चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार रवींद्रनाथ टागोर
जन्म: ७ मे १८६१
रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथाच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत. बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात आपल्याला लक्षात येतो. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८ व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे जगातील वरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रविंद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचे निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा