विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

नारायण सुर्वे

 नारायण सुर्वे हे श्रेष्ठ मराठी कवी होते.  त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. त्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत गेले. हॉटेलमध्ये पोर्‍या, कापड गिरणीत बिगारी, अक्षरओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकर्‍या त्यांनी केल्या.

इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण ते घेऊ शकले. पुढे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. विपन्नावस्था आणि दारिद्य्राचे चटके यामुळे सखोल अनुभवसंपन्न असे लेखन त्यांच्याकडून सहजस्फूर्तीने घडले. 'ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.

त्यानंतर 'माझे विद्यापीठ' (१९६६), 'जाहीरनामा' (१९७५) आणि 'नव्या माणसाचे आगमन' (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. 'सनद' (१९८२) आणि 'निवडक नारायण सुर्वे' (१९९४) या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह. उर्दू साहित्यिक कृष्ण चंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे यांनी केलेला अनुवाद 'तीन गुंड आणि सात कथा' (१९६६) या नावाने प्रसिद्घ झाला. 'दादर पुलाकडील मुले' (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी.

श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत यांचे अतुट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. रोजच्या भाकरीसाठी तसेच आपले हक्क आणि अस्तित्व यासाठी झगडणारा माणूस सुर्वे यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. लॉस अँजेल्सचा निग्रो, आफ्रिकन चाचा, टांगेवाला, शीग कबाबवाला, याकूब नालबंदवाला, संपकरी, जथ्यात वावरणारा, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, शरीरविक्रय करणार्‍या स्त्रिया यांच्यासंबंधीचे तपशील त्यांच्या कवितेत विलक्षण चैतन्यमयतेने येतात. अशा या थोर कवीचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा