संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि व्यासंगी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे
जन्म १९२५ मध्ये.
१९५६ मध्ये त्यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. दलित, उपेक्षित, वंचित यांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले. त्यांच्या समस्यांसाठी ते कायमच झगडत असत. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती इथूनच. त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. १९८५ मध्ये ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. १९७२ मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्ती लढ्याचंही वार्तांकन गाजलं होतं . मुंबई प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
दिनू रणदिवे यांचे निधन १६ जून २०२० रोजी झाले.
खांद्याला शबनम, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन् सैलसर झब्बा अशा वेशात ‘सिंहासन’(१९७९) चित्रपटात निळू फुलेंनी रंगवलेला दिगू टिपणीस हा पत्रकार मनात घट्ट बसलेला आहे. गावच्या जत्रेत कळत्या वयात ‘सिंहासन’बघितलेला. आज त्यातल्या दिगूला म्हणजे दिनू रणदिवे या खऱ्याखुऱ्या नायकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा