विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

समाजकारण /राजकारण

कवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विश्वास पाटील

 विश्वास पाटील 

बालपण आणि शिक्षण

विश्वास पाटील यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९५९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ले गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण नेर्ले गावातच पूर्ण केले. पुढे त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (मराठी) पदवी संपादन केली.

प्रशासकीय सेवा

एम.ए. झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेत यश मिळवले. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी विविध पदांवर काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांचे साहित्य लेखन सुरूच होते.

साहित्यिक कारकीर्द

विश्वास पाटील यांची साहित्यिक कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांचे पहिले गाजलेले पुस्तक 'झाडाझडती' (१९९१) हे होते. या पुस्तकात त्यांनी धरणग्रस्त लोकांचे दुःख आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष प्रभावीपणे मांडला. या कादंबरीसाठी त्यांना १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

त्यानंतर त्यांनी 'पानिपत' (१९८८) ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात मोठे नाव कमावले. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावरील ही कादंबरी मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आणि ती अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाली.

याशिवाय त्यांनी अनेक यशस्वी पुस्तके लिहिली आहेत.

 * 'महानायक' (१९९९): महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी

 * 'नागकेशर' (१९९७): साखर उद्योगातील राजकारण

 * 'चंद्रमुखी': तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित कादंबरी. यावर 'चंद्रमुखी' नावाचा चित्रपटही आला आहे.

 * 'पांगिरा': दुष्काळ आणि ग्रामीण जीवन

 * 'अखेरचा संघर्ष': स्वातंत्र्यानंतरच्या भारताची कथा

पुरस्कार आणि सन्मान

विश्वास पाटील यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 * साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)

 * इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार

 * इतर अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार

अलीकडेच, त्यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन साताऱ्यात होणार आहे.

एकंदरीत

विश्वास पाटील हे एक संवेदनशील लेखक आणि कर्तव्यदक्ष प्रशासक आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवन, ऐतिहासिक घटना आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या लेखनातून माणसाच्या वेदना, संघर्ष आणि आशा-निराशा यांचे प्रभावी दर्शन घडते. त्यांचा जीवनपट हे कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे.

विश्वास पाटील (जन्म: २८ नोव्हेंबर १९५९) हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या लेखनात ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय विषयांचा प्रभावीपणे वापर केलेला दिसून येतो.

मुख्य पुस्तके आणि साहित्य:

 * पानिपत: ही त्यांची सर्वात गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते.

 * झाडाझडती: १९९२ साली या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. धरणग्रस्त लोकांच्या वेदना आणि त्यांच्या जीवनावरील ही एक मार्मिक कादंबरी आहे.

 * महानायक: महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे.

 * चंद्रमुखी: तमाशा कलावंतांच्या जीवनावरील ही कादंबरी त्यांच्या सामाजिक लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. या कादंबरीवर आधारित "चंद्रमुखी" नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

 * नागकेशर: साखरधंद्यातील राजकारण आणि त्यातील गुंतागुंतीचे चित्रण या कादंबरीत आहे.

 * पांगिरा: दुष्काळ आणि ग्रामीण जीवनावरील ही कादंबरीही खूप लोकप्रिय आहे.

इतर माहिती:

 * विश्वास पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ले नावाच्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला.

 * त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.

 * त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 * अलीकडेच, त्यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन साताऱ्यात होणार आहे.

 * त्यांनी काही नाटकांचे आणि चित्रपटांचे लेखनही केले आहे.


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

 मारुती चितमपल्ली (Maruti Chitampalli) हे एक प्रसिद्ध भारतीय निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक होते. त्यांना "अरण्यऋषी" (वन ऋषी) म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वने, वन्यजीव आणि निसर्गाच्या अभ्यासात आणि लेखनात घालवले.

त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी:
 * जन्म: ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर, महाराष्ट्र येथे झाला.
 * निधन: १८ जून २०२५ रोजी सोलापूर येथे, वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 * कार्यकाळ: त्यांनी महाराष्ट्र वन विभागात ३६ वर्षांहून अधिक काळ सेवा केली आणि उपमुख्य वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या अनेक वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 * लेखन: त्यांनी मराठी साहित्यात निसर्ग लेखनाला सुरुवात केली. त्यांचे लेखन पक्षी, वने, प्राणी आणि आदिवासी जीवनाच्या सजीव आणि काव्यात्मक वर्णनासाठी ओळखले जाते. त्यांनी सुमारे २५ पुस्तके लिहिली आहेत, ज्यात वन्यजीव, पक्षी आणि वनस्पतींवरील माहितीपर संकलनांचा समावेश आहे.
 * पुरस्कार आणि सन्मान:
   * २०२५ मध्ये साहित्य आणि पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या आजीवन योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
   * २००६ मध्ये त्यांनी सोलापूर येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.
   * २०१७ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारकडून विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
 * भाषा ज्ञान: त्यांना १३ भाषांचे ज्ञान होते, आणि त्यांनी आदिवासी बोली आणि निसर्गाचे रहस्यमय जीवन मराठी वाचकांपर्यंत पोहोचवले.
त्यांची काही प्रमुख पुस्तके:
 * निळावंती
 * रानवाटा
 * चकवाचांदण - एक वनोपनिषद
 * रातवा
 * जंगलाचं देणं
 * पक्षीकोश
 * मृगपक्षीशास्त्र
 * सुवर्ण गरुड
 * नवेगावबांधचे दिवस
मारुती चितमपल्ली यांना महाराष्ट्रात निसर्ग आणि वन्यजीव समजून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास अनेक पिढ्यांना प्रेरित करणारे "वन ऋषी" म्हणून स्मरणात ठेवले जाते.

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर

 

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर  

आरती प्रभू  

जन्म. ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे.

शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या  काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून आरती प्रभू बावरून गेले. प्रथम लोणावळ्याच्या वसतीगृहात ते नोकरीला होते. बहुतेक त्यावेळीच त्यांनी कर्जतला जागा घेतली. लोणावळ्याची नोकरी सुटली. मग काही वर्षे त्यांनी आकाशावाणीत नोकरी केली. ते काही वर्षे युनिव्र्हसिटीत होते, मात्र कुठल्याच नोकरीत त्यांनी स्वत:ला अडकवून घेतलं नव्हतं. नोकरी सोडताना आपल्या कुटुंबाचे अथवा स्वत:चे त्यांना भान नसायचे. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला असत. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात, असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना', ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या माणूसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळवली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. *आरती प्रभू* यांचे २६ एप्रिल १९७६  रोजी निधन झाले.

मराठी लेखिका डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर

 लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर 

जन्म. ७ जानेवारी १९२० 

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी  मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. *डॉ.सरोजिनी बाबर* यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले. 


डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता

अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..

खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..

गालात हासून, ओठात बोलून...

हातानं खेळीत, काय ग म्हणालं...

जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...

सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...

रांगत रांगत, हअम डौलात...

गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...

फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...

कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...

झेप झेपावून, तोल सावरून...

नाचून नाचून, पाय खुळखुळलं...

काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...

माझ्या जीवाचं, सुख दाटलं...

कवी बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय


 कवी बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय 

जन्म. २७ जून १८३८ नैनिताल येथे. 

कलकत्ता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्नम केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंकिमचंद्र खूप संतप्त झाले. सन् १८७६ चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.

‘आनंद मठ' या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले व ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वंदे मातरम् हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले आणि या गीताला खूप लोकप्रियता मिळाली. १८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गाऊन अख्खे अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत जागृतीचा शंखनाद बनले. हिदू-मुस्लिम सर्वांनी मुक्त कंठाने याचे गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. १९०४ मध्ये भगिनी निवेदिता यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम् असे लिहिले. वंदेमातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता की भगिनी निवेदिता यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. १९०७ मध्ये त्यांनी वंदे मातरम् लिहिलेला हा ध्वज बर्लिन येथे फडकविला.

वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला. आजही 'वंदे मातरम् करोडो भारतीयांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे,

बंकिंम चंद्र हे सरकारी महाविद्यालयात प्राध्यापकही होते. बंकिंम चंद्रांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या. *बंकिंम चंद्र* यांचे ८ एप्रिल १८९४ रोजी निधन झाले.

Popular Posts