विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

*हुतात्मा भाई कोतवाल*



*हुतात्मा भाई कोतवाल*

तो काळ फार धामधुमीचा होता. दुसऱ्या महायुद्धचा वणवा शिगेला पोहचला होता. असं असतांनाही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते.  *८ऑगस्ट१९४२ रोजी आझाद मैदान येथील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना, 'भारतातून चालते व्हा !' असे ठणकावून सांगितले व देशवासीयांना 'करेंगे या मरेंगे' चा मंत्र देऊन, शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याच आवाहन केले,  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले.. याच १९४२ च्या :चले जाव' चळवळीतील  एक धगधगते अग्निकुंड म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल.*

भाई कोतवाल यांचा

जन्म दिन १ डिसेंबर १९१२ (माथेरान) येथे तर

स्मृतीदिन आहे २ जानेवारी १९४३.


विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवाल यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी झाला.


अफाट बुध्दीमत्ता, अचाट कर्तुत्व, पराकोटीचे मातृप्रेम, कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरान मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. जेमतेम ३१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला. 


हुतात्मा कोतवाल यांचे प्राथमिक शिक्षण माथेरान येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते आपल्या आत्या गौरीताई हळदे यांच्याकडे पुणे येथे गेले. पुण्यात शिक्षण घेताना शि.म. परांजपे यांच्या काळा मधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. 


भाई कोतवालांचा विवाह १९३५ मध्ये पुण्यातील इंदू तिरलापूरकर यांच्याशी झाला. त्यांना भरत आणि जागृती अशी दोन मुले होती. आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय न करता त्यांनी वडिलांच्या इच्छे विरुद्ध माथेरान येथे समाजकार्य सुरु केले. त्यांनी मुंबई किनारपट्टीवरील वादळाचा तडाखा बसलेल्या कोळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर राजाराम उर्फ भाऊसाहेब राऊत यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उडी घेतली. त्यांनी माथेरान परिसरातील सामान्य जनतेला मतदानाचा हक्क मिळवून दिला. तसेच मतदार यादीत त्यांची नावे टाकण्यास मदत केली. 

सशस्त्र क्रांतीकार्य

शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलम्डून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे (पायलन)पाडायला आरंभ केला. उतरणीवर असलेल्या मनोऱ्याचे वरच्या अंगाचे तीन पाय कापले की उतरत्या भागाकडील पायावर सर्व भार पडून मनोरा कोसळून जमीनदोस्त होत असे. मनोऱ्यावरील तारा तुटताच वीजपुरवठा खंडीत होत असे, संदेशवहन बंद पदत असे. १ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधिक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन नेरळपासून (ता. कर्जत) जवळ असलेल्या सिद्धगडावर आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत पोलिस गडावर पोहचले व त्यांनी गोळीबार सुरू केला. भाई आणि हीराजी पाटील यानी मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार केला. दोन तास झालेल्या चकमकीनंतर भाई व हीराजी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले.

त्यांनी भूमीहिनांच्या मुलांसाठी ४२ Voluntary School सुरु केल्या. दुष्काळाच्या वेळी जमीनदारांनी गरीब शेतकऱ्यांना धान्य देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब राऊत यांच्या आर्थिक साहाय्याने गरिबांसाठी धान्य बँक सुरु केली. त्यांच्या अशा या सामाजिक कार्यामुळे ते सन १९४१ साली माथेरान सिटी कौन्सिल मध्ये Vice Chairman म्हणून निवडून आले. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून ते स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होते. ९ ऑगस्ट १९४२ च्या महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या चले जाव चळवळीत ही ते सहभागी होते. 


ब्रिटिशांनी सदर चळवळीत सामील झालेल्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती. त्यात भाई कोतवाल हि होते. त्यानंतर ते भूमिगत झाले. भूमिगत होऊन त्यांनी 'कोतवाल दस्ता' नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेत ५० जणांचा सहभाग होता. त्यात शेतकरी आणि शिक्षकांचा सहभाग होता. यात त्यांचे चुलत बंधू आणि आते भाऊ दत्तोबा हळदे हि सामील होते. 


१९४२ च्या चळवळीत भाई कोतवाल, हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतें. ते व त्यांचे सहकारी रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे, विजेच्या तारा तोडायचे, अन्य घातपाती कारवाई करून जंगलात पसार व्हायचे. या गनिमी काव्यामुळे सरकार त्रस्त झालं होतं, मात्र जंग जंग पछाडल्या नंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात सरकारला यश येत नव्हतं. 


मुंबई शहराला वीज पुरवठा करणारी प्रमुख वीज वाहिनी कापण्याचे काम सप्टेंबर १९४२ ते नोव्हेंबर १९४२ या कालावधीत त्यांनी ११ वेळा केले. त्यांच्या या कृत्यामुळे ब्रिटिश पोलिसांनी भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आणि त्यांना पकडण्यासाठी हॉल आणि स्टॅफोर्ड  या अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ज्यावेळी 'कोतवाल दस्ता' मुरबाड तालुक्यातील सिद्धगड च्या घनदाट जंगलात लपलेले असताना त्यांनी मदतीसाठी एक पत्र  आपल्या सहकाऱ्यांना पाठवले. परंतु ते पत्र एका जमीनदाराच्या हाती लागले. त्या जमीनदाराने ते पत्र ब्रिटिश अधिकारी हॉल याला दिले. 


२ जानेवारी १९४३ च्या दिवशी भल्या पहाटे आझाद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने मदतीची वाट पाहत असताना ब्रिटिश अधिकारी हॉल आणि स्टॅफोर्ड यांच्या पथकाने समूहावर हल्ला चढविला. या हल्ल्यात आझाद दस्त्याच्या गोमाजी पाटील यांचा तरुण मुलगा हिराजी पाटील शहीद झाला. सदर हल्ल्यात भाई कोतवालांच्या मांडीला गोळी लागल्यामुळे त्यांना जागचे हालताही येत नव्हते. अशातच  क्रूर हॉल ची नजर भाईंवर पडली. त्याने क्षणाचाही विलंब न करता भाईंवर गोळी झाडली, आणि २ जानेवारी १९४३ रोजी अखेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला. चलेजाव चळवळीतील 'करेंगे या मारंगे' या आदेशाने आपल्या सहकाऱ्यांसमोर आवाहन केले, "स्वराज्य हवे असेल तर आपण आपल्या सर्वस्वाच बलिदान देण्यास तयार रहा." आणि या आवाहना सरशी गुलामगिरीचे सर्व पाश उध्वस्थ करत देशभक्तीचे एक दैदिप्यमान पर्व सुरु झाले, यातूनच पुढे क्रांतिकारकांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली. लोहकण जसे लोहचुंबकाकडे आकर्षिले जातात, तसेच अण्णांच्या उत्युंग व्यक्तिमत्वामुळे आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे त्यांना असंख्ये सहकारी मिळाले.  त्यातूनच पुढे निधड्या छातीचा कोतवाल गट अर्थात 'आझाद दस्ता' तयार झाला. या आझाद दस्त्यात, स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, झिपरु गवळी, राघो नागो भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देहू कानोजे,  राघो गाडे, आप्पा शेंडे, भास्कर तांबट, उत्तरेतील रामलाल श्रीवास्तव, दक्षिणेतील गोपाळ शेट्टी, कांतरा शेट्टी, काठेवाडचा शशीलाल दलाल, राजकोटाचा चंद्रकांत गुजराथी आणि इक्या पुतळ्या कातकरी ही होता. असे अनेक ... अनेक जातीचे , धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या प्रांतातील भिन्न भाषा बोलनारे देशभक्त एका उदात्त ध्येयासाठी एकत्र आले. 'आपण सारे एक आहोत. आपले विचार एक आहेत, आपलं ह्रदय ही एक आहे. आपण आपलं ध्येय नक्कीच साध्ये करू. आपण सारे मिळून परकीय शत्रूला देशातून हुसकावून लावू.' या जाणिवेतून हे मातृभक्त इंग्रजांविरुद्ध लढू लागले. ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्यासाठी, सरकारी काचेरीवर हल्ला करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे रुल उखडणे, विजेचे पायलन पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामे हे क्रांतीवीर करू लागले. स्वातंत्र्य संग्रामात इरेला पेटलेले हे वीर ब्रिटीशांच्या जाळ्यात अडकणे केवळ अशक्यच. कधी रानावणातून, कधी, नदीपात्रातून तर कधी डोंगर वस्त्यांतून आश्रय घेत ते ब्रिटिशांना गुंगारा देत होते.

           ऑगस्ट क्रांतीचा वानवा आता शिगेला पोहचला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाहीच्या साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला, परंतु पुन्हा एकदा गद्दारीचा कोळसा उगळला गेला. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेल्या. आझाद दस्त्याच्या ठाव-ठिकानाचा सुगावा अखेर इंग्रजांना लागला आणि २ जानेवारी १९४३ ची ती रात्र क्रांतिकारकांसाठी काळरात्र ठरली. मुरबाडच्या लाल मातीत आपल्या लाल रक्तानं लाल क्रांती करून वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा  हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घातला. लाख मोलाच्या दोन नरवीरांच्या रक्तानं सिद्धगडची  माती पवित्र पावन झाली.

         मुरबाडच्या मातीतील सिद्धगड हे या जगातील अमृतालाही अमर करणार क्रांतीतीर्थ आहे. जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र असतील पण मानवी अंतरंगात जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारं, कसं जगावं आणि कशास्तव  मरावं हे सांगणार सिद्धगडासारखं स्फूर्ती स्थान नाही. मातृभूमीच्या मुक्तीसाठी आपल सर्वस्व अर्पण करणारे आमचे हे युगपुरुष न्यायी होते, विवेकी होते, विचारी होते; मानवतेचा कैवार घेणारे ते मानवतावादी होते, समाजसुधारनेचा पाया घालणारे ते समाजवादी होते आणि स्वर्गाहूनही स्वातंत्र्ये प्रिय असणारे  क्रांतीवादी होते. राष्ट्रसंकट ओढवल्यावर त्या विरोधात लढावं कस, शत्रूशी भिडाव कस याचा धडाच आमच्या या शूरवीरांनी सिद्धगडच्या लाल मातीत गिरवला आहे. त्यांच्या रक्तमासान या मातीच पावित्र्य भस्मात रूपांतर झाले आहे.

            बलिदानाची ही गाथा अमर आहे. तुम्ही आम्ही आज मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत कारण सिद्धगडच्या मातीत त्यांनी आपलं रक्त सांडल आणि गुलामगिरीच्या भोगातून स्वातंत्र्याचा योग आमच्या झोळीत दान केला. मुक्तीची ही ज्योत कायम ठेवत ठेवण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल. भारतभूला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकळ सुखाचा त्याग केला. केवळ सुखभोगच नाही तर सतीप्रमाणे त्यांनी आपले प्राणही सहज झुंगारून दिले. म्हणूनच तर तुम्हा आम्हाला हेवा वाटावा असा इतिहास निर्माण झाला. आमच्या या नरवीरांनी स्वर्गातूनही स्वातंत्र्य प्रिय मानलं,  त्यासाठी आपल्या सर्वस्वाचही प्रसंगी दान केलं. आम्हालाही स्वातंत्र्याची किंमत चुकवावी लागेल. आणि ती किंमत म्हणजे देशाप्रती समर्पण, कर्तव्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव !

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा