स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल
स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल यांचा
जन्मदिन २४ ऑक्टोबर १९१४ (चेन्नई) आणि
स्मृतीदिन २३ जुलै २०१२रोजीचा
कॅप्टन लक्ष्मी सेहगल या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी.
लक्ष्मी सेहगल यांचा जन्म एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लक्ष्मी सेहगल यांचे वडील डॉ.एस. स्वामीनाथन हे प्रख्यात वकील होते, तर आई अमू स्वामीनाथन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्या सेहगल यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या. डॉक्टरकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४० मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपर्कात त्या आल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महिलांसाठी ‘राणी झाशी रेजिमेंट’ ची स्थापना केली. लक्ष्मी सेहगल यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. सेहगल यांनी कर्नल पदापर्यंत बढती मिळविली पण त्यांची ‘कॅप्टन’ ही ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. स्वातंत्र्यसमरात आणि नंतर समाजकारणात मोठे योगदान देणार्या या कर्तृत्वशाली वीरांगनेने जगासमोर स्वत: चा आदर्श निर्माण केला.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानी सेनानी सिंगापूर मध्ये ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला तेव्हा लक्ष्मी सेहगल सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाल्या. १९४३ साली आझाद हिंद सरकारच्या कॅबिनेट मध्ये पहिली महिला सदस्या होण्याचा मान त्यांनी पटकाविला. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट मध्ये लक्ष्मी सेहगल या नेहमीच सक्रिय राहिल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कर्नल हे पद देण्यात आले.
१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले व हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. स्वातंत्रोत्तर काळानंतर त्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षात प्रवेश करून आपले कार्य राज्यसभेत चालूच ठेवले.
बांगलादेश फाळणी अन भोपाळ गॅस दुर्घटने वेळी स्वतः वैद्यकीय सेवा केली. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले. लक्ष्मी सेहगल यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा