विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

समाजकारण /राजकारण

क्रांतिकारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्रांतिकारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शंकर श्रीकृष्ण देव...

                                          

            

            *शंकर श्रीकृष्ण देव*

(महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी)

टोपणनाव:

शंकरराव देव

*जन्म : 28 जानेवारी 1895 धुळे*

*मृत्यू : 30 डिसेंबर 1974*

शिक्षण:बी.ए. एलएल.बी.

कार्यक्षेत्र:सर्वोदयी कार्य, साहित्य,

पत्रकारिता/ लेखन:

समाज प्रबोधन पत्रिका

प्रभाव:गांधीजी

वडील:श्रीकृष्ण

आई:गंगुबाई.                                   शंकरराव देव म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर श्रीकृष्ण देव (जानेवारी २८, १८९५ - डिसेंबर ३०, १९७४), हे समर्थभक्त, रामदासी संप्रदाय व साहित्य ह्यांचे संशोधक–अभ्यासक–प्रकाशक व सामाजिक–राजकीय कार्येकर्ते होते.    

पुण्यास राहून बी. ए. एल्एल्. बी. झाल्यानंतर (१८९३, १८९८) धुळ्याला वकिली करू लागले. पुण्यास असताना चिपळूणकर, टिळक, आगरकर, गोखले आदींच्या विचारांचा प्रभाव पडून त्यांच्यातील देशभक्तीची भावना चेतली होती.


तिच्याच प्रेरणेतून ते समर्थ रामदासांच्या जीवनाकडे आणि साहित्याकडे आकृष्ट झाले. १८९३ मध्ये धुळ्यास त्यांनी ‘सत्कार्योत्तेजक सभे’ची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाचे आणि जुन्या मराठी साहित्याचे–विशेषतः रामदासी साहित्याचे संशोधन–प्रकाशन करणे, हे ह्या संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. ह्या संस्थेच्या ‘रामदास आणि रामदासी’ ह्या ग्रंथमालेने समर्थांचे दासबोधादी ग्रंथ तसेच रामदासी संशोधनपर लेखनही प्रकाशित केले. शेकडो रामदासी आणि इतर हस्तलिखित बाडांची वर्णनात्मक सूची उपलब्ध करून दिली. श्री रामदासींची ऐतिहासिक कागदपत्रेही प्रसिद्ध केली (१९३०). ह्या संस्थेने जमविलेली हस्तलिखित बाडे आणि ऐतिहासिक कागदपत्रे सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी देवांनी धुळ्यात श्रीसमर्थवाग्देवता मंदिर उभे केले आणि तेथे ती ठेवली. श्रीसमर्थसंप्रदायातील ग्रंथांचे प्रकाशन व विचारांचे विवेचन करण्यासाठी रामदास आणि रामदासी ह्या नावाचे एक मासिक ‘सत्कार्योत्तेजक सभे’तर्फे त्यांनी १९१५ मध्ये काढले. ह्याच नावाची उपर्युक्त ग्रंथमाला १९०५ मध्ये सुरू केलेली होती. तिला ह्या मासिकाची जोड देण्यात आली. इतिहास आणि ऐतिहासिक हे सत्कार्योत्तेजक सभेतर्फे देवांनी चालविलेले आणखी एक मासिक. उपलब्ध झालेल्या मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रकाशन करणे आणि विविध ऐतिहासिक विषयांचे विवेचन करणे, हे हेतू हे मासिक काढण्यामागे होते. समर्थांचे मराठवाड्यातील जन्मग्राम जांब येथे समर्थांचे एक सुंदर मंदिर त्यांनी पुढाकार घेऊन उभारले. अनेक रामदासी मठांच्या वास्तूंचा त्यांनी जीर्णोद्धार केला. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्रीसमर्थचरित्रही (श्रीसमर्थावतार १९४९ श्रीसमर्थ हृदय १९४२, श्रीसमर्थसंप्रदाय १९४५) प्रसिद्ध आहे. राजकीय चळवळींतही त्यांनी भाग घेतला ब्रिटिश सरकारच्या अन्याय्य धोरणांविरुद्ध आंदोलने केली. स्वातंत्र्यप्रेमी क्रांतिकारकांच्या ‘अभिवनभारत’ ह्या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता तथापि त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. धुळे नगरपालिकेचे सदस्य, त्या नगरपालिकेच्या ‘स्कूल बोर्डाचे’ अध्यक्ष (१९१३–१५) आदी नात्यांनी त्यांनी धुळे शहराची सेवा केली. मुंबई कायदे मंडळाचे (बाँबे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल) सदस्य (१९१८–२७) म्हणूनही त्यांनी काम केले. राजकारणात आरंभी ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या ‘होमरूल लीग’ ला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी त्यांनी खानदेशात दौरा केला होता. १९२० नंतर मात्र त्यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव पडला. १९२८ नंतर रामदासांचे जीवन आणि साहित्य ह्यांसंबंधीच्या संशोधनाला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतले. श्रीसमर्थसंघ ही समर्थभक्तांची एक संघटनाही त्यांनी स्थापन केली होती. त्यांच्या वृद्धापकाळी त्यांचा एकुलता एक मुलगा निधन पावला. त्या दुःखाचा धक्का असह्य होऊन धुळे येथे ते निधन पावले.

👦🏻 *बालपण*

शंकरराव देवांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातले बावधन आहे. तेथे त्यांचे आजोबा शेती करीत, तर वडील हे पुण्याला आचाऱ्याचा व्यवसाय करीत असत. आई गंगूबाई, शंकरराव अडीच वर्षांचे असताना वारल्या.

📙 *शिक्षण*

त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथील त्यांच्या आजीच्या काकूने केले. पुढील शिक्षण बावधन, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे होऊन शंकरराव देव १९१८ साली बी.ए. झाले.

🇮🇳 *स्वातंत्र्य चळवळीत सहभाग*

कॉलेजमध्ये असताना शंकरराव देवांचा न.वि. गाडगीळ, विनोबा भावे यांच्याशी संबंध आला. बिहारमध्ये महात्मा गांधी खंडाने घेऊन शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळ करीत होते (१९१७), तेथे जाऊन आले. गंगाधरराव देशपांडे यांनी शंकररावांचा परिचय महात्मा गांधींशी करून दिला, आणि शंकरराव असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले.

⛓️ *सत्याग्रह आणि तुरुंगवास*

सेनापती बापटांबरोबर शंकरराव देवांनी पुण्याजवळील मुळशी सत्याग्रहात भाग घेतला (१९२३). त्याकरिता त्यांना तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा भोगावी लागली. त्यांनी आपल्या संघटनचातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटिशांच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्या’मधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांना पुन्हा दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला (१९३०). त्याबद्दलही त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. १९४१ सालातील वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली.

♦️ *काँग्रेसपक्षामध्ये भूषविलेली पदे*

महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद (१९३०).

काँग्रेस कार्यकारिणीचे सभासदत्व (१९३६).

महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे भरलेल्या ५०व्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद (१९३६).

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीसपद (१९४६–५०).

घटनासमितीचे सदस्यत्व.

हंगामी संसद सदस्यत्व.

निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे ठरविणाऱ्या समितीचे सदस्यत्व.

गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद

⚜️ *शेवटची निवडणूक आणि राजकारण निवृत्ती*

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ते १९५० मध्ये हरले व त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला. उरुळी कांचन येथे त्यांनी एक आश्रम बांधला आणि ते तेथे राहू लागले. शंकरराव देवांच्या प्रोत्साहनाने व त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे समाज प्रबोधन संस्था स्थापन झाली. त्या संस्थेतर्फे समाज प्रबोधन पत्रिका नावाचे द्वैमासिक नियमित निघत असते.


🔶 *निवृत्तीनंतर*

पुढे ते आचार्य विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तमिळनाडू व केरळ या राज्यांत पदयात्रा काढली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक होती. ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषदे यांचा सखोल व्यासंग त्यांनी केला होता. विनोबांच्या सर्व सेवासंघात असताना १९६२ च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर शंकररावांनी काही सहकाऱ्यांसोबत पेकिंगची पदयात्रा काढली. पण पूर्व पाकिस्तान व ब्रह्मदेश या देशांनी त्यांना प्रवेश नाकारला. चीनला जाता न आल्याने निरूपायाने त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशीच पायी दीर्घ प्रवास केला. या प्रवासामुळे त्यांची प्रकृती ढासळली, ती अखेरपर्यंत सुधारली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अग्रभागी रहाण्याचा प्रयत्न केला, पण ते काँग्रेस श्रेष्ठींची संयुक्त महाराष्ट्र न देण्याची कारणे महाराष्ट्रातील जनतेला पटवून देऊ शकले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस हिंसक स्वरूप येईल असे वाटू लागल्यावर शंकरराव देवांनी उरुळी कांचन येथे ३० दिवसाचे उपोषण केले.

💎 *गांधीवादी शंकरराव देव*

शंकरराव देव हे खरेखुरे गांधीवादी होते. त्यांनी आजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळले आणि महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. गांधीजी व काँग्रेस यांकरिता त्यांनी लक्षावधी रुपयांचा फंड गोळा केला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते सासवड येथे त्यांनीच सुरू केलेल्या आश्रमात रहात होते.

🔮 *शं.श्री. देवांचे कार्य*

नानासाहेब देव यांनी समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव, जांब याचा पूर्ण विकास घडवून आणला आणि तेथे समर्थांची एक मूर्ती स्थापन करून एक उत्तम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे धुळे येथे १९३५ मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिर उभारले. हे तर समर्थ सांप्रदायिकांचे विद्यापीठच म्हणावे लागेल. तेथे समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले अफाट साहित्य उत्तम प्रकारे जतन केले आहे. त्यात आपल्याला रामदासी गाथा, बखर, बाडे, विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी अफाट साहित्य बघायला मिळते. हे सर्व प्रकाशनाचे काम देवांनी उत्तम प्रकारे केले. शंकरराव देव म्हणत असत "शिव-समर्थांचे स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन तर त्यांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण".


जांब येथे समर्थ मंदिराची स्थापना

भारतभरातील विविध समर्थ-मठांत तसेच अन्य ठिकाणी फिरून समर्थ संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह.

समर्थ रामदास स्वामींनी जेथे दासबोध लिहिला, त्या शिवथरघळ या ठिकाणाचा शोध १९३०मध्ये लावला.

धुळे येथे समर्थ संप्रदायाचे साहित्याचा संग्रह जतन व प्रसार करणे यासाठी समर्थ वाग्देवता मंदिर व सत्कार्योत्तेजक सभा यांची स्थापना.

धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या साहित्याचा संग्रह, जतन व प्रसार करणे यासाठी राजवाडे संशोधन मंदिराची स्थापना.

’रामदास व रामदासी’ या मासिकाद्वारे समर्थ साहित्याचे प्रकाशन.

📚 *ग्रंथलेखन*

पहिला सुमनहार

शं.श्री. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्री समर्थचरित्र (श्रीसमर्थावतार, श्रीसमर्थहृदय, श्रीसमर्थ संप्रदाय) प्रसिद्ध आहे.

श्री दास विश्रामधाम. खंड १ ते ४

श्री दिनकरांची स्फुट कविता

श्रीमत् दासबोधाची किल्ली

श्रीमत् दासबोधांतर्गत श्री समर्थ चरित्र

श्री निवृत्तीराम

श्री रामदास पंथ क्रमसार

श्री रामदासांची कविता

श्रीराम सोहळा

श्री संप्रदायाची कागदपत्रे

श्री समर्थकृत करुणाष्टके, धाटया, सवाया

श्री समर्थ प्रताप

श्री समर्थ मंदिर-जांब

श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी (चरित्र)

श्री समर्थ्रशिष्य कल्याण (चरित्र)

श्री समर्थांची दोन जुनी चरित्रे

श्री समर्थांची लघुकाव्ये

श्री समर्थांची शिकवण

श्री सीता स्वयंवर

श्री स्वानुभव दिनकर

सुवर्ण महोत्सव ग्रंथ (२००४)

✍️ *इतर लेखनकार्य*

त्यांनी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला काढून तीतून उत्तम वैचारिक पुस्तके प्रसिद्ध केली. उपनिषत्सार व भगवान बुद्ध ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.

गांधीजींच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद केले.

वर्तमानपत्रांतून विपुल स्फुटलेखन.

त्यांनी नवभारत (मासिक) हे वैचारिक मासिक त्यांनी सुरू केले.(१९४७). त्याचे ते १९५६पर्यंत संचालक होते.

स्वराज्य नावाचे साप्ताहिक काढले (१९२५).

लोकशक्ती नावाचे दैनिक सुरू केले (१९३८).

📝 *आत्मचरित्र*

शंकरराव देवांनी 'दैव देते पण कर्म नेते' या नावाचे आत्मचरित्र लिहिले. ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.

🪷 *गौरव*

समाज प्रबोधनाच्या कार्यकर्त्यांनी १९७३ मध्ये शंकररावांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त भारतीय प्रबोधन नावाचा अभिनंदनग्रंथ त्यांना अर्पण केला    

                    

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

अन्नपूर्णा महाराणा...

         


          *अन्नपूर्णा महाराणा*

     (ओडिया स्वतंत्रता सेनानी)


    *जन्म : 3 नवम्बर 1917*

             (ओडिसा, भारत)


    *मृत्यु : 31 दिसम्बर 2012*

                   (उम्र 95)

        (कटक, ओडिसा, भारत)


राष्ट्रीयता : भारतीय

प्रसिद्धि कारण : स्वतंत्रता सेनानी,  

                  सामाजिक कार्यकर्ता

जीवनसाथी : शरत चंद्र महाराणा

बच्चे : कर्मदेव महाराणा, 

          ज्ञानदेव महाराणा


                      अन्नपूर्णा महाराणा भारतीय स्वतंत्रता आंदोलन में सक्रिय स्वतंत्रता सेनानी थी। इसके अलावा वह एक प्रमुख सामाजिक और महिला अधिकार कार्यकर्ता भी थीं।अन्नपूर्णा, महात्मा गांधी के करीबी सहयोगी थी|


💁 *जीवनकाल*


अन्नपूर्णा महाराणा का जन्म 3 नवंबर 1917 को ओडिशा में राम देवी और गोपाबंधू चौधरी के दूसरे बच्चे के रूप में हुआ था। उनके दोनों माता-पिता भारतीय स्वतंत्रता आंदोलन में सक्रिय थे। इन्होंने चौदह वर्ष की उम्र से ही स्वतंत्रता के लिए सक्रिय रूप से प्रचार करना शुरू किया, और महात्मा गांधी की समर्थक बन गई। 1934 में, वह महात्मा गांधी के पुरी से भद्रक तक के "हरिजन पडा यात्रा" रैली में ओडिशा से जुड़ गईं। अगस्त 1942 के भारत छोड़ो आंदोलन, सविनय अवज्ञा अभियान के दौरान सहित महाराणा को कई बार गिरफ्तार किया गया था।


स्वतंत्रता के बाद, महाराणा ने भारत में महिलाओं और बच्चों की ओर से आवाज बनी। उन्होंने क्षेत्र की जनजातीय आबादी के बच्चों के लिए ओडिशा के रायगडा जिले में एक स्कूल खोला। महाराणा, विनोबा भावे द्वारा शुरू किया गये भूदान आन्दोलन, या भूमि उपहार आंदोलन का भी हिस्सा बनी। उन्होंने चंबल घाटी के सक्रिय डकैतो को मुख्य धारा में लौटने के लिए अभियान चलाया।


आपातकाल के दौरान उन्होंने रामदेवी चौधरी के ग्राम सेवा प्रेस द्वारा प्रकाशित अख़बार की मदद से विरोध जताया। सरकार द्वारा समाचार पत्र पर प्रतिबंध लगा कर रामदेवी चौधरी और उड़ीसा के अन्य नेताओं जैसे नाबक्रुश्ना चौधरी, हरिकेष्णा महाबत, मनमोहन चौधरी, जयकृष्ण मोहंती और अन्य के साथ उन्हें गिरफ्तार किया गया था।


ओडिशा के केंद्रीय विश्वविद्यालय ने 19 अगस्त 2012 को अपने कटक घर में आयोजित एक समारोह में महाराणा को ऑनोरिस कौसा (मानद उपाधि) से सम्मानित किया।


🪔 *निधन*                                              31 दिसंबर 2012 को, 96 वर्ष की उम्र में बखराबाद, कटक, ओडिशा के अपने घर पर लंबी बीमारियों जुझने के बाद उनकी मृत्यु हो गई। । 2 जनवरी 2013 को कटक के खन्नागर श्मशान में उन्हें सम्मान के साथ उनका दाह-संस्कार किया गया।


ओडिशा के राज्यपाल मुरलीधर चंद्रकांत भंडारी और मुख्यमंत्री नवीन पटनायक ने उनकी मृत्यु को भारत और ओडिशा की "अपूरणीय हानि" के रूप में वर्णित किया था।

  

         


कृष्ण बल्लभ सहाय...



              *कृष्ण बल्लभ सहाय*  

     (स्वतंत्रता सेनानी तथा राजनेता)

             *जन्म : 31 दिसम्बर, 1866*

                  (पटना, बिहार)

            *मृत्यु : 3 जून, 1974*

                 (हजारीबाग, झारखण्ड)

नागरिकता : भारतीय

आंदोलन : असहयोग आन्दोलन, किसान आन्दोलन, सविनय अवज्ञा आन्दोलन

कार्य काल : मुख्यमंत्री, बिहार- 2 अक्टूबर 1963 से 5 मार्च 1967 तक

विद्यालय : सेंट कोलम्बा कॉलेज़, हजारीबाग

पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

अन्य जानकारी : के. बी. सहाय ने बिहार में मंत्रीय पद प्राप्त किया और सन 1963 में बिहार के मुख्यमंत्री नियुक्त हुए।

                    कृष्ण बल्लभ सहाय भारत के सुप्रसिद्ध राष्ट्रभक्त एवं क्रांतिकारी थे, जो बाद में पहले बिहार के राजस्व मंत्री और फिर संयुक्त बिहार के मुख्यमंत्री भी बने। के. बी. सहाय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से जुड़े थे। वह 2 अक्टूबर 1963 से 5 मार्च 1967 तक मुख्यमंत्री पद पर रहे।

💁🏻‍♂️ *परिचय*

कृष्ण बल्लभ का जन्म बिहार के पटना ज़िले में सेखपुर नामक गांव में 31 दिसम्बर, 1898 में हुआ था। वे एक मध्यवर्गीय कायस्थ परिवार में से थे। कृष्ण बल्लभ सहाय ने पटना और हजारी बाग से अपनी शिक्षा ग्रहण की। जब वे कानून की शिक्षा प्राप्त कर रहे थे तो उन्होंने उसे छोड़ दिया।


🙋🏻‍♂️ *आंन्दोलनों में योगदान*

कृष्ण बल्लभ सहाय 1920 के असहयोग आन्दोलन में शामिल हो गए। सन 1923 में सहाय ने समाज पार्टी के मंत्री के रूप में बिहार विधान परिषद में प्रवेश किया। सविनय अवज्ञा आन्दोलन में दौरान उन्हें गिरफ्तार कर लिया गया। कृष्ण बल्लभ सहाय ने स्वामी सहजानंद द्वारा चलाए गये किसान आन्दोलन में सक्रिय रूप से सहयोग किया था।


⚜️ *बिहार के भूतपूर्व मुख्यमंत्री*

के. बी. सहाय ने बिहार में मंत्रीय पद प्राप्त किया और सन 1963 में बिहार के मुख्यमंत्री नियुक्त हुए।


🪔 *मृत्यु*

कृष्ण बल्लभ का निधन 3 जून, 1974, को हजारीबाग, झारखण्ड में हो गया|    


      

दामोदर स्वरूप सेठ...


             दामोदर स्वरूप सेठ 

                   (क्रांतिकारी)

            *जन्म : 11 फ़रवरी, 1901*

              (बरेली, उत्तर प्रदेश) 

             *मृत्यु : 1965*

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : क्रांतिकारी

आंदोलन : बनारस षड्यंत्र, काकोरी षड्यंत्र कांड, असहयोग आंदोलन में भाग लिया।

जेल यात्रा : असहयोग आंदोलन में जेल जाना पड़ा

अन्य जानकारी : दामोदर स्वरूप सेठ को 1937 और 1946 में उत्तर प्रदेश विधानसभा का सदस्य चुना गया था। द्वितीय विश्वयुद्ध की अवधि में वे जेल में नज़रबंद रहे।

                 दामोदर स्वरूप सेठ प्रसिद्ध क्रांतिकारी एवं देशभक्त थे। वह फारवर्ड ब्लॉक के सचिव तथा कांग्रेस पार्टी के सदस्य थे। उनको 1914-1915 के ‘बनारस षड्यंत्र’ और 1925 के ‘काकोरी षड्यंत्र कांड’ में गिरफ़्तार किया गया था, पर अंग्रेज़ सरकार उन पर अभियोग सिद्ध नहीं कर पाई।


💁🏻‍♂️ *परिचय*

महान क्रांतिकारी और देशभक्त दामोदर स्वरूप सेठ का जन्म 11 फ़रवरी 1901 ई. को उत्तर प्रदेश के बरेली में हुआ था। जब उन्हें अध्ययन के लिए इलाहाबाद भेजा गया, तो वहीं वे क्रांतिकारियों के सम्पर्क में आ गये। बंग भंग की घटनाओं, रासबिहारी बोस और लाजपतराय जैसे क्रांतिकारियों की प्रेरणा से उनके विचार और पक्के हुए। उन्होंने आजन्म अविवाहित रहकर देशसेवा का व्रत ले लिया।


🌀 *कॅरियर*

दामोदर स्वरूप सेठ को 1914-1915 के ‘बनारस षड्यंत्र’ और 1925 के ‘काकोरी षड्यंत्र कांड’ में भी उन्हें गिरफ़्तार किया गया था, पर सरकार उन पर अभियोग सिद्ध नहीं कर पाई। असहयोग आंदोलन में उन्हें जेल की सज़ा हुई थी। देशसेवा के लिए उन्होंने लाला लाजपतराय की ‘लोकसेवक समिति’ की सदस्यता ग्रहण कर ली थी। वे कांग्रेस समाजवादी पार्टी के प्रमुख सदस्य थे। बाद में उन्होंने नेताजी द्वारा स्थापित फारवर्ड ब्लॉक की सदस्यता ग्रहण कर ली और उनके सचिव बने। 1937 और 1946 में उन्हें उत्तर प्रदेश विधानसभा का सदस्य चुना गया। द्वितीय विश्वयुद्ध की अवधि में वे जेल में नज़रबंद रहे। जेल से रिहा होने पर वे फिर से कांग्रेस में सम्मिलित हो गए थे। उत्तर प्रदेश के प्रमुख ‘समाजवादियों’ में उनकी गणना होती थी।


🪔 *निधन*

दामोदर स्वरूप सेठ का निधन 1965 में हुआ।               

नेताजी सुभाषचंद्र बोस..

 


        *नेताजी सुभाषचंद्र बोस*


   *जन्म : २३ जानेवारी, १८९७*

     (कटक, ओडिशा, भारत)


*अपघाती निधन : १८ ऑगस्ट*

                     *१९४५ (वय ४८)*

            ( तैहोको, तैवान)


टोपणनाव : नेताजी

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना :

              अखिल भारतीय काँग्रेस 

              फॉरवर्ड ब्लॉक 

              आझाद हिंद फौज


प्रमुख स्मारके : पोर्ट ब्लेर येथील 

                       स्मारक

धर्म : हिंदू

पत्नी : एमिली शेंकल

अपत्ये : अनिता बोस पॕफ

आवाहन : तुम मुझे खून दो,

               मै तुम्हे आझादी दूँगा !


                   हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

              १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

             नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.


👨‍👩‍👧 *जन्म व कौटुंबिक जीवन*


               सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

             जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.

          प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

       प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.

            आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.


💁🏻‍♂️ *शिक्षण व विद्यार्थी जीवन*


लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

                वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

             महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.

               १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.


🇮🇳 *स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य*

कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

           रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

               गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दास बाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

            १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

              लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

               १९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

            जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.


⛓️ *कारावास*

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

         १९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

                  नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

                 मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

          १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

              १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.


🔸  *युरोपातील वास्तव्य*


१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

          युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

                सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

              पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

               विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

         १९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.


⚜️ *हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद*


१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

                   ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

             आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

           १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.


🔮 *काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा*

          १९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

             १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

          सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

      पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

          १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

                 अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


🎓 *फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना*


मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

                  दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.


🏃🏽 *नजरकैदेतून पलायन*


नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

              काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.


🤝 *नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट*


बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

             अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

           काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

               शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.


💎 *पूर्व आशियातील वास्तव्य*


पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

             नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

              ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

              आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

             पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

               द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

            आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

          जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.


⌛ *बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी*


दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

            ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

            ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

               अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

               स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

                  १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

             ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

        सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.


🏅 *भारतरत्‍न पुरस्कार*


१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.


⚜️ *सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे*


सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.

सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.

सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.


📕 *चरित्रे*


अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-


गरुडझेप (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

जयहिंद आझाद हिंद (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

नेताजी (वि.स. वाळिंबे)

नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)

नेताजींचे सीमोल्लंघन (एस.एम. जोशी)

नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)

No Secrets (अनुज धर)

महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)


📚 *नेताजींवरील अन्य पुस्तके*


नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)

नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)

         

सुन्दरलाल शर्मा..

 


                *सुन्दरलाल शर्मा*  

  (स्वतन्त्रता सेनानी, सामाजिक कार्यकर्ता)

            *जन्म : 21 दिसम्बर, 1881*

                (राजिम, छत्तीसगढ़)

            *मृत्यु : 28 दिसम्बर, 1940*

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतन्त्रता सेनानी, सामाजिक कार्यकर्ता

धर्म : हिन्दू

जेल यात्रा : आप 'असहयोग आन्दोलन' के दौरान छत्तीसगढ़ से जेल जाने वाले व्यक्तियों में प्रमुख थे।

भाषा ज्ञान : संस्कृत, बांग्ला तथा उड़िया आदि।

रचनाएँ पण्डित सुन्दरलाल शर्मा ने हिन्दी तथा छत्तीसगढ़ी में लगभग 18 ग्रंथों की रचना की थी, जिसमें 'छत्तीसगढ़ी दान-लीला' उनकी चर्चित कृति थी।

अन्य जानकारी : छत्तीसगढ़ शासन ने सुन्दरलाल शर्मा की स्मृति में साहित्य/आंचिलेक साहित्य के लिए 'पण्डित सुन्दरलाल शर्मा सम्मान' स्थापित किया है।

                    सुन्दरलाल शर्मा बहुमुखी प्रतिभा के धनी, सामाजिक क्रांति के अग्रदूत तथा छत्तीसगढ़ राज्य में जनजागरणकर्ता थे। वे एक कवि, सामाजिक कार्यकर्ता, समाज सेवक, इतिहासकार तथा स्वतंत्रता-संग्राम सेनानी थे। उन्हें 'छत्तीसगढ़ का गाँधी' की उपाधि दी गई है। छत्तीसगढ़ में इनके नाम पर ही 'पण्डित सुन्दरलाल शर्मा मुक्त विश्वविद्यालय' की स्थापना की गई है।

💁🏻‍♂️ *जन्म तथा शिक्षा*

बहुमुखी प्रतिभा के धनी सुन्दरलाल शर्मा जी का जन्म 21 दिसम्बर, 1881 ई. को छत्तीसगढ़ की धार्मिक नगरी राजिम के निकट महानदी के तट पर बसे ग्राम चंद्रसूर में हुआ था। इनकी स्कूली शिक्षा प्राथमिक स्तर तक हुई। आगे की शिक्षा इन्होंने घर पर ही स्वाध्याय से प्राप्त की थी। सुन्दरलाल शर्मा ने संस्कृत, बांग्ला तथा उड़िया आदि भाषाएं भी सीख ली थीं।


✍️ *लेखन कार्य*

सुन्दरलाल शर्मा अपनी किशोरावस्था से ही कविता, लेख तथा नाटक आदि की रचना करने लगे थे। वे भारतीय समाज में व्याप्त कुरीतियों को मिटाने के लिए शिक्षा के प्रचार-प्रसार को आवश्यक समझते थे। वे हिन्दी भाषा के साथ छत्तीसगढ़ी को भी काफ़ी महत्व देते थे। पण्डित सुन्दरलाल शर्मा ने हिन्दी तथा छत्तीसगढ़ी में लगभग 18 ग्रंथों की रचना की, जिसमें 'छत्तीसगढ़ी दान-लीला' उनकी चर्चित कृति थी।


🔮 *योगदान*

19वीं सदी के अंतिम चरण में देश में राजनैतिक और सांस्कृतिक चेतना की लहरें उठ रही थीं। समाज सुधारकों, चिंतकों तथा देशभक्तों ने परिवर्तन के इस दौर में समाज को नयी सोच और दिशा दिलाने में महत्त्वपूर्ण भूमिका निभाई थी। छत्तीसगढ़ में सुन्दरलाल शर्मा ने सामाजिक चेतना का स्वर घर-घर पहुंचाने में अविस्मरणीय कार्य किया। वे 'राष्ट्रीय कृषक आंदोलन', 'मद्यनिषेध', 'आदिवासी आंदोलन', 'स्वदेशी आंदोलन' से जुड़े और स्वतंत्रता के यज्ञवेदी पर अपना सर्वस्व न्यौछावर कर दिया।


छत्तीसगढ़ के ग्रामीण अंचलों में व्याप्त रुढ़िवादिता, अंधविश्वास, अस्पृश्यता तथा कुरीतियों को दूर करने के लिए पण्डित सुन्दरलाल शर्मा ने अथक प्रयास किया। उनके हरिजनोद्धार कार्य की प्रशंसा महात्मा गाँधी ने मुक्त कंठ से करते हुए इस कार्य में इन्हें अपना गुरू माना था। 1920 ई. में धमतरी के पास 'कंडेल नहर सत्याग्रह' इनके नेतृत्व में ही सफल रहा था। इनके प्रयासों से ही महात्मा गाँधी 20 दिसम्बर, 1920 को पहली बार रायपुर आए थे।


⛓️ *जेलयात्रा*

पण्डित सुन्दरलाल शर्मा 'असहयोग आन्दोलन' के दौरान छत्तीसगढ़ से जेल जाने वाले व्यक्तियों में प्रमुख थे।


🪔 *निधन*

सुन्दरलाल शर्मा जीवन-पर्यन्त सादा जीवन, उच्च विचार के आदर्श का पालन करते रहे। सदैव समाज सेवा में रत रहने और अत्यधिक परिश्रम के कारण शरीर क्षीण हो गया और 28 दिसम्बर, 1940 को इनका देहावसान हुआ। छत्तीसगढ़ शासन ने उनकी स्मृति में साहित्य/आंचिलेक साहित्य के लिए 'पण्डित सुन्दरलाल शर्मा सम्मान' स्थापित किया है।                             

             

मोहन रानडे..

 


               *मोहन रानडे*

*(क्रांतिकारक मोहन रानडे चौदा वर्षे पोर्तुगीजांच्या कैदेत होते)*

            *जन्म : 25 दिसम्बर, 1930*

                   (सांगली, महाराष्ट्र)

           *मृत्यु : 25 जून, 2019*

पुरस्कार : पद्म श्री, 2001

गोवा पुरस्कार, 1986    

             आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम झाले. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत-हसत फासावर गेले; तसेच अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिवकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महापुरूषांनी कठोर कारावास भोगला. हालअपेष्टा सहन केल्या.


इंग्रजांची जुलूमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीही लाखांच्या संख्येने स्वातंत्र्यचळवळीत हिरीरीने भाग घेतला. प्रसंगी ब्रिटिश राजवटींच्या गोर्‍या सैनिकांच्या लाठ्यांचा सामना केला. आपल्या छातीवर निडरपणे गोळ्या झेलल्या. अनेक महापुरूषांच्या, क्रांतिवीरांच्या, स्वातंत्र्यप्रेमी देशवासीयांच्या कठोर परिश्रमानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजी राजवटीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र आनंद साजरा करण्यात येऊ लागला.


मात्र आपल्याच देशातील काही संस्थाने अद्यापही स्थानिक संस्थानिकांच्या ताब्यात होती! तसेच संपूर्ण गोवा प्रांत पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद उपभोगता आला नाही. उलट पोर्तुगिजांच्या जाचक यंत्रणेने सामान्य नागरिक मेटाकुटीला आले होते. जेव्हा सार्‍या देशात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंदोत्सव साजरा केला जात होता त्यावेळेस गोव्यातील जनता मात्र अतोनात हाल-अपेष्टांचा सामना करत होती.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने आपलीही लवकरच पोर्तुगिजांच्या जाचातून सुटका व्हावी ही तीव्र भावना त्यावेळी गोव्यातील सर्वसामान्यांची होती. त्यासाठी अनेक धाडसी युवकांनी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली.


यात अग्रभागी होते क्रांतिकारक मोहन रानडे!



त्यांच्यासोबतच प्रामुख्याने बाळकृष्ण भोसले, शंभू पालकर, सीताराम कुबल, विठ्ठल व्यंकटेश नागवेकर, सोयरू दिवकर, गोपाळराव कोरगांवकर, आत्माराम नाईक, प्रभाकर सिनारी, मनोहर पेडणेकर, बाळा मापारी, यशवंत आगरवाडेकर इत्यादी क्रांतिवीरांचा समावेश होता.


मोहन रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे दि. 25 डिसेंबर 1930 रोजी झाला. 1942च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी ते विद्यार्थी होते. 1942 च्या 9 ऑगस्ट रोजी सांगलीत निघालेल्या विशाल मोर्चाचे रूपांतर एका भव्य सभेत झाले. तेथे होणारा स्वातंत्र्याचा गगनभेदी जयजयकार मोहन रानडे यांनी पहिल्यांदाच ऐकला. त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले!


त्यानंतर सभा सुरू असतानाच ब्रिटिश शिपायांनी तेथे येऊन अत्यंत निर्दयतेने लाठीचार्ज सुरू केला. नंतर गोळीबारही केला. एकच गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा पळू लागले. पत्रावळे नावाचा एक युवक पोलिसांच्या गोळीने धारातिर्थी पडल्याचे रानडे यांनी आपल्या डोळ्याने बघितले. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला; मात्र आपण काही करू शकत नाही याचे त्यांना वाईटही वाटले. ही घटना त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवण्यास कारणीभूत ठरली.


तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा प्रभावही त्यांच्यावर होता. सन 1943 साली थोर क्रांतिकारी देशभक्त बाबाराव सावरकर सांगली येथे रूग्णशय्येवर पडून होते. अंदमान कारागृहातील दीर्घ कारावास आणि कष्टप्रद जीवन त्यांनी भोगले होते. सांगलीला असल्यामुळे मोहन रानडे आणि त्यांच्या मित्रांनाही बाबारावांचा सहवास लाभला. ते तुरूंगात भोगलेल्या हाल-अपेष्टांची ‘आपबिती’ जेव्हा मुलांना सांगायचे तेव्हा त्यांचे हात-पाय असहनीय वेदनांनी थरथरायचे.


बाबारावांच्या कापर्‍या आवाजात ऐकलेल्या अनुभवांनी आणि सहवासाने मोहन रानडे यांच्या अंतःकरणात देशप्रमाची ज्योत आणखी प्रकर्षाने प्रज्वलीत झाली. 1945 साली बाबाराव या चैतन्यमय जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाले!


त्यानंतर 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्यवादाने देशाचे दोन तुकडे करून धर्मांधतेला जणू खतपाणीच घातले. ‘नोआखाली’ येथे भयंकर रक्तपात सुरू झाला. त्याकाळी वृत्तपत्रातील बातम्या वाचून रानडे आणि त्यांच्या साथीदारांचे रक्त सळसळायचे. ते विचार करायचे, आपण आत्ता उठावं आणि नोआखालीला जाऊन अन्यायाचा प्रतिकार करावा! शेवटी त्यांनी एकदिवस घरी न सांगता आपल्या साथीदारांसह मुुंबई गाठली. तेथे त्यांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली. मग जोशातच त्यांना आपला उद्देश सांगितला.


त्यावेळी स्वातंत्र्यवीर त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आता विद्यार्थी आहात. आधी आपलं शिक्षण पूर्ण करा, मग थोडं मोठं झाल्यावर राजकीय वा सामाजिक कार्याचा विचार करा.’’


त्यावेळी रानडे यांना वाटलं, स्वातंत्र्यवीर बहुतेक आपली परीक्षा घेत असावेत. सामान्य व्यवहाराच्या गोष्टी सांगून आपली पारख करत असणार! नंतर थोडा विचार करून अचानक रानडे यांनी स्वातंत्र्यवीरांना प्रश्‍न केला, ‘‘तुम्ही जेव्हा आमच्यासारखे युवावस्थेत होता तेव्हा या गोष्टींचा विचार का नाही केला? त्यावेळी तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंचे पोवाडे रचून गायचे, तसेच तुम्ही विलायती कपड्यांची होळी केली. त्यासाठी लोकाना प्रोत्साहित केलं आणि परिणामी तुम्हाला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं!’’


रानडे यांचं बोलणं ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभावीत झाले आणि म्हणाले, ‘‘शत्रुने तयार केलेल्या रणभूमीवर आपण लढायला जाणं योग्य नाही. आपण आपल्या सोयीनुसार रणभूमीची निवड करावी आणि शत्रुला तेथे येण्यास बाध्य करावे.’’ हे मर्मभेदी वक्तव्य ऐकून रानडे आणि त्यांच्या साथीदारांनी नोआखाली येथे जाण्याचा विचार सोडून दिला. मात्र स्वातंत्र्यवीरांचे वरील वक्तव्य त्यांच्या काळजात कोरले गेले.


नंतर ते गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी रणनीती आखायला अत्यंत सहायकारी ठरले. यावेळी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोवा येथे पहिली सत्याग्रह चळवळ उभारल्याची बातमी सांगलीला पोहोचली तेव्हा पहिल्यांदाच गोमन्तक भूमिचं नाव मोहन रानडे यांच्या कानी पडलं. त्यावेळी गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता असल्यानं तेथील लोकांचे डोळे मोठ्या आशेने त्या सत्याग्रहाकडं लागले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने आता गोवासुद्धा लवकरच पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त होणार असंच सर्वांना वाटत होतं.


थोर स्वातंत्र्यसैनिक स. का. पाटील यांनी ‘आता चोवीस तासांच्या आत गोव्यातील ‘आग्वाद’ किल्ल्यावर तिरंगा फडकताना दिसणार’ अशी गर्जना केली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या; मात्र दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा 1948 साल संपले तरी ‘आग्वाद’वर फडकला नाही. मग 1949 सालही संपत आले. मोहन रानडे व त्यांचे सांगलीचे मित्र बापू साठे बेचैन झाले.


गोवा मुक्तीसाठी आता आपणच पुढाकार घ्यावा असा विचार करून एका पिशवीसह रानडे यांनी मित्रासह सांगली सोडली. गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदे या गावात पोहोचताच रानडे यांनी डॉ. र. के. बर्वे यांचे घर गाठले. तेथे त्यांना समजले, गोव्यातील समस्त जनतेला मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण हवंय मात्र पोर्तुगीज सरकारचा त्याला विरोध होता.


तरीही गोव्यातील शाळांमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांना विशेष मागणी होती. अशाप्रकारच्या शाळा अनधिकृत मानल्या जायच्या. म्हणूनच या शाळा मंदिरात किंवा धर्मशाळेत भरायच्या. त्यासाठी गोमन्तक जनता वर्गणी गोळा करून शिक्षकांना वेतन द्यायची. काहीजण त्यांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था बघायचे.


गोव्यात त्यावेळी गावागावात मराठी शिक्षकांना खूप मान होता. त्याकाळात पोर्तुगीज सरकारमधील अधिकारी पर्वतराजीमध्ये वसलेल्या खेडेगावात जाण्याचं सहसा टाळायचे कारण तेथे जाण्यासाठी अवघड घाटरस्ते होते. या संधीचा फायदा घेण्याचे मोहन रानडे यांनी ठरवले आणि त्यांनी शिक्षकी पेशा पत्करून आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. त्यासाठी त्यांना सावई गावचे पटवारी पद्माकर सावईकर यांची मोलाची मदत झाली.


दुसरं असं की, रानडे यांनी एक पैसाही मानधन न घेता आपलं शिक्षण कार्य सुरू केलं. त्यामुळं ते अल्पावधीतच गोव्यात लोकप्रिय ठरले. गोवा मुक्ती चळवळीला तेथील स्थानिक रहिवाशी ‘जय हिंद आंदोलन’ या नावानं ओळखायची.


या आंदोलनाशी संबंंधित अण्णा देशपांडे यांच्याशी रानडे यांचा परिचय झाला. ते डॉ. लोहिया यांचे सहकारी होते. त्यावेळी त्यांचे डोंगरी या गावी राहून हिंदी, इंग्रजी शिकवण्याचे कार्य सुरू होते. त्यांच्याकडूनच रानडे यांना गोवामुक्ती चळवळीची बरीच माहिती मिळाली. मात्र थंडावलेली चळवळ एका मोठ्या आंदोलनात रूपांतरीत करायची प्रतीक्षा सर्वांनाच होती.


अशातच मध्यंतरी एका दुर्दैवी घटनेला रानडे यांना सामोरं जावं लागलं.


झालं असं की, कुणी एक पाताळयंत्री इसम रानडे यांच्या उपक्रमाबाबत पोर्तुगीज अधिकार्‍यांना कळविणार असल्याची गोपनीय माहिती त्यांच्या मित्राला समजली. तो तत्परतेनं रानडे यांना येऊन भेटला व ताबडतोब त्यांना गोव्याबाहेर पडण्यास सुचवलं. त्यावेळी ‘मनोहर आपटे’ या आपल्या सांगलीतील खर्‍या नावानं रानडे तिथं शिक्षणकार्य करायचे; मात्र मित्रांमार्फत गोपनीय माहिती मिळताच त्यांनी लगेच गोवा सोडण्याचा निर्णय घेतला.


जड अंतःकरणानं रानडे यांनी गोव्याची हद्द ओलांडली, ती परत एकदा दृढ निर्धार करून गोवामुक्तीसाठी परतण्याची! मग काही काळानंतर म्हणजे 1950 च्या एप्रिल महिन्यात गोव्यात परतले ते ‘मोहन रानडे’ हे नाव धारण करून.


ज्याला गोव्याची खडान्खडा माहिती होती अशा बाळा पर्येकर या मित्रासोबत ते मोर्ले येथून पणजी जवळच्या नावशी या खेडेगावी येऊन पोहोचले. नावशी हे एक मागासलेले गाव होते. त्याठिकाणी रानडे यांना कुणी ओळखायचा प्रश्‍नच नव्हता.


लवकरच त्यांनी गावकर्‍यांच्या मुलांना मराठीत प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले तसेच त्यांच्याकडून थोडीफार कोकणी भाषाही शिकून घेतली. विनामूल्य शिक्षण देणे हे ध्येय समोर ठेवल्याने रानडे नावशीमध्ये लवकरच लोकप्रिय झाले. काही दिवसातच प्रौढ मंडळीही शिकायला येऊ लागली. या सर्व धामधुमीत रानडे यांनी तेथील लोकाचं जीवनमान जवळून अनुभवलं. पणजीला जाण्यासाठीचे सर्व मार्ग माहिती करून घेतले.


मात्र त्यांच्या लवकरच लक्षात आलं, नावशीसारख्या छोट्या गावात राहून आपलं व्यापक कार्य आपण करू शकणार नाही. मित्रांसोबत विचारविनिमय केल्यावर नावशी गाव सोडून मोहन रानडे 1952 च्या फेब्रुवारीत सावई येथे पोहोचले. तेथे त्यांनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. विनामोबदला शिक्षण असल्यानं त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. याठिकाणी त्यांना शंभू पालकर सारखा निधड्या छातीचा, जिवाभावाचा साथीदार भेटला, ज्यानं पुढं गोवा मुक्तीसंग्रामात अनेकांना सहभागी करून घेतलं.


काही दिवसातच 1953 च्या मार्च महिन्यात अण्णा देशपांडे सावई गावात आले. त्यांनी गोवा हद्दीबाहेरील ‘वजरा’ येथे होणार्‍या गोवा नॅशनल कॉंग्रेसच्या बैठकीबाबत रानडे यांना सांगितले. नंतर अशाप्रकारे बैठका, शिबिरांना जाऊन मुक्तीसंग्रामासाठीची तयारी सातत्यानं सुरू होती. गोव्याच्या हद्दीलगत सावंतवाडीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या आंबोली येथे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हा भाग दाट जंगलानं वेढलेला आणि आणि डोंगरमाथ्यावर होता. त्याठिकाणी ‘आझाद गोमन्तक’दलाची माहिती आणि पोर्तुगिजांची सत्ता उलथवून लावण्यासाठी सशस्त्र उपाययोजनेची आवश्यकता तसेच त्यासाठी युद्धकलेचं शिक्षण देण्याबाबत सर्वांना अवगत करण्यात आलं.


तिथं मेणबत्तीच्या अंधुक उजेडात दलाच्या संचालकांनी मोहन रानडे आणि त्यांच्या साथीदारांना शपथ देवविली,


‘‘दीव, दमण आणि गोवा हे भारताचे अविभाज्य घटक आहेत. या प्रदेशातील पोर्तुगिजांची जुलमी सत्ता यथाशक्ती उपायांनी नष्ट करून भारतात पुन्हा विलीन करण्याच्या उद्देशाने मी आज ‘आझाद गोमन्तक’ दलाचा स्वयंसेवक म्हणून शपथ घेत आहे. या दलाच्या उद्देशपूर्तीसाठी मी आपल्या सर्वस्वाचा होम करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि आपल्या साथीदारांसोबत तथा दलाशी कधीही विश्‍वासघात करणार नाही. जय हिंद!’’


‘वजरा’ हे आझाद गोमन्तक दलाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. तेथील 1954च्या बैठकीत दादरा-नगरहवेली मुक्तीसाठी बरीच चर्चा करण्यात आली.


काही दिवसातच बातमी येऊन धडकली. 23 जुलै 1954 रोजी स्थानिक सत्याग्रहींच्या अथक प्रयत्नांनी दादरा स्वतंत्र झाल्याची.


त्यावेळी मोहन रानडे सावई या गावातील शाळेत शिकवत होते. त्यांच्या मित्राने बाळा पर्येकराने ही बातमी त्यांना दिली. त्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास नगरहवेलीची राजधानी ‘सिल्व्हासा’वर आक्रमण करण्याच्या उद्देशाने विश्‍वनाथ लवंदे आणि राजाभाऊ वाकणकर यांच्याशी रानडे यांची चर्चा झाली. नगरहवेली मुक्तीसाठी उत्साह संचारला. शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू झाली. 31 जुलैच्या रात्री नगरहवेलीच्या हद्दीत प्रवेश करण्याचं ठरलं.


याच काळात रानडे यांचा परिचय संगीतकार सुधीर फडके यांच्याशी झाला. ते चित्रपट संगीतासाठी नव्हे तर मुक्तीसंग्रामात योगदान देण्यासाठी तेथे पोहोचले होते. मुंबईहून येताना त्यांनी ‘सतार’च्या बॉक्समध्ये काही शस्त्रास्त्र देखील आणले होते. सारखा पाऊस पडत असतानाही सर्वांना रात्रीचा पायी प्रवास घडला. त्यावेळी रानडे यांच्यासोबत सुधीर फडके आणि इतर चार-पाच साथीदार पहाटे नरोली या गावी पोहोचले.


तेथे मध्यरात्रीच दुसर्‍या रस्त्याने पोहोचलेले प्रभाकर सिनारी, राजाभाऊ वाकणकर, नाना काजरेकर, कृष्णा माईनकर यांच्यासह बर्‍याच कार्यकर्त्यांची भेट झाली. उत्साहात सर्वांनी मसलत करून समोर दिसणार्‍या पोलीस चौकीवर ताबा मिळवला. चौकीत असलेले शिपाई त्यावेळी पळून गेले होते. त्यानंतर नगरहवेलीची राजधानी सिल्व्हासापासून पाच-सहा किमी अलीकडे असलेल्या चौकीवर आक्रमण करून ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली. तेथील दोन शिपायांना बंदी बनवण्यात आले.


त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सिल्व्हासावर आक्रमण करण्याची योजना आखण्यात आली. मात्र भारत सरकारच्या उदासीनतेमुळे आणि अपुर्‍या शस्त्र सामुग्रीमुळे सिल्व्हासा ताब्यात घेण्यास चार-पाच दिवस लागले.


पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेले नगरहवेली आता मुक्त झाले होते. राजधानी सिल्व्हासा येथील पोर्तुगीजांचे झेंडे उतरवून तिरंगा फडकावण्यात आला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला! आता सगळ्यांचे डोळे लागून राहिले ते गोवा मुक्तीसाठी.


येणार्‍या 15 ऑगस्ट 1954 ला भारतीय सेना गोवा ताब्यात घेऊन गोवामुक्तीची घोषणा करणार असे सर्वांनाच वाटत होते, मात्र ज्याप्रकारे जास्त प्रतिकार न करता दादरा आणि नगरहवेली मुक्त करण्यात आले त्याच सहजतेने गोवा मुक्त होणे शक्य नव्हते. याबाबत रानडे आणि त्यांचे नेते व सहकारी चांगल्या प्रकारे जाणून होते.


10 ऑगस्ट 1954 रोजी मोहन रानडे आपल्या साथीदारांसह वजरा या ठिकाणी परत आले. नंतर बाळा पर्येकराच्या मदतीनं सर्वजण हद्द ओलांडून गोव्यात दाखल झाले. नगरहवेली मुक्तीसंग्रामाच्या यशस्वीतेनंतर गोव्यातील स्थानिकांना खात्री पटली होती की, आता लवकरच आपल्याकडं स्वातंत्र्यसंग्रामासाठी युद्ध होणार!


त्यासाठी लोकांनी फटाके खरेदी करून ठेवले. कित्येकांनी शिंप्याकडं जाऊन भारतीय तिरंगा शिवून घेतला. सर्वजण 15 ऑगस्टची प्रतीक्षा करण्यात गुंग होते. बर्‍याच दिवसांनी लोकाच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता. आता लवकरच भारतीय सेना गोव्यात येणार या आशेवर स्थानिक वाट पाहत होते.


15 ऑगस्ट 1954 चा दिवस उजाडला. मात्र सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला. ना भारतीय सेना गोव्यात आली, ना गोवा मुक्तीची घोषणा झाली.


मोहन रानडे यांना एकाच गोष्टीचं दुःख झालं. पोर्तुगीज शासन नगरहवेली हातातून गेल्यानं घाबरलेलं होतं. त्याचा फायदा भारत सरकार घेऊ शकत होतं. पोर्तुगीजांच्या कमजोरीचा लाभ उठवण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र त्याचा भारतीय नेत्यांना लाभ उठवता आला नाही हे दुर्दैवच!


गोवामुक्तीची सुवर्णसंधी भारत सरकारनं गमावली असंच म्हणावं लागेल कारण त्यानंतर गोव्यातील पोर्तुगीजांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला. ते पूर्वीप्रमाणं शिरजोर झाले. मग संशयित गोमन्तकीयांचं पकडसत्र सुरू झालं. सावई येथे छापा मारून विश्‍वनाथ सावईकरांना पकडण्यात आलं. तेथे रानडे यांची चौकशी करण्यात आली. सुदैवानं त्यावेळी ते दूर टेकडीवर होते म्हणून बचावले.


1954 सालच्या 31 डिसेंबरची रात्र. आत्माराम जांभुळकर यांच्या झोपडीवजा घरी दासू, शंभू पालकर या साथीदारांसह मोहन रानडे जमले होते तेव्हाच शिवोली येथून बापू साठे, बाबला, येशी, लाडू, पुंडलिक इत्यादी सहकारी पण तेथे येऊन त्यांना सामील झाले. आत्मारामच्या घरापासून पाच-सहा किमीवर असलेल्या बाणस्तरच्या पोलीस चौकीवर हल्ल्याची योजना आकाराला आली. चौकी लुटून तेथील बंदुका हस्तगत केल्या जाऊ शकत होत्या.


नगरहवेलीच्या संग्रामातून नजर चुकवून आणलेलं एक पिस्तूल अन् तुटपूंजी शस्त्रे हातात होती. तसेच सोबत बांबुच्या लाठ्याही होत्या. रानडे आणि त्यांच्या सहकार्‍यांना त्यावेळी वाटलं,


भारत सरकार तर आम्हाला शस्त्रास्त्रांची मदत करणार नाही, न करो! पण आमच्या हृदयात भडकलेलं देशभक्तीचं अग्निकुंड कसं विझवणार? आम्हा आझाद गोमन्तक दलातील कार्यकत्यांना तसेच गोवामुक्तीसाठी लढणार्‍या इतर देशभक्तांना आपल्याच सरकारच्या प्रतिकूल वागणुकीचा सामना करावा लागत आहे तरीही आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही दृढ संकल्प केला आहे. आता माघार नाही!


सर्वानुमते पहाटे चार वाजता बाणस्तरच्या चौकीवर हल्ला करायचा असं ठरलं, कारण त्यावेळी रात्रगस्त पाहरेकरी पेंगुळलेल्या अवस्थेत किंवा अर्धवट झोपलेले असतात.


रानडे यांच्यासह आठजण आपापल्या लाठ्या घेऊन चौकीच्या आसपास पोहोचले. दासूजवळ त्याची छोटी पिशवी होती. रानडेंनी त्यांची पिस्तूल बापूकडं सुपूर्त केली. दोघंही आवाज न करता चौकीजवळ गेले, तेवढ्यात कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजानं पहारेकर्‍याला जाग आली. तीन-चार जण आत झोपलेले होते.


पहारेकर्‍यानं आपली बंदुक घेण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर लाठ्या बरसल्या आणि बाळूनं त्याच्यावर पिस्तूल रोखली. तो गयावया करायला लागला. पहारेकर्‍याच्या आवाजानं आतील शिपाई जागे झाले अन् ओरडले, ‘‘आम्हाला मारू नका, आम्ही बाहेर येतो.’’ सर्वांचं लक्ष तिकडं गेलं मात्र तेवढ्यात पहारेकर्‍यानं संधी साधून बाळूच्या हातचं पिस्तूल हिसकण्यासाठी झटापट केली. ते बघून दासू पुढं आला अन् त्यानं पहारेकर्‍यावर दोन फायर केले. त्याच्या किंकाळीनं आतल्या शिपायांचा आरडाओरडा सुरू झाला. पहारेकर्‍याजवळची पिस्तूल बाळूनं आपल्या ताब्यात घेतली आणि तो दोन्ही हातात दोन पिस्तूलं घेऊन आत जाण्याच्या तयारीत असतानाच मोटारगाडी येत असल्याचा आवाज आला.


एव्हाना साडेचार वाजले होते. चौकीवर 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला होता. अधिक काळ तिथं राहणं म्हणजे धोका पत्करण्यासारखं होतं. त्यामुळं सगळ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’च्या घोषणा देत चौकी सोडली. जंगलाच्या रस्त्यानं सर्व पसार झाले!


1 जानेवारी 1955 हा दिवस मोहन रानडे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस मानतात कारण बाणस्तरच्या चौकीवर हल्ला केला त्यावेळी बाळू साठे अन् स्वतः रानडे सोडले तर बाकीचे सहाजण शेतकरी होते. कसलंही प्रशिक्षण नसताना हातात लाठ्या घेऊन अन् देशभक्तीनं प्रेरित होऊन हत्यारबंद पहारेकरी चौकीत असताना त्यांनी हल्ल्याचं अभूतपूर्व धाडस केलं. दुर्दैवानं चौकीवर ताबा मिळवता आला नाही मात्र या घटनेनं सर्वांचाच आत्मविश्‍वास दुणावला होता.


त्यामुळं जानेवारीच्या शेवटी गाळेली आणि कळंगुट येथील पोलीस चौक्यावर हल्ल्याची योजना साकारली गेली. परंतु तिथं एक पिस्तुल अन् काही काडतुसे याव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. विशेष कामगिरी करण्यासाठी शस्त्रास्त्रांची गरज होती. काही दिवसातच अस्नोडा गावचा गोपी चोडणकर हा धाडसी कार्यकर्ता रानडे यांच्याकडं खबर घेऊन आला… अस्नोडाच्या पोलीस चौकीत भरपूर शस्त्रास्त्रं आहेत. त्यामुळं सगळ्यांची आशा जागवली गेली. त्या रात्रीच बैठक घेऊन पुढील योजना ठरवण्यात आली.


अस्नोडाची चौकी गोव्यातील म्हापसा-डिचोलीच्या मोठ्या रस्त्याच्या कडेला होती. जवळच बाजार होता. या चौकीवर यशस्वी हल्ला करून शस्त्रास्त्रं हस्तगत करणं खूपच जिकिरीचं काम होतं.


सर्व साथीदारांसह दि. 5 फेब्रुवारी 1955 च्या सायंकाळच्या अंधारात रानडे अस्नोडा गावी पोहोचले. तेथील स्थानिक कार्यकर्ता बाळा मापारी चौकीच्या मागील बाजूच्या झोपडीत रहायचा. त्याच्या घरी गोपी चोडणकर आधीच येऊन बसला होता. बाळा अन् गोपी अस्नोडा गावी शेतमजूरी करायचे. सर्व साथीदार गोळा झाल्यावर बाळाच्या घरीच योजना आखून रात्री नऊ वाजता बाहेर पडायचं ठरलं. रानडे, अनंत थळी आणि सुखा पुढं चौकीकडं निघाले. पाठोपाठ येशी, लाडू, दत्ता दुसर्‍या बाजूनं जाऊन थांबले. बाळा मापारी आणि गोपी स्थानिक असल्यानं त्यांना चौकीकडं येऊ न देता दुरून लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं.


चौकीजवळ पोहोचताच रानडे यांच्या लक्षात आलं, आतून चौकीचा दरवाजा बंद आहे. एक शिपाई गस्त घालण्यासाठी गेल्याचं समोरच्या दुकानदारांकरवी कळलं. त्या शिपायाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग काहीतरी विचार करून रानडे, अनंत थळी अन् सुखा बाजाराच्या दिशेनं जाऊन थांबले. त्याचप्रमाणं दत्ता आणि इतर दोघं दुसर्‍या रस्त्यावर नजर रोखून होते.


सुदैवानं 15-20 मिनिटांत शिपाई येत असल्याची चाहूल लागली. रात्र झाल्यानं सर्वत्र सामसूम झालं होतं. शिपाई जवळ येताच रानडे यांच्यासह तिघंही अचानक त्याच्या समोर आले. शिपायानं दचकून विचारलं, ‘‘कौन हो तुम लोग?’’ काही उत्तर न देता अनंत थळीनं डाव्या हातानं त्याच्या कानाखाली वाजवली. त्याचा ओव्हरकोट खाली पडला. खांद्यावर 303 बंदूक लटकत होती. त्याचवेळी रानडे यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि आडदांड सुखानं त्याची बंदुक ताब्यात घेऊन त्याचे दोन्ही हात पाठिमागं बांधले.


अचानक झालेल्या हल्ल्यानं शिपाई चांगलाच घाबरला. गयावया करू लागला, ‘‘मुझे मत मारो, जो कहोगे वो करूंगा।’’ ‘‘ये ओरडू नकोस… आवाज न करता चौकीकडं चल.’’ रानडे त्याच्यावर खेकसले. शिपायाला घेऊन चौकीजवळ येताच दत्तासोबत दुसर्‍या बाजूला असलेले दोन्ही साथीदार रानडे यांना येऊन मिळाले.


नंतर शिपायाने चौकीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला. लगेच दरवाजा उघडला गेला. आत फक्त एकच शिपाई होता. तो आपल्या जोडीदाराची अवस्था बघून चांगलाच भयभीत झाला. त्याच्यावर पिस्तूल रोखत रानडे यांनी त्याला भिंतीकडे तोंड करून उभं राहण्यास फर्मावलं. अनंत थळी अन् सुखा दोन्ही शिपायांवर लक्ष ठेवून होते. बाकीच्यांनी चौकीतील बंदुका, पिस्तूले आणि काही काडतुसे ताब्यात घेतली. नंतर सर्वजण तेथील कुलूप घेऊन बाहेर पडले. दोन्ही शिपायांना आत डांबून कुलूप ठोकण्यात आले. दूरवर बाळा मापारी अन् गोपी लक्ष ठेवून होते. मग सर्वजण अधिक वेळ न दवडता रातोरात शिवोलीला जाऊन पोचले.


या घटनेने पोर्तुगीज सत्तेला चांगलाच हादरा बसला. दुसर्‍या दिवशी संपूर्ण गोव्यात अस्नोडा चौकी घटनेचीच चर्चा होती. या घटनेनंतर प्रत्येक चौकीच्या दरवाजावर रात्रंदिवस बंदुकधारी पहारेकरी दिसू लागले. चार-पाच दिवसांनी अस्नोडा येथे परतताच बाळा मापारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. मात्र बाकी कोणीच पोलिसांच्या हाती लागलं नाही.


बाळा मापारीनं शेवटपर्यंत आपल्या साथीदारांची नावं ओठावर येऊ दिली नाहीत. त्यानं पोर्तुगीजांच्या अतोनात हाल-अपेष्टा सहन केल्या. परिणामी त्याला पणजीच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवानं गोवा मुक्ती सशस्त्र आंदोलनाचा तो पहिला हुतात्मा ठरला!


स्वातंत्र्यदेवतेच्या वेदीवर बाळानं आपली आहुती दिली. रानडे आणि साथीदारांना ही बातमी समजली तेव्हा सर्वजण सुन्न झाले. बाळा मापारीला मूक श्रद्धांजली वाहण्यात आली. तरीही पुढील संकटं ओळखून जराही विचलित न होता रानडे आणि त्यांचे सहकारी सावई अन् शिवोली डोंगर-दर्‍यात राहू लागले.


त्यानंतर संधी मिळताच एप्रिल 1955 मध्ये रावण या चौकीवर हल्ला करण्यात आला; मात्र दुर्दैवानं तो अपयशी ठरला. मग अजिबात निराश न होता पुढील योजना आखण्यात आली. हळदोण पोलीस चौकीवर केलेला हल्ला चांगलाच यशस्वी ठरला. त्यावेळी रानडे यांना रामदास चाफाडकर, माधव कोरडे, बाळकृष्ण भोसले या साथीदारांची जिवाभावाची साथ लाभली.


या हल्ल्यानंतर दोन सक्तीचे नियम सर्वांनी पाळायचं ठरवलं. एक म्हणजे कोणीही दारूला स्पर्श करणार नाही दुसरा म्हणजे हल्ला करतेवेळी रूपये, पैसे लुटायचे नाहीत.


बाणस्तर पोलीस चौकीवरील हल्ल्यापासून सुरू केलेल्या सशस्त्र आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे 15 शस्त्रांची प्राप्ती. ही पिस्तुलं, बंदुका शस्त्रं पोर्तुगीज शिपायांशी लढताना हस्तगत केली होती. आता कमीत कमी 15 जणांची सशस्त्र टीम तयार असल्यानं रानडे आणि सहकार्‍यांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला होता. या फलनिष्पत्तीसाठी प्रत्यक्ष कार्यवाहीत लाठ्या-काठ्यांसह भाग घेणार्‍या शेतमजूरांचा सहभागही मोलाचा होता. तसेच आपल्या झोपडीवजा घरात आश्रय देणार्‍या, आपल्या भाकरीतून अर्धी भाकरी खाऊ घालणार्‍या दिलदार गोमन्तकीय लोकाचा तसेच दाट जंगलातून भर पावसात रस्ता दाखविणार्‍या स्थानिकांची नि:स्वार्थ साथ लाखमोलाची होती.


1955 च्या 15 ऑगस्टला गोवा मुक्तीच्या लढ्यासाठी भारतातील अनेक देशभक्त नेत्यांनी सत्याग्रह आयोजित केला होता. अगदी सकाळपासूनच भारताच्या कानाकोपर्‍यातून हजारो सत्याग्रही गोव्याच्या हद्दीजवळील सावंतवाडी येथे गोळा होण्यास येऊ लागले.


‘भारत माता की जय’चे नारे दुमदुमू लागले. शेकडो लोकांनी तिरंगा हातात घेत गोव्याची हद्द ओलांडून सावंतवाडी येथे प्रवेश केला.


सत्याग्रहाला सुरूवात झाली; मात्र काही वेळातच पोर्तुगीज सैनिकांनी जमावावर गोळीबार सुरू केला. तरीही भारतीय हद्दीतून सत्याग्रहींचा लोंढा उत्स्फूर्तपणे सावंतवाडीकडं सरकतच होता. जे सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाले त्यांना बलिदान द्यावे लागले.


महात्मा गांधींच्या अहिंसक पद्धतीनं सत्याग्रह सुरू असतानाच जुलमी पोर्तुुगिजांनी अमानुषपणे गोळीबार करणं म्हणजे अत्याचारच होता. अशावेळी भारत सरकारनं मदतीसाठी भारतीय सेना तर पाठवली नाहीच, या घटनेचा साधा निषेधही नोंदवला नाही.


या अभूतपूर्व घटनेचे दुसर्‍या दिवशी भारतभर तीव्र पडसाद उमटले. अनेक संघटनांनी, संस्थांनी राज्याराज्यातून भारत सरकारच्या तटस्थ भूमिकेची अतिशय तीव्र शब्दात निंदा करून जाहीर निषेध व्यक्त केला. या घटनेेनं गोव्यातील स्थानिकात अस्वस्थता पसरली.


रानडे आणि त्यांच्या साथीदारांनी डोंगरावरील निर्जन ठिकाणी बैठक घेतली. सर्वांचंच रक्त सळसळत होतं. प्रत्येकजण आपापला रोष व्यक्त करत होता. एक साथीदार ओरडला, ‘‘इस खून का बदला हम लेकर रहेंगे!’’ नंतर सगळ्यांना शांत करत रानडे यांनी पुढील योजना कशा आखायच्या याबाबत आपले विचार व्यक्त केले. स्फोटके तयार करण्यासाठी लागणार्‍या जिलेटीनच्या गोदामावर हल्ला करून ते हस्तगत करण्याची योजना पूर्णत्वास आली. त्यासाठी शिरगावचे गोदाम निश्‍चित करण्यात आलं.


1955 सालच्या ऑक्टोबरची 5 तारीख!


पहाटे पाच वाजता पन्नासजण तयारीत होते. प्रभाकर सिनारी यांच्याकडं पुण्याहून आणलेली स्टेनगन होती तर बाराजण इतर शस्त्रांनिशी तयार होते. सर्वजण शिरगावच्या टेकड्यातील गुहेतून गोदामावर व शेजारच्या वस्तीवर दिवसभर लक्ष ठेऊन होते. नंतर काही साथीदार हळूहळू आसपासच्या परिसरात आपली जागा घेऊ लागले.


जवळपास रात्री नऊ वाजता अत्यंत सावधगिरीनं गोदामाकडं कूच करण्यात आली. रानडे यांच्यासोबत बाळकृष्ण भोसले आणि कान्होबा नाईक होते. तर त्यांच्या मागे अंतर राखत गटागटाने बाकी साथीदार निघाले. गोदामाच्या मुख्य द्वारात एक चौकीदार दिसताच तो काही हालचाल करण्याआधीच बाळकृष्ण आणि कान्होबानं त्याला पकडलं. त्याचे हातपाय बांधण्यात आले. तिथून पन्नासएक फुटावर दोन-तीन चौकीदार होते. गोदामाला कुलूप होतं.


रानडे आणि इतर साथीदार तसंच प्रभाकर सिनारी यांच्या हातातील स्टेनगन बघून तिन्ही चौकीदार गर्भगळीत झाले आणि लगेच शरण आले. त्यांच्याकडं कुलूपाची चावी नव्हती. मग बर्‍याच प्रयत्नानंतर कुलूप तोडण्यात आलं. आत गेल्यावर झटपट 30-35 जिलेटीनचे बॉक्स बाहेर काढले आणि बाकी साथीदारांनी चारही चौकीदारांना आत कोंडून बाहेरून कान्होबानं कडी लावली. नंतर पाच-पाचच्या गटानं सर्व बॉक्स घेऊन टेकड्या, जंगल मार्गानं वजरापर्यंत वाटचाल करणं भाग होतं. त्यासाठी रात्रभर पायी प्रवास करणं हा एकच पर्याय होता.


रस्त्यावरून जाण्याचा धोका न पत्करता अत्यंत सावधगिरीनं सगळेजण वजरा येथे पोहोचले. तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. काळोखात मोहिम फत्ते झाली होती. दुसर्‍या दिवशी घटनेची माहिती मिळताच पोर्तुगीज सरकारची पाचावर धारण बसली. मग प्रत्येक संशयास्पद ठिकाणी, टेकड्यांवर छापे टाकून पोर्तुगीजांनी शोधकार्य सुरू केलं; मात्र कुणी हाती लागलं नाही. कारण सर्व माल आधीच हद्दीबाहेर वजरा येथे सुरक्षित ठिकाणी पोहोचला होता.


हस्तगत केलेल्या या जिलेटीनमुळे पुढील कार्यवाहीत बरीच मदत झाली. कधी पूल उडवण्यात आले तर कधी पोर्तुगिज सरकारच्या जीप जाळण्यात आल्या. बॉंब बनवण्याच्या कामातही जिलेटीनचा खूप उपयोग झाला. या अभूतपूर्व यशामुळं रानडे आणि त्यांच्या साथीदारांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यानंतर लवकरच मोठा हल्ला करण्याचा बेत ठरवण्यात आला.


आता चौकी नाही तर अख्खे पोलीस स्टेशन ताब्यात घेण्याची योजना आकाराला येऊ लागली. ‘बेती’ पोलीस स्टेशन हे राजधानी पणजीला लागून होते. तसेच तेथून पोम्बुर्पाचं जंगलही जवळ होतं. मोठी कामगिरी करण्याच्या उद्देशानं रानडे आपल्या साथीदारांसह पोम्बुर्पाच्या जंगलात राहू लागले, जेणेकरून बेती पोलीस स्टेशनची व आसपासची माहिती घेणं सोयीचं होईल.


बेती हे राजधानी पणजीचं प्रवेशद्वारच होतं. सर्व दृष्टिनं महत्त्वाचं ठिकाण.


दासू चाफाडकर, शंभू पालकर आणि माधव कोरडे यांना पोर्तुगीजांचा सहकारी किस्तुदच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सर्वत्र चौकशी सत्र सुरू होतं. पोर्तुगीज अधिकारी मोन्तेरूची गोव्यात जबरदस्त दहशत होती.


22 ऑक्टोबर 1955 रोजी मोहन रानडे आणि बाळकृष्ण भोसले बेती पोलीस स्टेशनची दुरून पाहणी करण्याच्या उद्देशानं त्या परिसरात पोहोचले. दर्शनी भागात दोन शिपाई बंदुका घेऊन उभे होते तर काही शिपायांच्या कंबरेला पिस्तूल लटकवलं होतं.


आतल्या भागात बंदुका असल्याचं खिडकीतून बाळकृष्णाच्या नजरेस पडलं. तेथून परतल्यानंतर 25 ऑक्टोबरला सायंकाळी बेती पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार मग 25 तारखेच्या दुपारी एका सहकार्‍याला सविस्तर माहिती काढायला पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं; मात्र तो परत आला तेव्हा समजलं, पोलीस स्टेशन बेती येथे पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यादिवशीची योजना रद्द करून दुसर्‍या दिवशी निश्‍चित करण्यात आली.


26 ऑक्टोबर 1955चा दिवस उजाडला. मोहन रानडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. आधी बेतीला जाऊन पोलीस स्टेशनची एकंदर स्थिती पाहणं, नंतर त्यानुसार तिथून टॅक्सी घेऊन पोम्बुर्पाला पोचणे आणि आपल्या सर्व साथीदारांना शस्त्रास्त्रासह परत बेतीसाठी बेतीसाठी रवाना होणं असं नियोजन ठरलं.


मग त्यानुसार दुपारनंतर सूट-बुट घालून रानडे बेतीसाठी रवाना झाले. पोलीस स्टेशनजवळ पोचताच तेथील हवालदाराचा आरडाओरडा त्यांच्या कानी पडला. तर काही शिपाई परिसरात दिसून आले. समोरच असलेल्या चहाच्या टपरीवरून रानडे त्यांचे निरिक्षण करत होते. सर्व परिस्थिती आवाक्यात असल्याचं लक्षात आल्यानंतर ते लगेच टॅक्सी करून पोम्बुर्पासाठी निघाले.


गावाच्या वेशीवरच बाळा पर्येकर डोक्यावर शॉल घेऊन उभा असलेला त्यांना दिसला. टॅक्सी थांबताच बाळानं इशारा केला. जवळच्या शेतात लपलेले सर्व साथीदार बाहेर निघून टॅक्सीत बसले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत होता. मनोहर पेडणेकरने पाव बाहेर काढले. ते सर्वांनी कसेबसे खाल्ले. ड्रायव्हरला पण खाऊ घातले.


सात वाजेपर्यंत बेती-म्हापसा रोडवर टॅक्सी पोचली. टॅक्सीतून उतरून सर्वजण वेगवेगळ्या दिशेनं चालू लागले. मनोहर पेडणेकर, शिवलिंग भोसले, सुखा शिरोडकर व रघुनाथ शिरोडकर आपापली जागा घेण्यास पोलीस स्टेशनकडं निघाले. सर्वांकडेच पिस्तूल होते. रानडे त्यांच्या मागे स्टेनगन घेऊन चालू लागले. बाळकृष्ण भोसले बंदुकीसह रस्त्यावर लक्ष देण्यासाठी आणि बाळा पर्येकर डोक्यावर शॉल पांघरून अंधारातून नजर ठेवण्यासाठी सजग होता.


रस्त्यावर लोकाची थोडी ये-जा सुरू होती. स्टेनगनधारी रानडे झपाझप पाऊले टाकत सर्वांच्या पुढं झाले. पोलीस स्टेशन परिसरात येताच हवेत फायर करून ओरडले, ‘‘हॅन्डस् अप!’’ व्हरांड्यात गप्पा करत बसलेले व गाफिल असलेले शिपाई आश्‍चर्यचकित झाले. सर्व शिपाई निशस्त्र असल्यानं त्यापैकी पाच जणांनी हात वर केले मात्र त्यांच्या हेडकॉन्स्टेबलनं आत घुसण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर रानडे यांनी स्टेनगन रोखून, बुटाची लाथ मारून बाहेर ढकललं.


त्यावेळीही त्यांना पूर्ण विश्‍वास होता, हेड कॉन्स्टेबलसह सर्व शिपायांचा बंदोबस्त मागे असलेले आपले साथीदार करणारच! रानडे सावधगिरी बाळगत, स्टेनगन रोखत आतील शस्त्रागाराजवळ पोचले. तेवढ्यात पिस्तूलमधून फायर केल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. रानडे यांनी वळून बघितले तर मगाशीचा हेड कॉन्स्टेबल पिस्तूलमधून गोळ्या झाडत होता. एक गोळी रानडे यांना लागली. लगेच त्यांनी फायर केले. हेडकॉन्स्टेबलच्या हातातील पिस्तूल खाली पडलं तसा तो, रानडे यांच्यावर झेपावला. स्टेनगन हिसकण्यासाठी चांगलीच झटापट झाली. त्याला ढकलून परत एकदा रानडे यांनी त्याच्यावर फायर केलं.


तेवढ्यात पेढणेकर व बाळकृष्ण पिस्तूल चालवत तेथे पोचले. हेड कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मग शिवलिंग, बाळकृष्ण, पेडणेकर यांनी पोलीस स्टेशनमधील बंदुका इत्यादी शस्त्रास्त्रं ताब्यात घेऊन ते बाहेर पडले. रानडे जखमी अवस्थेत असल्यानं सिनारी यांच्या सहाय्यानं बाहेर पडले.


उद्देश सफल झाला होता. मोहिमही फत्ते झाली होती परंतु रानडे यांना आता चालवत नव्हतं. शुद्ध हरपल्यासारखं वाटत होतं. त्यांनी आपली स्टेनगन बाळकृष्णकडं दिली व वेळ न दवडता सर्वांना तिथून लवकर निसटून जाण्यास सांगितलं. कोणत्याही क्षणी गस्तीवरचं वाहन किंवा इतर कोणी आलं तर धोका संभवणार होता.


त्यानंतर जड अंतःकरणानं सर्व साथीदार शस्त्रास्त्रासह तिथून बाहेर पडले. थोड्याच वेळात रानडे यांची शुद्ध हरपली!


दुसर्‍या दिवशी सकाळी रानडे शुद्धीवर आले त्यावेळी ते पणजीजवळच्या दवाखान्यात होते. खूप तहान लागल्यानं त्यांनी पाणी मागितलं पण ‘पाणी मिळणार नाही, तुमच्या पोटाचं ऑपरेशन झालं आहे’ असं तिथल्या नर्सनं सांगितलं. नंतर त्यांना नाव विचारण्यात आलं. ‘श्याम नारायण सिंह’ रानडे यांनी उत्तर दिलं. बाहेर दोन बंदुकधारी पोर्तुगीज पोलीस त्यांना दिसले. ‘‘तीन-चार दिवस आता काही खाता येणार नाही’’ जाताजाता नर्स त्यांना म्हणाली. नंतर तिसर्‍या दिवशी म्हापसाचा पोलीस कमांडर दवाखान्यात आला. त्यानं रानडे यांना बरेच प्रश्‍न विचारले. त्यांनी मोघमपणे उत्तरं दिली.


मग दोन दिवसांनी साध्या वस्त्रातील एक व्यक्ती आली आणि इंग्रजीत रानडे यांना विचारलं, ‘‘ओळखलंस का मला? मला मोन्तेरू म्हणतात.’’ त्याला बघून रानडे यांना हसायला आलं. दवाखान्यात पडून काहीच करता येत नाही याचं त्यांना वाईट वाटलं. अचानक मग कुसुमाग्रजांची एक कविता त्यांना आठवली, “गर्जा जयजयकार क्रांतिचा”. ती गुणगुणत ते झोपी गेले.


दहाव्या दिवशी 4 नोव्हेंबरला रानडे यांना दवाखान्यातून सोडण्यात आलं आणि लगेच पोलिसांनी त्यांना हातकड्या घातल्या. नंतर त्यांना पणजी पोलीस स्टेशनच्या कोठडीत डांबण्यात आलं.


दवाखान्यातील कपडे काढून कैद्याचे कपडे त्यांना घातले. फाटकी हाप पॅन्ट आणि बटणं नसलेला सदरा. काही दिवसांनी मोन्तेरू परत आला आणि उलटसुलट प्रश्‍न विचारून त्यानं रानडे यांना भंडावून सोडलं. त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, ‘‘मला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगणार, तुम्हाला काहीच सांगणार नाही.’’ मात्र पोलिसांना बरीचशी माहिती आधीच अवगत झाली होती. फक्त रानडे यांच्या तोंडून त्यांना ती ऐकायची होती.


आता रानडे यांना कोठडीत हाल-अपेष्टा सहन करत दिवस काढणं हेच काम उरलं होतं. कैद्यांना रोज मारझोड करणं, गलिच्छ शिव्या हासडणं हे नित्याचं झालं होतं.


29 डिसेंबर 1956 ला सर्व कैद्यांना पोर्तुगीज लष्कराच्या कोर्टात पेश करण्यात आलं. तेथे सर्वांना निरनिराळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या.


रानडे यांना ‘दहशतवादी’ घोषित करत एकूण 26 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. शंभू पालकरला 21 वर्षे, तसेच दासू चाफाडकर, माधव कोरडे, पुंडलिक नाईक, दत्ता नागवेकर यांना प्रत्येकी 22 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.


बाळकृष्ण भोसलेला मध्यंतरीच्या काळात वीरमरण प्राप्त झालं. तसंच बाळा मापारी व प्रभाकर नाईक यांना पोलिसांनी मारल्यामुळं ते हुतात्मा झाले होते. जेव्हा कठोर तुरूंगवास भोगायची वेळ येते तेव्हा मी मी म्हणणारेही आतून उद्ध्वस्त होतात.


कोणत्याही कैद्यासोबत बोलायचं नाही की इशारे पण करायचे नाहीत एवढे कडक नियम तिथं होते. त्यामुळं रानडे यांनी ठरवलं, स्वतःशीच बोलायचं. कविता गुणगुणायच्या. त्याही हळू आवाजात! त्या अंधार कोठडीत खिडकी नसल्यानं सदैव अंधाराचंच साम्राज्य होतं. बाहेरचं जग बघायला दरवाजाजवळ येण्यास बंदी! रात्री व्हरांड्यात दिवे लागल्यावरच दरवाजातून कोठडीत थोडाफार उजेड यायचा. रानडे यांच्या कोठडीसमोरच नवीन आणलेल्या कैद्यांना अमानुषपणे मारहाण व्हायची. ते बघण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं.


नंतर 1956 च्या एप्रिलमध्ये सांगलीला पत्र पाठविण्याची त्यांना अनुमती मिळाली. त्यामुळं एका वर्षापेक्षाही जास्त काळानंतर नोव्हेंबर 1957 मध्ये रानडे यांना त्यांची आई अन् भावाचं दर्शन झालं. मात्र बाहेरून येणारं एकही पत्र त्यांच्यापर्यंत पोचत नव्हतं. त्याच दिवशी रानडे यांचा भाऊ परत आला. त्याच्या हातात काही पुस्तकं, साबण, घरगुती साहित्य होतं. ते पोलिसांनी तपासून रानडे यांना दुसर्‍या दिवशी दिलं. तब्बल दोन वर्षानंतर परत काही पुस्तकं आणि खाद्यपदार्थांसाठी परवानगी मिळाली.


जवळपास पाच वर्षांची कठोर शिक्षा भोगल्यानंतर रानडे यांची पणजीच्या तुरूंगातून पोर्तुगालच्या तुरूंंगात रवानगी होणार होती. हजारो दिवसानंतर ते बाहेरचं जग बघणार होते. 5 ऑक्टोबर 1960 रोजी तब्बल दीड महिन्यानंतर समुद्रातून प्रवास करत जहाज पोर्तुगालला पोचलं. राजधानी लिस्बनजवळ असलेल्या कशीयशच्या ‘अल्जुव’ नावाच्या तुरूंगात रानडे यांना ठेवण्यात आलं. तेथे पोचताच त्यांच्याजवळचं सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. कोठडीतील एकांतवास परत सुरू झाला.


त्यानंतर 16 एप्रिल 1961 ला रानडे यांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आलं. तेथे आपल्यासारखेच कैदी असल्याचं बघून त्यांना थोडं बरं वाटलं. तब्बल साडेपाच वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी ‘मौनात’ काढला होता. ते फक्त स्वतःशीच बोलत होते.


पोर्तुगालच्या तुरूंगात राहूनही त्यांना आता एकाच गोष्टीचं समाधान होतं. आपल्याला आता आपल्यासारख्याच माणसांशी संवाद साधता येणार! मात्र काही वेळातच समजलं, सोबत असलेल्या कैद्यात एक जर्मनीचा होता, तर दुसरा डच होता. तिसरा इंडोनेशियन होता तर चौथा स्पॅनिश! कुणालाच कुणाची भाषा कळत नव्हती. नंतर एका पोर्तुगीज कैद्याची त्यात भर पडली. रानडे यांना इतक्या दिवसांच्या तुरूंगवासात पोर्तुगीज भाषा थोडीफार कळत होती! त्यामुळं त्या पोर्तुगिज कैद्यांशी हावभाव करून संवाद साधण्यात रानडे यांना थोडं समाधान लाभायचं. मुख्य म्हणजे छोट्याशा अंधारकोठडीतला एकांतवास आता नशिबी नाही याचाच त्यांना आनंद झाला होता. कधीकधी पोर्तुगीज वर्तमानपत्रं तुरूंगात बघायला मिळायचं.


20 डिसेंबर 1961 चा अंक रानडे यांच्या हाती पडला. त्यात मुख्य बातमी होती. पोर्तुगीजांपासून गोवा मुक्तला झाल्याची! 19 डिसेंबरला गोवा प्रांत स्वतंत्र झाला होता. त्यांनी परत परत तीच बातमी वाचली. आनंद गगनात मावत नव्हता. अन् कोणासोबत वाटताही येत नव्हता! कारण सोबत असलेले कैदी भारतीय नव्हते.


आता तेथील सर्व कैदी पोर्तुगालचे गुन्हेगार होते. त्यांना गोवा मुक्तीशी काहीच देणं-घेणं नव्हतं. तरीही रानडे यांनी त्यांच्यासमोर त्यांच्याच भाषेत आपलं मन मोकळं केलं. डोळ्यातून आसवं गळत होती! गोव्यासाठी केलेला मुक्तीसंग्राम त्यांना थोडक्यात सांगितला. आता लवकरच आपली यातून सुटका होणार, आपण आपल्या मातृभूमीला परतणार या एकाच आशेवर रानडे जगत होते. प्रत्येक उगवणारा दिवस आशेचा किरण घेऊन येत होता अन् निराशेत रूपांतरित होऊन मावळत होता. गोवा स्वतंत्र झाल्याची बातमी समजल्यापासून रानडे यांना आता एकेक दिवस युगासारखा वाटत होता.


16 जानेवारी 1962 रोजी संयुक्त अरब गणराज्याच्या राजदूताने त्यांना भेटून सांगितले, ‘‘बंदी केलेले पोर्तुगीज सैनिक आणि भारतीय युद्धकैद्यांची लवकरच अदलाबदल होणार आहे. आठ दिवसांतच तुमची मुक्तता होणार!’’ नंतर आठ दिवस कधी संपले, महिना संपला! 20 एप्रिलच्या पोर्तुगीज वर्तमानपत्रात बातमी आली, भारत-पोर्तुगालमध्ये लवकरच कैद्यांची अदलाबदल होणार! नंतर 15 मे 1962 रोजी जाहीर करण्यात आलं, गोवा किंवा भारतात एकही पोर्तुगीज बंदी उरला नाही.


भारत सरकारच्या उदासीन कारभारामुळे रानडे अद्यापही शिक्षा भोगत होते. मध्येच त्यांच्या कानावर बातमी आली, तीन पोर्तुगीजांच्या बदल्यात पाच भारतीय कैद्यांना सोडण्यात आले. ते कोण कैदी होते याचा सुगावाही लागला नाही. आता कोणावर अन् कशावर विश्‍वास ठेवावा हेच त्यांना कळत नव्हते. त्यांची अवस्था विमनस्कासारखी झाली होती. तरीही ते कमालीचा संयम बाळगून होते.


तिकडे भारतात रानडे यांचे मित्र बापू साठे आणि संगीतकार सुधीर फडके यांचे त्यांच्या सुटकेसाठी कसोशीनं प्रयत्न सुरू होते. आपल्या देशातील नेत्यांच्या चमत्कारिक नीतिमुळेच रानडे पोर्तुगालच्या तुरूंगात अडकून पडले होते. मग त्यांनी सांकेतिक भाषेत प्रभाकर सिनारी आणि कराडच्या आत्माराम पाटील यांना पत्र लिहून स्वतःच प्रयत्न सुरू केले. मात्र तेवढ्यात भारत-चीन युद्ध सुरू झाल्यानं त्याचा उपयोग झाला नाही. 1962 हे वर्ष संपलं.


वर्षाअखेरीस आत्माराम मयेकर यांना ‘काका’ नावानं रानडे यांनी पत्र पाठवलं. नंतर 1963 च्या जानेवारीमध्ये अचानक अप्पा सरमळकर यांचं पत्र रानडे यांना मिळालं. त्यात काकांचा उल्लेख होता. सोबत बारा पौंडचा चेकही होता. पत्र वाचून रानडे समाधानी झाले. चेकद्वारे त्यांनी आधी गरम कपडे घेतले. कारण कडाक्याच्या थंडीमुळं तिथं राहणं दुरापस्त होतं. 1964 पर्यंत कौटुंबिक पत्र व आर्थिक सहाय्य मिळणं सुरू होतं. नंतर ते अचानक बंद झालं.


1 ऑक्टोबर पासून रानडे यांना पहिल्यांदाच तुरूंगाबाहेरील मोकळ्या जागेत नेण्यात आलं. तिथं त्यांना मोकळा श्‍वास घेता आला. दुसर्‍या कोठड्यामधील कैद्यांनाही आता ते बघू शकत होते. बोलण्याची मात्र मनाईच होती. नोव्हेंबर 1964 मध्ये सोबत असलेला मार्कुश नावाचा पोर्तुगीज कैदी मित्र मुक्त झाला. साश्रू नयनानं त्यानं रानडे यांचा निरोप घेतला व ‘‘तुम्हीही लवकरच भारतात परतणार’’ असा आशावाद प्रकट केला.


काही दिवसांनी त्यांना ‘रेडक्रॉस’कडून पाठविलेली पुस्तकं वाचण्याची परवानगी मिळाली. त्यात एक भूगोल व दुसरं विज्ञानाचं होतं आणि ‘न्यूयार्क टाइम्स’ वृत्तपत्रही होतं. खूप दिवसांनी रानडे यांना ‘ग्रेप्स ऑफ रॅथ’ ही स्टाईकनबेकची सुंदर कादंबरीही वाचायला मिळाली. एक दिवस भारताचे त्याकाळातील राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना रानडे यांनी सविस्तर पत्र लिहिलं. ते पत्र रजिस्टर करून मेक्सिकन दूतावासामार्फत पाठवलं.


नंतर काही दिवसांनी मेक्सिकन दूतावासानं कळवलं की, ‘‘तुम्हाला सुटकेसाठी वकील नेमावा लागेल; कारण तुम्हाला पोर्तुगाल सरकारनं 26 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.’’


3 मार्च 1965 च्या विद्यार्थी दिनानिमित्त पोर्तुगालच्या सालाजारशाही विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. परिणामी बर्‍याच विद्यार्थ्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं काही विद्यार्थी रानडे यांच्या संपर्कात आले. त्यांना श्री. कामत नावाचे पोर्तुगालस्थित मूळचे भारतीय वकील मदत करत असल्याचं रानडे यांना समजलं. मग त्या विद्यार्थ्यांमार्फत कामत वकिलांची भेट झाली तेव्हा चर्चेदरम्यान रानडे यांना आपली मुक्तता होऊ शकते असा विश्‍वास वाटू लागला.


त्यानंतर दुसर्‍या दिवशीच कामत यांनी वकीलनामा तयार करून रानडे यांची सही घेतली. मग कामत यांनी आपले प्रयत्न सुरू केेले. मात्र बर्‍याच अडचणी येत होत्या. पोर्तुगाल कोर्टाच्या दोन मुख्य अटी होत्या. एक म्हणजे, दिलेल्या शिक्षेतील निम्मा अवधी पूर्ण करणे आणि दुसरी अट तुरूंगात असताना संबंधित कैद्याकडून आदर्श व्यवहार! ऍड. कामत यांनी रानडे यांना दिलासा दिला, ‘‘तुमच्या दोन्ही अटी पूर्ण असल्यानं आता कसलीही अडचण नाही.’’


ऍड. कामत 2 डिसेंबर 1968 रोजी तुरूंगात येऊन रानडे यांना भेटले आणि त्यांना खूशखबर ऐकवली, ‘‘माझ्या मते तुम्ही या महिना अखेर किंवा जास्तीत जास्त पुढच्या महिन्यात नक्कीच मुक्त होणार!’’ बिनशर्त सुटकेसाठी न्यायालयात मे महिन्यात त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्याचा निकाल 23 डिसेंबर 1968 ला लागणार होता; मात्र काही कारणास्तव निकाल पुढं ढकलण्यात आला.


नंतर 23 जानेवारी 1969 रोजी दुपारी आपल्या कैदी मित्रांसह तुरूंगात जेवण करत असताना रानडे यांना ऍड. कामत यांचे कार्ड मिळाले. त्यावर त्यांच्या सुटकेची आनंददायी वार्ता आलेली होती. बातमी कळताच सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं.


त्यानंतर 24 जानेवारीला तेथील औपचारिकता पूर्ण करून ते 25 जानेवारी 1969 रोजी आपल्या प्रिय मातृभूमीसाठी स्पेन, इटलीमार्गे रवाना झाले. 1 फेब्रुवारी 1969च्या पहाटे पाच वाजता एअर इंडियाचे विमान मुंबईच्या सांताकृझ विमानतळावर उतरले. मोहन रानडे विमानातून बाहेर पडत असताना ‘भारत माता की जय’च्या गर्जना सर्वत्र दुमदुमत होत्या. साश्रू नयनांनी रानडे यांनी सर्वांना नमस्कार केला.


विमानतळावर सुधीर फडके आणि मित्र बापू साठे तसेच इतर सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. भारतात परतल्यावर ते गोव्यात स्थायिक झाले. त्यानंतरही स्वस्थ न बसता ‘गोमन्तक मराठी शिक्षण परिषद’ या शिक्षण संस्थेची रानडे यांनी स्थापना केली. या संस्थेचे कार्यवाह म्हणून ते सक्रिय होते. तसेच 1986 मध्ये ‘महिला व बालकल्याण गृहा’ची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘चिंबल’ येथील गरीब, गरजू व उपेक्षित महिला अन् मुलांसाठी कार्य केले. त्यानंतर 1988 ते 1992 पर्यंत ते भारतीय रेडक्रॉस गोवा शाखेच्या अध्यक्षपदी कार्यरत राहिले.


21 मार्च 2001 रोजी त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल करण्यात आला.


जुलै 2001 मध्ये ‘स्वामी विवेकानंद जीवनज्योत’ संस्थेची स्थापना करून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत कार्य केले.


सांगलीचा एक शाळकरी विद्यार्थी. 1942 च्या ‘करा किंवा मरा’ या आंदोलनातील एका घटनेेनं त्याच्या मनात स्वातंत्र्यासाठीची ठिणगी पेटते. नंतर बाबाराव सावरकर यांच्या सहवासात त्याची अंतःप्रेरणा जागृत होते. देशासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. पुढं आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावरही, सारा देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना हा घर सोडून गोवा स्वातंत्र्यमुक्तीसाठी जिवाचं रान करतो, जुलमी पोर्तुगीजांशी दोन हात करताना स्वतःला झोकून देतो, आपल्या साथीदारांसोबत सशस्त्र क्रांतिकार्य करत कितीतरी दिव्यांना सामोरं जातो.


गंभीर जखमी होऊन पोर्तुगीजांच्या हाती सापडल्यावर दीर्घ कालावधीची त्याला शिक्षा सुनावण्यात येते. त्यानंतर गोवा स्वातंत्र्य झाल्यावरही तब्बल सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी पोर्तुगालच्या तुरूंगात हाल-अपेष्टा अन् मनस्ताप सहन करण्यात जातो. शेवटी अथक प्रयत्नानंतर त्याचे भारतात आगमन होते. अशा या देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या थोर क्रांतिवीराचे, मोहन रानडे यांचे कार्य अतुलनीय, प्रेरणादायी होते.


भारतात परतल्यावरही देशकार्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील आणि अनेक विधायक कार्यात भरीव योगदान होते. त्यांचं अष्टपैलू कार्य आपणा भारतीयांसाठी सदैच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही.


या थोर भारतीय सुपुत्राचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात 25 जून 2019 रोजी निधन झालं. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली! ‘‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितता बॉंजूए कातिल में है॥”



Popular Posts