*कादंबरीकार बंकिमचंद्र चटर्जी*
जन्म - २७ जून १८३८
स्मृती - ८ एप्रिल १८९४
भारताचे ‘अलेक्झांडर ड्यूमा’ म्हणून ओळखले जाणारे बंकिमचंद्र चटर्जी सुरवातीपासूनच एक हुशार विध्यार्थी होते. लहान पणापासूनच त्यांचे मन लिहण्या वाचण्यात रमत असे. अशी महान बुद्धि असणारे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या शालेय जीवनातच एक कविता लिहून आपल्या लिखाणातून सर्वाना अचंबित करून टाकल होतं.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटीश शासनाच्या राजवटीत सरकारी सेवेत दंडाधिकारी(मजिस्ट्रेट) म्हणून रुजू झाले. दंडाधिकारी म्हणून बंकिमचंद्र चटर्जी यांनी ब्रिटीश शासनाच्या राजवटीतील सरकारमध्ये जवळपास ३० वर्ष सेवा दिली. यानंतर, सन १८९१ साली त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी सुरवातीला ब्रिटीश सरकारच्या अधिकाराखाली काम केलं होतं. यानंतर, सन १८५७ साली क्रांतीकारांनी केलेल्या स्वतंत्र्याच्या उठावामुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. यानंतर त्यांनी कुठल्याच सार्वजनिक आंदोलनामध्ये भाग घेतला नाही. परंतु, आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या कार्यप्रणाली विरुद्ध आपला राग व्यक्त केला.
बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाल साहित्याचे एक महान कवि आणि कादंबरीकार असण्याबरोबरच एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते. बंकिमचंद्र चटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे.
बंकिमचंद्र चटर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या 'वंदे मातरम्' या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरी मध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
कादंबऱ्या - दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, इंदिरा, युगलांगुरीय, चंद्रशेखर, राधारानी, रजनी, कृष्णकान्तेर उइल, राजसिंह, आनंदमठ, देवी चौधुरानी, सीताराम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा