*कस्तुरबा गांधी *
********************************
कस्तुरबा गांधी यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या. त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती.
कस्तुरबा मोहनदास गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी व त्यांच्या कर्तृत्वाला सावली होत्या. त्यांना प्रेमाने #बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबां ..
त्यांना हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास ही चार अपत्ये होती. म गांधीजींचे अनेक निर्णयास त्यांची समर्थ साथ असे . एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी म . गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक असूनही आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.
कस्तुरबांनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. 1897 साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या.
1904-1912 दरम्यान त्या डरबन शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्य करीत होत्या. 1913 मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना 3 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. तुरूंगात असताना त्यांनी इतर स्त्रियांना प्रार्थना करणे आणि अशिक्षित महिलांना वाचन-लेखन कसे करावे हे शिकवण्यास सुशिक्षित महिलांना प्रोत्साहन दिले. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. 1915 मध्ये म. गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले. 1917 मध्ये कस्तुरबा यांनी बिहारच्या चंपारणमध्ये महिला कल्याणाचे काम केले. त्यांनी महिलांना स्वच्छता, शिस्त, आरोग्य, वाचन आणि लेखन शिकवले.
1922 मध्ये त्यांची तब्येत बिघडली असतानाही गुजरातच्या बोरसद येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. 1930 मध्ये त्यांनी गांधींच्या प्रसिद्ध मीठ सत्याग्रहामध्ये भाग घेतला नाही, परंतु बर्याच सविनय कायदेभंग आंदोलनात आणि मोर्चांमध्ये भाग घेतला. याचा परिणाम म्हणून त्यांना अटक करण्यात आली आणि असंख्य प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला.
१८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या.
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजी बरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहती मध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले.
१९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध सत्याग्रहासाठी चंपारण्यात जेव्हा उतरले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्या बरोबर आल्या. त्यांनी या लढ्यात शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.
स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या अग्रेसर होत्या . इंग्रजांच्या अटकेत पुणे येथे
कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा