सत्य व अहिंसेवर प्रेम करणारे महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होय.
महात्मा गांधींचा जन्म काठेवाडात पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आणि आई पुतळीबेन अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. वडील रोज भगवद्गीतेचे पठण करत आणि आई पूजापाठ केल्याशिवाय कधी भोजन करत नसे.
बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली. परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर त्यांनी सत्संगती कधी सोडली नाही. वडिलांनी आणलेले पितृभक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले आणि राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले. हरिश्चंद्राच्या सत्यपालनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. हरिश्चंद्रासारखे आपणही सत्यवादी व्हावे असे त्यांना वाटू लागले. लहानपणी त्यांनी भुताची भीती वाटत असे त्यावेळी आईने त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगितले. पुढील जीवनात फार उपयोग झाला. तसेच तुलसी रामायणाच्या वाचनाने ईश्वरभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात प्रचलित झाली.
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला. 1885 मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले पण आईची परवानगी नव्हती. मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थांचे सेवन करणार नाही. अभक्ष भक्षण करणार नाही. परस्त्रीला स्पर्श करणार नाही. असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले.
जून 1891 साली महात्माजी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले. त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाला फारसे यश मिळाले नाही. विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या गांधींजींना दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय व्यापाऱ्याने आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेत नेले. अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापाराला न्याय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत महात्माजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणाची माहिती झाली. कृष्णवर्णी यांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले. प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला. गौरवर्णीयांप्रमाणेच कृष्णवर्णी यांना वागणूक मिळावी यासाठी महात्माजींनी जे कार्य केले ते सुवर्णाक्षरात कोरण्यासारखेच आहे.
गांधींनी बुद्धचरित्र आणि भगवद्गीता वाचली. गीतेचे सखोल चिंतन केले व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. टॉलस्ट्रॉलचे 'वैकुंठ माझ्या हृदयात आहे' नावाचे पुस्तक वाचले. रास्किनचे चे 'सर्वोदय' हे पुस्तक जाणून घेतले. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण सामावलेले आहे याची त्यांना जाणीव झाली. बौद्धिक शिक्षणापेक्षा त्यांना हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिले. त्यांना सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता. हिंसेपेक्षा अहिंसेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. त्यांना फिरोजशहा मेहता हिमालयासारखे वाटले, लोकमान्य टिळक समुद्रासारखे व नामदार गोखले गंगेसारखे वाटले.
भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला व तो त्यांनी दूर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, शस्त्राशिवाय प्रतिकार, असहकार अशा नवीन साधनांचा पुरस्कार केला. देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला. हिंदू मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. जातिभेद त्यांना मान्य नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली. अस्पृश्यांना 'हरिजन' असे नाव दिले. हे सर्व कार्य ते निस्वार्थ बुद्धीने करत होते. गीतेतील निष्काम कर्मयोग ते आचरत होते. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.
महात्माजींचे कार्य पाहून स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. 1942 साली 'चले जाव', 'भारत छोडो' असे इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती. इंग्रजांनी लाठीमार, गोळीबार केला. अनेकांना तुरुंगात घातले, पण इंग्रजांचे काही चालले नही.
1947 ला देश स्वतंत्र झाला. भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटली. परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करीत असताना गोळी मारून ठार केले. गांधीजींच्या मुखात त्यावेळीही 'हे राम' हे शब्द होते. त्यांना हुतात्म्याचे मरण आले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले. त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे झाला.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदर गुजरात मध्ये झाला.
1891 मध्ये बॅरिस्टरची पदवी मिळवली.
1983 मध्ये ते आफ्रिकेत गेले. त्यांनी नाताळ या वसाहतीत जाऊन हिंदी मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
1904 ते 1914 या काळात आपल्या सत्याग्रहाच्या प्रयोगामुळे नाताळ येथील लोकांवर लादण्यात येणारा जिझिया कर व मतदान करण्यास मनाई हे दोन कायदे तेथील वसाहतीत सरकारला रद्द करण्यास भाग पाडले.
9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी भारतात आले.
1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह बिहार येथे केला.
1918 मध्ये गिरणी कामगारांचा सत्याग्रह अहमदाबाद येथे केला.
रौलेट कायद्याविरुद्ध लढा 6 एप्रिल 1919
1920 मध्ये असहकार आंदोलन केले.
1930 ला सविनय कायदेभंग व मिठाचा सत्याग्रह केला.
1940 ला वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली.
1942 मध्ये चले जाव आंदोलन केले.
⚜️ महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र व नवजीवन हे मासिक सुरू केले होते.
संपत्तीचे विश्वस्त संकल्पना महात्मा गांधींनी मांडली.
त्यांनी ग्रामराज्याचा पुरस्कार केला.
1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली.
अन टू दि लास्ट या जॉन रस्किन यांच्या ग्रंथाचा महात्मा गांधींवर प्रभाव होता.
महात्मा गांधीवर टॉलेस्टॉय यांच्या विचारसरणीचाही प्रभाव होता.
महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. या स्मृतिपित्यर्थ 9 जानेवारी हा दिवस भारत सरकार 'प्रवासी भारतीय दिवस' म्हणून साजरा करते.
त्यांना बापू सरोजिनी नायडू यांनी, राष्ट्रपिता नेताजींनी, महात्मा रवींद्रनाथ टागोर यांनी, अर्धनग्न फकीर फ्रँक मोरेश यांनी, अर्धनग्न विणकर विल ड्युराँट यांनी संबोधले.
30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे याने त्यांची दिल्ली येथे हत्या केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा