आरती पाटील
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आम सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही तिने अवकाशात झेपावण्याचे अशक्यप्राय असेच स्वप्न बघितले. विज्ञान आणि गणित हे आरतीचे आवडते विषय आहेत. त्यातूनच आरतीला 'अवकाश' विषयावरील अभ्यासात रस वाटू लागला. आरती आतापर्यंत तीनवेळा 'नासा'ला भेट देऊन आली...
विज्ञान विषय शिकविताना विविध प्रयोग करणे, त्या विषयाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून प्रयत्न करणे, यासाठी 'नासा'ने २००६ साली तिला शिष्यवृत्तीही दिली. त्याच वर्षी तिचे पहिले प्रशिक्षण 'नासा'च्या स्पेस अॅकॅडमी, युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर (अलबामा) येथे पार पडले. २००८ साली 'अॅडव्हान्स अॅस्ट्रॉनॉट' ट्रेनिंगसाठी तिची निवड झाली. ते प्रशिक्षण 'नासा'च्या केनेडी स्पेस सेंटर (फ्लोरिडा) येथे झाले. मे २०१४ मध्ये अवकाश शिक्षणातले प्रशिक्षकपदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आरती 'नासा'ला (कोलोरॅडो) जाऊन आली.
आरतीने इस्रायल, मलेशिया, दक्षिण कोरिया, थायलंड, स्वीत्झर्लंड, अमेरिका, लंडन या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. 'विश्वशांती' या विषयावरील अभ्यासक्रमासाठी जगभरातील १५ देशांमधून भारतातून आरतीची निवड झाली होती. या विषयाच्या निमित्ताने तिने गडचिरोलीतील मुलांच्या शिक्षणावर तिथल्या वातावरणाचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला. या दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आरती पाटील यांचा राष्ट्रपती भवनात सन्मान केला होता.
गेल्याच वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठात 'जगभरातल्या यात्रा व यात्रेकरू' या विषयावर परिषद झाली. जगभरातून निवड झालेल्या ३० जणांमध्ये आरतीला निमंत्रित केले होते. तिने त्या ठिकाणी 'पंढरीची वारी' या विषयावर विचार मांडले. आरतीला 'आदर्श शिक्षक', 'राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार', 'आदर्श महिला पुरस्कार' आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा