विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

जननायक बिरसा मुंडा

भारतीय स्वा्तंत्र्यलढयातील आदिवासी जननायक 

बिरसा मुंडा 

१५ नोव्हेंसबर १८७५ रांची जवळील लिहतू या खेडेगावात.

बिरसा मुंडा यांनी लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही. त्या मुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला.   

बिरसा मुंडा यांचा जन्म सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्या च्या पोटी झाला. 

त्यांचे वडील शेतमजूर होते. घरच्याा गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्य माच्या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूजलमध्ये. शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांिच्याहवर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यां नी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्ववादाचा त्यांनी पुरस्का र केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्याय अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुडफाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्या यालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

१८९४ मध्येे बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्या‍वेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वाेर्थी अंतःकरणाने सेवा केली.

ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याशकरिता त्यांअनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्याेमुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्याकमुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्यााचा प्रयत्न केला. १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्याेमुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्यांचा संकल्पा त्यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यातनंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वा तंत्र्याची आवश्यकता त्यांानी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्याासाठी प्रयत्नी करुन त्यां नी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वाणतंत्र्यलढा पुकारला. १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या‍ नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांना जेरीस आणले. त्यांनी पारंपारिक शस्त्रां द्वारे म्हनणजे धनुष्यरबाण, भाले इत्या्दींच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्येर तांगा नदीच्या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सैन्याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्त कुमक आल्यारमुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्यांना रोखण्या त यश मिळवले. त्याेप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्येद बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्येड आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्यााने हल्ला चढविला व त्या‍ ठिकाणी भीषण लढाई झाली. त्यांदना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्यां ची रवानगी करण्याात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. ७ जून पर्यंत बिरसा ठिक होते. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसा यांना रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा