विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे

पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे . 

जन्म. १७ सप्टेंबर १८८५

ज्वलंत आणि प्रेरणादायी प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकारांच्या विषयी काही सांगायचे, बोलायचे, लिहायचे म्हटले तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी, झुंजार पत्रकार, थोर समाजसुधारक, चित्रकार, नाटककार, इतिहासकार असे उल्लेख हमखास केले जातात. ‘ठाकरे’ नावात जी जादू आहे त्यामागचे तपस्वी जादूगार फक्त प्रबोधनकार ठाकरे हेच आहेत. प्रबोधनकार हे निर्भय होते. विचारांशी, कृतीशी प्रामाणिक होते. त्यांच्या भाषेसारखी ज्वलंत भाषा फारच थोड्यांना जमली. त्यांना ढोंग कदापि मान्य नव्हते. अंधश्रद्धा, ढोंग, जातीयतेविरुद्ध ते लढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारांचे संबंधही जिव्हाळ्याचे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शिवशक्तीबरोबर भीमशक्ती उभी राहिली ती प्रबोधनकारांमुळेच. प्रबोधनकारांनी बाबासाहेबांना मैत्रीच्या नात्याने गळ घातली व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात आणले. बाबासाहेबांबद्दल प्रबोधनकारांना नितांत आदर होता. दलित जनतेस उद्देशून ते एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यावरही विश्वाकस ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणा जवान हाडा-रक्तामांसाचा पुढारी लाभला असताना तुम्ही इतरांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा! लांडगा कसा चालेल? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा तोच तुमचे कल्याण करणार.’’ जातीयतेवर प्रहार करणारे प्रबोधनकार हे झुंजार, फर्डे वक्ते, लेखक, इतिहासकार वगैरे होते. पण ‘प्रबोधन’च्या स्थापनेनंतर त्यांच्या लेखणी आणि वाणीस खरी धार चढली. प्रबोधनकारांचे सबंध आयुष्य म्हणजे अनेक लढायांचा खणखणाट होता. आजच्याप्रमाणे ते लिहिणारे-बोलणारे सुधारणावादी नव्हते. स्वत: करून दाखवणारे होते. प्रबोधनकार म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार. ‘मर्हा टा तितुका मेळवावा! महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ हे ब्रीद आमरण उराशी बाळगणारा फटकळ लेखणी-वाणीचा, पण निर्मळ करणीचा मर्द मर्हानटा; अंतिम क्षणापर्यंत ‘ऊठ, मराठ्या ऊठ’ असे प्रबोधन ते करीत होते. शिवसेनेचे प्रेरणादाते तेच होते. प्रबोधनकारांनी आमरण मराठी तरुणांच्या व्यथांना, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडली. त्यांना कठोर परिस्थितीशी झुंजण्यास धीर दिला, हिंमत दिली आणि -

वाघिणीचे दूध प्याला

वाघ - बच्चे फांकडे

भ्रांत तुम्हा का पडे?

ही जाणीव देऊन त्यांची अस्मिता जागविली. ‘शिवसेना’ हे नावच त्यांनी दिले. 

प्रबोधनकार सदैव नव्या पिढीबरोबर वाटचाल करीत राहिले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे कर्तृत्व गाजवले ते मोलाचे. महाराष्ट्राचे नेते नामोहरम होऊन या लढ्यातून पळ काढू लागले तेव्हा शेलारमामांच्या आवेशाने दादा या लढ्यात उतरले. दादांची खणखणीत वाणी व लेखणी यामुळे प्रबोधनकारांचे दादरचे घर म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्रबिंदूच बनले. अत्रे, एस. एम., कॉम्रेड डांगे, कोठारी, बागल सगळे म्हणजे सगळेच तेथे जमत. संयुक्त महाराष्ट्र मिळाला खरा, पण मराठी माणसांची ओंजळ रिकामीच राहिली. मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरुद्ध प्रबोधनकारांनी जोरदार आवाज उठवला. भले भले पत्रकार व पुढारी याविषयी मूग गिळून बसलेले बघून प्रबोधनकारांनी या प्रश्नारवर लेखणी परजली. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवत त्याला ऐक्याची हाळी घालत त्यांनी मुंबईत शिवसेना उभी करण्यास योग्य वातावरण निर्माण केले. मराठी माणसाला त्याच्या लढाऊ परंपरेची याद देऊन त्याच्यावर जमलेली भोंगळ सहिष्णुतेची जळमटे झटकायला भाग पाडले. मराठी मनात स्वाभिमानाची लागवड करून मर्हा्टी जनांच्या झुणका-भाकरीच्या आड याल तर याद राखा अशी धमकीच दिली. *प्रबोधनकार ठाकरे* यांचे २० नोव्हेंबर १९७३ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा