समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

फकिरा आणि अण्णा भाऊ साठे

 फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.


अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि शोषणाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे सांगतात ,"ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे."फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.उदाहरणार्थ -गावात दुष्काळ पडतो. भूकेने माणसं मरायला लागतात. तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीरा विष्णूपंतांच्या वाड्यावर जातो.तेव्हा


विष्णूपंत कुलकर्णी म्हणतात ,”कोण कोणाचा धनी नाही. पंत बोलून गेले. माझ्याभोवती आक्रोश सुरू झाला आहे. मी संकटात आहे. परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की, तुम्ही जगलंच पाहीजे. मरणापेक्षा आज जगणं खूप महत्त्वाच आहे.” यावरून विष्णूपंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो ....माझ्याभोवती आक्रोश आहे. मी संकटात आहे .हा त्यांचा प्रामाणिकपणा.


एवढे दुष्काळाचे सावट असतानाही माणसं जगली पाहिजेत. हे माणसा बद्दलचे अपार प्रेम ,आपल्या लक्षात येते.  संवेदनशील पणा आणि करुणा या मूल्यांचा आविष्कार होतो.विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता लोकांविषयीचा जिव्हाळा ,प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टीकोण फकीरा विषयीची करुण, त्याच्या पराक्रमाची ,स्वाभिमानाची आणि संघटित पणाची जाणीव ,निर्भयपणे विष्णूपंत कुलकर्णी  करून देतात..


फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.उदाहरणार्थ -गावात दुष्काळ पडतो. भूकेने माणसं मरायला लागतात. तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीरा -विष्णूपंतांच्या वाड्यावर जातो. तेव्हा विष्णूपंत कुलकर्णी म्हणतात ,”कोण कोणाचा धनी नाही. पंत बोलून गेले.माझ्याभोवती आक्रोश सुरू झाला आहे. मी संकटात आहे. परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की, तुम्ही जगलंच पाहीजे. मरणापेक्षा आज जगणं खूप महत्त्वाच आहे." यावरून विष्णूपंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो ....माझ्याभोवती आक्रोश आहे. मी संकटात आहे .हा त्यांचा प्रामाणिकपणा. एवढे दुष्काळाचे सावट असतानाही माणसं जगली पाहिजेत. हे माणसा बद्दलचे अपार प्रेम ,आपल्या लक्षात येते. .लसंवेदनशीलपणा आणि करुणा या मूल्यांचा आविष्कार होतो. विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता लोकांविषयीचा जिव्हाळा ,प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टीकोण फकीरा विषयीची करुणा, त्याच्या पराक्रमाची ,स्वाभिमानाची आणि संघटित पणाची जाणीव ,निर्भयपणे विष्णूपंत कुलकर्णी  करून देतात.प्रामाणिकपणा ,न्यायवादी भूमिका, सार्वजनिक हित, लोकांविषयी अपार प्रेम, विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते .फकीरा स्वतःहून माळावर जाऊन अटक होतो.त्याच्या कुटुंबातील आई ,पत्नी, आजी-आजोबाची सुटका करून देतो. प्रांत साहेब ही तलवार कुठे मिळाली आहे असे फकिराला विचारतो..तेव्हा ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी महाराजांनी दिली, फकीरा गंभीर होऊन म्हणाला.... की ही घेऊन माझा बाप लढला आणि मी हिला तुमच्याशी घेऊन लढलो या संवादातून फकिराचा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आपल्या लक्षात येतो.छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदरभाव, वडिलांच्या पराक्रमाबद्दलचा अभिमान इथून व्यक्त होतो..नैतिकतेच्या दृष्टीने अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी खूप महत्त्वाची वाटते.फकिरा' कादंबरीतून अण्णा भाऊ साठे यांनी परिवर्तनवादी नायक उभा केला. या नायकाने महाराष्ट्रातील कष्टकरी समाजाच्या पिढ्यांना जगण्याचे धडे शिकवले. मराठी साहित्यात अजरामर झालेला नायक वंचितांचा प्रेरणास्रोत आहे.दुष्काळात मरणारी माणसं वाचवणारा, महिलांची अब्रू वाचवणारा, छळछावणीतून दुर्बलांची मुक्तता करणारा आणि खजिना लुटून गोरगरिबांना वाटणारा फकिरा हा नायक म्हणून महान ठरतो.ओघ‌वती भाषा, वास्तवाचे भान आणि जनसामान्यांचा नायक उभा करणारी 'फकिरा' कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे.कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. भारतीय भाषांसह झेक, पोलिश, रशियन, इंग्रजी, जर्मन भाषेतही 'फकिरा' अनुवादित झाली आहे. समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी म्हणून 'फकिरा'चे स्थान वरचे आहे.'फकिरा' ही केवळ मनोरंजक कादंबरी नसून तिच्यात इतिहास आणि तत्त्वज्ञान आहे. वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते.मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य फकिरा या कादंबरीतून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली.त्यांच्या लेखनाचा मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. फकिरा कादंबरी याचे एक उत्तम उदाहरण आहे.नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. फकिरा ही कादंबरी सर्वाथाने वेगळेपण जपणारी कादंबरी आहे.

फकिरा कादंबरी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1jBArscxPkAuYLniyXnVb_qswy78qXNCL/view?usp=drivesdk 

नक्की वाचा .. शेअर to all 🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा