती. ठाण्यात गुरुकुल पद्धतीने चालणारे तत्त्वज्ञान विद्यापीठ त्यांनी सुरू केले; पण त्याचबरोबर रस्तारुंदीकरणाच्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाची जागा देऊन रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला व समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे दर्शन घडविले. आधुनिक युगातील विचारांची दिशा त्यांनी या चळवळीला दिली होती आणि त्यातूनच मच्छिमारांना एका दिवसाचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबियांसाठी वापरण्याचा ' मत्स्यगंधा ' उपक्रम गेली २० वषेर् सुरू राहिला. ' योगेश्वर कृषी ' सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा