•प्रभावशाली उद्योगपती
किरण मजुमदार - शॉ
त्योकॉन या औषध कंपनीचे नाव संपूर्ण बा जगभरात आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत किरण मजुमदार शॉ. गेल्या वर्षी इंग्लंडच्या 'द मेडिसिन मेकर' नावाच्या प्रसिद्ध मासिकाने किरण मजुमदार-शॉ | यांचा समावेश जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत केला होता. या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या.
किरण यांचे वडील रसेंद्र मजुमदार हे एका कंपनीत ब्रुमास्टर होते. त्यांनी किरण यांना फर्मेंटेशन (आंबवणे) सायन्स शिकण्यास सुचवले. महिलांसाठी हे क्षेत्र अगदीच नवीन होते. कारण या शास्त्राचा वापर प्रामुख्याने मद्यनिर्मितीच्या प्रक्रियेत होतो. किरण यांनी ऑस्ट्रेलियातील फेडरेशन विद्यापीठातून १९७५ मध्ये या विषयातील पदवी घेतली. विशेष म्हणजे हा विषय शिकणाऱ्या त्या विद्यापीठात त्या एकमेव महिला होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या या विषयात पहिल्या आल्या.
भारतात परतल्यावर १९७८मध्ये त्यांनी अवघ्या दहा हजार रुपये भांडवलावर मद्य फर्मेंटेशनसाठी द्रव्य तयार करण्याचा व्यवसाय बंगळूरजवळील कोरमांगला येथे एका छोट्या शेडमध्ये सुरू केला. आयर्लंडची बायोकॉन लिमिटेड ही कंपनी त्यांची भागीदार बनली. थोड्याच दिवसांत या कंपनीचे भाग युनिलिव्हर कंपनीने घेतले आणि ती कंपनी किरण यांची भागीदार झाली. जवळजवळ २५ वर्षे बायोकॉन केवळ एकच उत्पादन घेत होती. शेवटी १९९८ मध्ये या भागीदारीतून त्या मुक्त झाल्या आणि आता त्यांच्या कंपनीची उलाढाल २५ अब्जांवर पोहोचली आहे. आज औषध संशोधन क्षेत्रातही बायोकॉनचा दबदबा आहे. २०१४मध्ये त्यांना ओथमर सुवर्णपदक मिळाले होते. जगप्रसिद्ध फायनान्शियल टाईम्सने जगातील सर्वात टॉप ५० उद्योजिकांत त्यांचा समावेश केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा