साखर उद्योगात सागरपार झेंडा
विद्या मुरकुंबी
खर उद्योग क्षेत्रात बेळगावमधून सा सातासमुद्रापलीकडे साखर उद्योगात झेंडा रोवणाऱ्या कर्तबगार महिला म्हणजेच विद्या मुरकुंबी. साखर उद्योग क्षेत्रात नेहमीच धडाडीचे पाऊल उचलून बेळगावचे नाव जागतिक नाकाशावर कोरलेल्या या महिलेला भारताच्या साखर निर्मिती क्षेत्रात मानाचे स्थान आहे. याकरिताच देशात त्यांना 'साखर सम्राज्ञी' म्हणून गौरविण्यात येते. •
प्रारंभी व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या विद्या मुरकुंबी यांनी तेथे यश प्राप्त केल्यानंतर साखर कारखान्याची यंत्रणा त्यांनी सौंदत्ती तालुक्यातील मुन्नोळी येथे आयात केली. शेतकऱ्यांच्या भागभांडवलाने आणि अथक परिश्रमाने तेथे साखर कारखाना उभारून साखर उद्योगाचा श्रीगणेशा केला. श्री रेणुका शुगर्स नावाचा हा कारखाना अल्पावधीत प्रगतीच्या शिखरावर पोहोचला. या कारखान्यात विद्युत उत्पादन करून अतिरिक्त वीज स्टेट ग्रीडला दिली. केवळ एक कारखाना उभारणी आणि यशानंतर विद्या मुरकुंबींचे समाधान झाले नाही. २०१० मध्ये गुजरातमधील कांडला येथे साखर प्रकल्प चालविला व तो यशस्वी केला. अथणी, गोकाक, रायबाग, गुलबर्गा, कोल्हापूर (पंचगंगा), परभणी (महाराष्ट्र) या ठिकाणचे साखर कारखाने त्या चालवत आहेत. सध्या कर्नाटकातील पाच, महाराष्ट्रातील चार, गुजरातमधील एक. पश्चिम बंगालमधील एक असे बरेच कारखाने साखर मनाशी विद्या मुरकुंबी चालवितात. विशेष म्हणजे, ब्राझीलमधील चार साखर कारखाने विद्या मुरकुंबी यांच्याकडे आहेत. भारत देशात किंबहुना जगामध्ये एवढे साखर कारखाने हाताळणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. म्हणूनच त्यांना 'साखर सम्राज्ञी' नावाने ओळखण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा